२६ जुलै, ३० जून आणि तत्सम कोसळपावसाचे अनुभव वाचून मला चौतीस तास खर्चून केलेला मुंबई-पुणे प्रवास आठवतो. त्याचा हा वृत्तांत.
आता मी चाळिशीची (अदृश्य) भिंत पार केलेली आहे. त्या वेळी मी ऐन तेविशीत होतो. माझ्या वयाचा या निवेदनाशी काही संबंध नाही. म्हणूनच हा उल्लेख.
आज मी तुझं मन खणायला घेतलंच शेवटी....
एक भली मोठी पिशवी घेऊन प्रवेश करणार होतो. नको ते सल, तण उपटून टाकून बाहेर घेऊन येण्याच्या हेतूने...
प्रवेशाचे महाद्वारच महामजबूत!!! आत प्रवेश करायलाच माझी निम्मी शक्ती खर्ची पडली, पण; आज मी ही माघार घेणारच नव्हतो...
तुझी मन-वस्ती सुनसान आणि निपचित वाटली मला....
सगळं आवरत, स्वच्छ करत निघालो.. बरीच जळमटं, सर्वत्र धूळ, जिवंतपणाचं एकही लक्षण नाही त्यात..
अवकाशाने कळलं, मी तुझ्या मन-गाभ्याच्या भूतकाळात शिरलोय!! कारण तू, आपल्या अनेकविध झालेल्या चर्चा-गप्पांमधे, नकळत दिलेले संदर्भ तिथे धूळ खात पडलेले दिसले...
माझ्या आयुष्यात ९ डिसेंबर २००७ ह्या दिवसाची नोंद 'अविस्मरणीय' आणि 'अवर्णनीय' अशीच होईल. माझं वय आत्ता फक्त २४ जरी असलं आणि साधारण ७० वर्षापर्यंत जरी आयुष्य जगेन असं म्हटलं तरीही 'त्या' दिवशी आलेला अनुभव परत उघड्या डोळ्याने बघायला मिळेल का, ह्याचे उत्तर मात्र नकारार्थीच वाटते! दिवसच तसा होता तो. त्याच्या आदल्या दिवशी, शनिवारी, काही सेकंदातच मी ठरवून टाकले होते की काहीही झाले तरी चालेल, आपण पुण्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला जायचेच! ६ डिसेंबर, गुरुवारी सुरु झालेल्या ह्या संगीत सोहळ्याची चर्चा सगळीकडे दरवर्षीप्रमाणे सुरु होती.
नचिकेतनं(आनंदयात्री) परिच्छेदांचा क्रम बदल सुचवला जेणेकरून लेखाला अधिक चांगला प्रवाह येतो आहे. तेव्हढाच बदल केला आहे..
आनंदयात्रीचे मनापासून आभार....
************************************************************************************************
आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते. अन हा जास्त पगार म्हणजे फुकट असत नाही. त्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. सर्व ठिकाणी कामाची परिस्थिती आनंददायक असतेच असे नाही. असो.
तंद्रीभंग पावल्यावर, त्यांने इकडे-तिकडे पाहिले. हातातील वही त्यांने बाजूला ठेवली, सर्वत्र एक प्रकारची निरव शांतता पसरली होती. निरवपेक्षा भयाण हा शब्द शोभेल. समोर समुद्र गरजत होता, दुपारभर तळपत असलेला सुर्य थोडा सुस्तावला होता. हलकेच हसला देखील असावा, त्यांने मान इकडे तिकडे हलकेच हलवली, हलका चेहरा दिसला पण ओळख पटली नाही. कितीवेळ बसला होता कोण जाणे, वेळेचा हिशोब करणे शक्यतो त्यांने सोडून दिले होते, फाटके चप्पल, अस्ताव्यस्त कपडे, वाढलेली दाढी, न विंचरलेले केस, समोर पडलेले विडीचे थुटके हे सर्व साक्ष देत होते.
“तुमच्या अभ्यासाचे विषय सोडून इतर गोष्टींकडेही लक्ष द्या. चांगली पुस्तकं वाचा, उत्तम नाटकं बघा आणि सिनेमाच्या पटकथा वाचा! राजकारणाकडे थोडंफार लक्ष असू द्या... समाजसेवेची लहानशी संधीसुद्धा दवडू नका, झालंच तर शाळेतल्या कार्यक्रमांच्या आयोजनात भाग घ्या, नेपथ्य-प्रकाश विभागात आवर्जून काम करून बघा. मनातले विचार कागदावर उतरवण्याची सवय ठेवा. खेळांमधे, स्पर्धांमधे भाग घ्या, लोकांशी संवाद साधण्याची कला जोपासा...हे सगळं सांभाळून जर पुढे गेलात तरच युनिव्हर्सिटी तुमच्या बुद्धीच्या सर्वांगीण विकासाची किंमत करेल.”
...
शाळेच्या पहिल्या दिवसासाठी इंग्लिशची जोरदार तयारी सुरू केली (मनातल्या मनात). प्रत्येकीचं नाव, गाव, वय, छंद असे वरवरचे प्रश्न विचारायची तालीम करून ठेवली. पहिल्या दिवसाबद्दल थोडीशी उत्सुकता आणि भरपूर भीती गाठीशी बांधून मी निघाले होते. आई सोडायला येत होती, दारातून आजी-दादा हात करत होते. शाळा कुठलीही असो, तिचा पहिला दिवस असा सुरू झाला म्हंटल्यावर हायसं वाटतं! वयवर्ष चार असतं तेव्हा आणि चौदा असतं तेव्हाही! शाळेच्या आवारात मिसेस लेनी घ्यायला आल्या आणि त्यांनी मला माझ्या वर्गशिक्षिकांकडे सोपवलं!
भेळ
भगिनी समाजाच्या आनंद मेळ्यास गेलो होतो.बरेच खाद्य पदार्थंची छोटी दुकाने लावलेली होती .पण
"मुंबई भेळ " या दुकानावर गर्दी अमाप होती .भेळेचाच स्टोल,गर्दी असणारच. भेळ म्हटली की पोटभर
जेवल्यावर पण एखादी भेळेची डीश शेअर करावयास हरकत नसते.कारण भेळ पदार्थच अतिशय
रुचकर ना ! तोंडाला नुसती चवच नाही पण भूक पण चाळवणारा पदार्थ .खरेच चुरमुरे कुरमुरे, त्यात
"टुमॉरो ऑनवर्द्स् यू विल हॅन्दल द बिझनेस प्लानींग एरीया! धिस इज अ वेरी गुद अपॉर्च्युनिती फॉर यू अॅज यू विल दायरेक्तली रिपोर्त तू जी एम. प्लीज सी अब्दुर्रहमान अॅण्ड गेत यूर ऑफीस रूम सेत अप प्रॉपरली." माझ्या सौदी बॉस नी मला तोंडीच माझी बदली केल्याच सांगीतल. कारण कागदोपत्री ते करायच तर एच आर वाले टेक्नीकल मॅनपॉवर ला तुम्ही नॉन टेक्नीकल- मार्केटिंग ओरिएंटेड कामा करता कसे काय वापरता असा आक्षेप घेणार. माझ काय, तेच पंप, तेच कॉम्प्रेसर, तेच डिस्टीलेशन कॉलम्स, तेच कंट्रोल व्हाल्व अन पाईपलाईन्स अन तेच शिफ्ट मधले आयुष्य , त्याला मी जाम कंटाळलो होतो.