ललित

जी-२

Submitted by राज जैन on 3 February, 2012 - 01:17

रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.

गुलमोहर: 

बाशिंदा

Submitted by yachwishay on 2 February, 2012 - 05:03

हात हातात घेत मनाच्या कुशीत नाहीसा होणारा..
गर्द यातना-वेळात डोळ्यांत उतरणारा तो उबेशीर पूर,.
समुद्र तरंगावर बांधलेल्या दोन नावांची हबकणारी एक साखळी..,
एका निर्णयी क्षणी
रंग मिळून जायचा माझ्या जीवनात...
आणि
तो जुनाट लय सजवत राहायचा..

गुलमोहर: 

एका लग्नाची गोष्ट (भाग २)

Submitted by chaukas on 1 February, 2012 - 06:50

शिशिरचे लग्न तर झाले. आता परत जाण्याची घाई करण्याचे कारण नव्हते. शिशिर आणि अ‍ॅनला कितीही बाता मारल्या तरी पुण्याला माझी वाट पाहत एकही प्रॉजेक्ट बसलेला नव्हता. आणि बाता मारून फायदा नव्हता, ते दोघे मला (विशेषतः शिशिर; पण एक-दोन भेटीतच अ‍ॅननेदेखील ते साध्य केले होते) आरपार वाचू शकत होते. त्यामुळे 'येतो येतो' अशा चार महिने मारलेल्या थापांचा त्यांनी पुरेपूर वचपा काढला आणि कमीत कमी दोन आठवडे असा माझा मद्रासमध्ये राहण्याचा कालावधी निश्चित करून टाकला.

गुलमोहर: 

घरोघरी मातीच्या चुली - ३

Submitted by ललिता-प्रीति on 1 February, 2012 - 02:44

घरोघरी मातीच्या चुली - १

घरोघरी मातीच्या चुली - २

----------

"ए, जरा मुलांकडे बघशील ना दुपारी? माझी ब्यूटिशियन येणारे घरी."
"पुन्हाऽऽ?"
"ओरडायला काय झालं इतकं?"
"अगं, पंधरा-वीस दिवसांपूर्वीच आली होती ना?"
"छे! महिना होत आला."
"अगं, पण मग इतक्यात पुन्हा?"
"हो, मग! असंच जाणार आहोत का आपण?? बरं दिसेल का ते?"
"कुठे जाणार आहोत? आणि आपणऽऽ?? म्हणजे मी पण??"
"(जरासा त्रासिक चेहरा करत) ओरडत जाऊ नकोस रे साध्या साध्या गोष्टींत..."
"पण जायचंय कुठे?"

गुलमोहर: 

दुबई उर्फ डु बाय ( Do Buy ) भाग-३

Submitted by सुनिल परचुरे on 30 January, 2012 - 06:31

सुरुवातीला आत शिरताच एका प्रचंड भिंतीवरुन एक लहानसा धबधबा येत होता.
IMG_2702.jpg
तिसर्‍या मजल्यावरु हा घेतलेला फोटो.
IMG_2763.jpg

प्रत्येक शोरुम ही खरोखर डोळयांना मेजवानी होती. खास करुन चॉकलेटसच्या शोरुमस तर अफाट कल्पनाशक्तीने सजवलेल्या होत्या.
IMG_2712.jpgIMG_2713.jpg

गुलमोहर: 

मनाचा कॅनव्हास (स्फुट)

Submitted by निंबुडा on 30 January, 2012 - 04:00

बांद्रा रेक्लमेशनला म्हणे पावसात बघण्यालायक नजारा असतो.
अफाट वारा
बेफाम पाऊस
उधाणलेला समुद्र!
आणि...........
आणि या चित्राशी एकरूप झालेले कितीतरी "तो" आणि "ती"!
एकाच छत्रीत....एकमेकांच्या मिठीत....
खट्याळ लाटांना अंगावर झेलत ओलेचिंब!
....
....
....
....
मग "मी" कुठे आहे?
"मी" ही आहे की तिथेच...
पण शरीरानं नाही.... मनानं!
कारण मुळात माझ्याच मनाच्या कॅनव्हासवरचं कल्पनाशक्तीच्या कुंचल्याने रंगवलेलं ते चित्र आहे.
पण मग "तू" कुठे आहेस? "तू" कसा दिसत नाहीस या चित्रात??
कारण....
"तू" नाहीसच या चित्रात!
....
....
....
....
आधी "तू" इथं असायचास!
अर्थात पुन्हा मनानेच हं!

गुलमोहर: 

एक वादळ भरकटलेलं....

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 January, 2012 - 23:59

अठरा जानेवारी १९५५ ला कराचीत रक्ताच्या उलट्या होवून तो वारला. गालिब त्याचा आवडता शायर. गालिबची एक ओळ आहे.

"बडे बेआबरु होकर तेरे कुचेसे हम निकले.'

त्याच्यावर लिहीलेल्या सुंदर मृत्युलेखात इस्मत चुगताईंनी कळकळीने सांगितलं होतं........

"मेरे दामनपरभी खुन के नजर न आनेवाले छीटे है, जो सिर्फ मेरा ही दिल देख सकता है! वही दुनीया जिसने उसे मरने दिया मेरी ही तो दुनीया है! आज उसे मरने दिया और कल मुझे भी मर जानेकी इजाजत होगी और फीर लोग मातम करेंगे!"

गुलमोहर: 

माझ्या मनातील 'त्रिवेणी' एक अनोखा संगम.

Submitted by किंकर on 29 January, 2012 - 18:34

आज अचानक माझे एक मित्र श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी 'सहज सप्रेम' म्हणून भेट दिलेले,
थोर रचनाकार श्रेष्ठ कवी गुलजार यांचे त्रिवेणी हे पुस्तक हाती आले.
दहा वर्षांपूर्वी वाचून हातावेगळे केलेले हे पुस्तक,आज गतस्मृतींना उजाळा देवून गेले.
पुस्तकात गुलजार यांच्या रचनांचा भावानुवाद कवियत्री शांता ज. शेळके यांनी केलेला आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या या प्रकाशनाच्या मलपृष्ठावर -
'त्रिवेणी' हा गुलजारांनीच निर्माण केलेला कवितेचा नवा आकृतिबंध.
कोणत्याही भारतीय भाषांतील कवितेत हा रचनाबंध नाही.
हि त्यांची कवितेला देणगीच ! या अल्पाक्षरी कवितेत

गुलमोहर: 

संसर्गजन्य जिवाणू

Submitted by पाषाणभेद on 29 January, 2012 - 09:28

आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.

तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.

इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.
इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,
कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.
जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.

मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.

गुलमोहर: 

एका लग्नाची गोष्ट

Submitted by chaukas on 28 January, 2012 - 11:08

दुपारचे ऊन चांगलेच चटकत होते. मी सायकल हाणत फिल्म इन्स्टिट्यूटमधून विद्यापीठाच्या वसतिगृहात पोचलो तेव्हा सुरेश संतापाने फणफणत खोलीच्या बाहेर येराझार्‍या घालत होता. त्याच्या हातात एक तार होती. मला पाहताच त्याच्या कुकरची शिट्टी वाजली. "ही खोली कुणाच्या नावावर आहे? तुझ्या की माझ्या?"

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित