"टुमॉरो ऑनवर्द्स् यू विल हॅन्दल द बिझनेस प्लानींग एरीया! धिस इज अ वेरी गुद अपॉर्च्युनिती फॉर यू अॅज यू विल दायरेक्तली रिपोर्त तू जी एम. प्लीज सी अब्दुर्रहमान अॅण्ड गेत यूर ऑफीस रूम सेत अप प्रॉपरली." माझ्या सौदी बॉस नी मला तोंडीच माझी बदली केल्याच सांगीतल. कारण कागदोपत्री ते करायच तर एच आर वाले टेक्नीकल मॅनपॉवर ला तुम्ही नॉन टेक्नीकल- मार्केटिंग ओरिएंटेड कामा करता कसे काय वापरता असा आक्षेप घेणार. माझ काय, तेच पंप, तेच कॉम्प्रेसर, तेच डिस्टीलेशन कॉलम्स, तेच कंट्रोल व्हाल्व अन पाईपलाईन्स अन तेच शिफ्ट मधले आयुष्य , त्याला मी जाम कंटाळलो होतो. शिफ्ट ड्यूटी मधून सुटका होणार असेल तर मी उत्तर धृवावर ही जायला तयार होतो.
दुसरे दिवशी माझी ऑफीस करता दिलेली रूम साफसूफ करून आयटी वाल्यांकडून कंप्यूटर, फोन सगळ लावून घेत होतो तोच केबिन सोडून शेजारच्या रूम मधून काही बोलण्याचा आवाज येत होता त्याने माझ लक्ष वेधून घेतलं. अब्दुर्रहमान कुणाशी तरी बोलत होता.एखाद्या प्रोफेसरानी विद्यार्थ्याला काही गहन संकल्पना समजावून सांगाव्या तशा आवाजात कुराण हदीस चे दाखले देत साधारण पन्नाशी चा एक गृहस्थ गंभीर पणे बोलत होता. अस्खलित उर्दू मधल ते बोलण मला शब्दशः जरी कळल नाही तरी भावार्थ कळत होता. मी दिसताच अब्दुरर्हमान ने माझी ओळख करून दिली
"ये श्रीकांत साब अपने केमिकल इंजीनीयर है,कुछ दिन पैले छोडके गयेना वो नारायणन साब; उनके जगापे आजसे ये काम देखेंगे."
"और श्रीकांत साब,ये हमारे ऑडीटर साब है; मोहम्मद वहीद. इनसे गलती से भी पंगा मत लेना, कब सामने वाले को बैगन मिलाते तो पता भी नही चलता. आज ही अबी अबी एक गोरे को टपकाके आयेले है!! "
हा अब्दुर्रहमान पण एक अजब वल्ली!! पण त्याच्या बद्दल फिर कभी. तर माझ्याशी बोलायच म्हणून आपल्या हैदराबादी लहजाला बंबईया हिंदीचा तडका देउन त्याने आपला नेहमीसारखा आगाउपणा सुरु केला होता.
"अरे नही नही साहब; ये तो ऐसा ही मसखरा है. इसके बातो पे मत जाईये. हम तो बस अपना काम करते है, और अल्लाहका करम है तबतक करते रहेंगे, इन गोरोंसे क्या डरना? बडी खुशी हुई आपसे मिलके. इण्डियामे कहासे आप?"
"जी मुंबई के पास से,अलिबाग से. अलिबागसे आया क्या ? आपने हिंदी फिल्मोंमे सुना होगा; वो वाला अलिबाग." मी स्वतः वर विनोद करायचा एक क्षीण प्रयत्न केला. ते ही अर्थ समजून थोडेसे हसले.
झाल अस होत की एका गोर्या अमेरिकन मॅनेजर बद्दल त्याने केलेल्या अव्वाच्या सव्वा खर्चा करता ऑडीटर वहीद यांनी प्रश्न उपस्थित केले, अनेक गंभीर आक्षेप घेतले व परिणाम म्हणून टॉप मॅनेजमेण्टने त्या अमेरिकनाची नोकरी वरन हकालपट्टी केली होती. सौदी मधे एकंदरच सगळ्या कंपन्यांमधे गोर्या, त्यातही अमेरिकन लोकांचा जो वरचष्मा आहे ते बघता हे जरा विशेष होत.
पहिले काही दिवस मी नवे काम शिकण्यातच व्यस्त होतो. त्यामुळे ऑडीटर साहेबांशी काही फारस बोलण नव्हत. पण कामावर आल्याआल्या, दुपारच्या जेवणा करता कॅफेटेरिया कडे निघालो की दुआ सलाम व्हायला लागला. बाकी ते त्यांच्या कामात, मीटींगांमधे व मी माझ्या कामात. अस सुरु होत.
मध्यम उंचीचा, गव्हाळ गोर्या वर्णाचा, डोक्यावर केस विरळ होत चालले आहेत असा,रीमलेस चष्मा लावणारा, सगळ्यांशी कमालीच्या आत्मीयतेने बोलणारा हा माणूस चालतांना नेहमी लंगडत चालतो हे मला लक्षात आल होतच. पण एक दिवस लंगडतांना चहर्यावर जरा वेदनाही दिसल्या. चहाचा कप घेउन ते कसेबसे आपल्या केबिनकडे जात होते. मी ही माझा कप घेउन आलो व म्हणालो
"क्या बहुत दर्द है वहीदसाब? लाईये ,आपका कप मुझे दीजीये"
नाही म्हणत म्हणत शेवटी त्यांनी दिला व एक हात गुढघ्यावर व एका हाताने भिंतीचा आधार घेत ते कसेबसे केबिन मधे आले पाठोपाठ मीही.
"अल्लाह आपका भला करे, कंबख्त ऐसा दर्द तो खुदा दुश्मन को भी न दे. जीना दुशवार हो गया है"
मग आमचे थोड गुढगेदुखी याविषयावर बोलण झाल. मी त्यांना मुंबईतल्या नामवंत अस्थिरोगतज्ञ असलेल्या माझ्या बालमित्राचा पत्ता दिला. मग गोष्टी मुंबई बद्द्ल सुरु झाल्या.कॉलेजच्या जमान्यात व नंतर पहिल्या वहिल्या नोकरी मुळे ते मुंबईत बरेच वर्ष राहिले होते. व मी त्यांच्या एका हिंदू मित्रा सारखा दिसतो/बोलतो म्हणून मला बघून त्यांना त्यांच्या त्या स्वर्गवासी मित्राची फार आठवण त्यांना येउ लागली होती. माझे व त्यांचे सूर आता चांगलेच जुळले होते.
असच गप्पांमधे कळल की त्यांच्या पत्नीला मधुमेह झालाय, सध्या सुरुवात आहे इन्शुलीन घ्यावे लागत नाहीये. मी पूरक उपचार म्हणून प्राणायाम करायला सुचवल. रामदेव बाबांची सीडी कॉपी करून त्यांना दिली. देतांना मी काहीसा साशंकच होतो.
"वहीद साब, मुझे गलत मत समझीये, मै ये सीडी दे तो रहा हू आपको. लेकिन आपके मनमे ये इस्लाम के खिलाफ है वगैरा ऐसी बाते तो नही ना? नही तो मै वापस ले जाता हू."
" अरे नही नही ये क्या सोच लिया आपने? आप हमारे हमदर्द है, दिलसे कुछ महसूस करके आप मेरे लिये ये लेके आये और मै ऐसे दकियानूस खयालात करू तो मुझ पर लानत है,लाहौल विला कुवत!! देअर विल बी नथिंग मोर शेमफुल फॉर मी"
मी पुढे म्हणालो "वैसे बात निकली है तो मै इस मामले मे क्या सोचता हू वो बताता हू, ये योग का ग्यान हम भारतवासीयोंकी एक विरासत है. ये वैसा है के किसी बडे खंडहरनुमा हवेली मे दीवारो में हीरे जवाहरात सोना छिपाया होता है और उस हवेली मे रहनेवाले मुफलीसी मे गुर्बत की जिंदगी जी रहे होते है.उन्हे पताही नही होता की उनके पास विरासतमे क्या है. और विरासत पे तो सभीका हक होता है, जितना श्रीकांत का उतनाही वहीद का!"
"वाहवा!! क्या बात कही है आपने!! ये योग तो इक तरह का हमारा अपना इल्म है. और कुरान ए पाक का सबसे पहला कहन है की पढ, इल्म को हासील कर. हदीस मे तो और आगे कहा है, यू शुड अल्वेज बी इन परस्यूट ऑफ नॉलेज. यू शूड अल्सो ट्रॅव्हल टू अॅज फार अॅज चायना इफ यू नीड टू गो" (प्राचीन काळी सिल्क रूट वर व्यापारी प्रवास करत व अरबस्थानातून चीन ला जाण ही एक फारच कठीण बाब होती )
वहीदभाईंच उर्दू सारखं इंग्रजी वरही प्रभुत्व आहे. मी आपल स्पोकन इंग्लिश सुधारायकरता त्यांच्या शी इंग्लिश मधे रोज काही तरी बोलू लागलो.
एकदा असच अब्दुर्रहमान माझी खेचण्याचा प्रयत्न करत होता.
" देखना, आज सचिन सेंचुरी मारेगा और इंडिया हारेगा"
"बकवास!! ये कोरी बकवास है. इफ यू डोण्ट नो द स्टॅटेस्टिक्स, डोण्ट शूट यूवर ब्लडी माउथ!! कीप शट!!"
मी काही बोलणार त्याआधीच वहीदभाई उसळून बोलले. सचिन तेंडूलकर हा अनेक भारतीयांप्रमाणेच वहीद भाईंचा वीक पॉइण्ट!!
"यू नो श्रीकांत, आय शेअर माय बर्थ डे विथ सचिन. व्हॉट ए बॉय, व्हॉट अ बॉय!! जिसे अखलाक कहते है ना उर्दू मे वो है उसके पास, तहजीब है,संस्कार है. जब उसका बंगला बना रहा था तो वहा के पडोसीयोंको लिखा तकलीफ के लिये माफी मांगने वाला उसका खत पढा होगा आपने"
" हा सर जी पढा ना. सचिन का तो ठीक है पर बाकी टीम का क्या ? ये तो कभी कभी जिस तरह हारते है की वो शेर याद आता है."
"के गिरते है शहसवार मैदाने जंग मे, वो क्या लडे जो घुटनोंके बल चले "
"ये बात आप ने दुरुस्त फर्माई, वैसे आपकी उर्दू जुबॉं बडी साफ है आय मस्ट से. आपको तो पताही होगा कहते है उर्दू जुबाँ लखनौ मे पैदा हुई और हमारे हैदराबाद मे जवाँ हुई"
आता एक दोन शेरांचे तुकडे इथे तिथे बोलतांना टाकणे म्हणजे काही उर्दू आली अस तर होत नाही ना. पण मी आपली वडीलांची कीर्ती सांगू लागलो.
"हुजूर, वो मेरे नानाजी की देन है मुझे . उर्दू स्कूल मे पढाते थे पंद्रह अगस्त-छब्बीस जनवरी को स्कूल मे सारा जिम्मा उनका होता था. खवातीनो हाजरात, कहके शुरु हो जाते थे. हेडमास्टर औरो को कहते थे जाहिलो कुछ सीखो रे, बम्मन से कुछ सीखो!! बचपन मे वे क्लासिकल मौसीकी सीखने के लिये घरसे भाग कर ग्वालियर चले गये थे. गवालियर के तब के राजगायक कृष्णराव शंकर पंडित उनके गुरु थे उस्ताद थे. मै बचपन मे रेडिओ पे बीबीसी की हिंदी सभा सुनता था और बादमे उर्दू सभा वे सुनते थे. तो मुझे भी थोडी आने लगी. मेरे नानाजीसे मुझे तीन चीजे मिली.एक क्लासिकल मौसीकी सुनने का शौक. दो ,उर्दू जुबाँ से प्यार.और तीन,अच्छी लिखावट. मेरे घटिया अक्षर देखके बोलते थे ये क्या लिखावट है? आप लिखे और खुदा पढे!!"
"अब आप ने अपने नानाजी के बारेमे कहा तो मै भी अपने दादाजी के बारेमे कुछ कहे बिना नही रह सकता." वहीद भाई.
"ही वॉज इन आझाद हिंद आर्मी. नेताजी सुभाष के साथ थे. अंग्रेजोंके खिलाफ वे लडे थे. बचपन मे मै बडे खुशी से उनसे अंग्रेजोके साथ लडाई के बहादुरी के किस्से सुनता था."
माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.पण नंतर वहीदभाई जे बोलले त्याने मनाला फार वाईट वाटल.
"लेकिन आजादी के बाद कंबख्त हमारी ही गवर्मेण्ट ने सभी आजाद हिंद फौजीयों को अपने फौज मे लेना तो दूर फ्रीडम फायटर करके रेकग्नाईज करने मे भी सालो लगा दिये. मेरे दादाजी वैसे ही दिल मे दर्द लिये चल बसे. अल्लाह उन्हे जन्नत बख्शे!! वहिदभाईनी माझ्या जवळ आपल मन मोकळ केल. मी निशब्द....
इद च्या सुट्ट्या संपल्या. एक एक करत सगळे चाकरमाने भारतातून परत कामावर सौदी मधे दाखल होउ लागले. वहीदभाई पण परतले. चेहर्यावर जरा नाराजी. सौदी वरिष्ठ आपल्या ज्ञानाची कदर करत नाहीत, ज्युनीयर सौदी कामात सिन्सीयर नाहीत आळशीपणापायी काही शिकत नाहीत. याचा त्यांना फार राग. अनेक दिवसांच्या गॅप नंतर ते सारे आता पुन्हा सुरु होणार म्हणून ते वैतागले असावेत अस मला वाटल.
मी ही सुट्टीचा आनंद घेउन नुकताच पण त्यांच्या एकदोन दिवस आधी परत आलो होतो.
"सलाम वालेकुम वहीदभाई, खैरीयत तो है? कैसी रही छुट्टीया?"
"वालेकुम अस्सलाम!! छुट्टीया तो अलहमदुलिल्लाह अच्छी रही. पर वापसीका सफर बडा तकलीफदेह रहा."
"क्यो? क्या हुआ?"
"अरे पुछो मत मिया, बहरिन एअरपोर्ट पे बडी मुश्किल का सामना किया."
"हां? लेकिन हुआ क्या?"
वहीदभाई परतले त्या दिवशी बहरिन विमानतळावर पोलीसांना टिप मिळाली होती की काही पाकीस्तानी ड्रग्ज घेउन येत आहेत. भारतीय अन पाकी लोक दिसायला तर सारखेच.त्यामुळे सगळ्यांचीच कसून चौकशी सुरु होती.
"ऑल पाकीस्तान नॅशनल्स कम इन सेपरेत क्यू, कम इन सेपरेत क्यू" बहरिन विमानतळ पोलीस.
लोक वेगळी रांग लावू लागले. वहीदभाई काही त्या रांगेत गेले नाहीत. एका पोलीसाने वहीदभाईं कडे बोट दाखवून म्हटल.
"यू!!यू पाकी कम इन सेपरेत क्यू." इथेच बिनसल.
"बट आय अॅम नॉट पाकीस्तानी" वहीदभाई.
आता त्या अरब पोलीसाच खाकी डोक फिरलं. एक क्षूद्र इण्डियन/पाकी दिसणारा माझ ऐकत नाही म्हणजे काय?
"कम हिअर आउटसाईद " त्यान वहिदभाईंना बाजुला घेतलं. अन पुन्हा तेच म्हटल
"आय तोल्द यू, यू पाकी कम इन सेपरेत क्यू"
"वेल आय अॅम अॅन इण्डियन. यू कॅन चेक मी, चेक माय ऑल लगेज. आय डोण्ट हॅव एनीथिंग ऑन मी एक्सेप्ट दीज फ्यू किचन स्पायसेस.इफ नॉट अलाउड; यू कॅन टेक दोज अवे. " वहिदभाई.
स्पायसेस म्हटल्यावर पोलीसाला जोर चढला तो वहिदभाईंचा पासपोर्ट हातात घेउन पुन्हा म्हणाला
"स्पायसेस? यू ब्लडी पाकीज, वेत आय विल सी यू"
आता वहीदभाईंच्या संतापाचा कडेलोट झाला. आपल्या अस्खलित कुर्रेबाज इंग्लिश मधे त्यांनी चारचौघात मोठ्या आवाजात त्या पोलीसाची खरडपट्टी काढायला सुरुवात केली.
"यू फूल, आर यू अॅन इल्लिटरेट्? ऑर आर यू डेफ? आय अॅम रीपीटेडली सेइंग यू दॅट आय अॅम अॅन इण्डियन. काण्ट यू सी? काण्ट यू सी धिस थ्री लॉयन्स गोल्डन एम्बलम ऑफ इण्डिया ऑन माय पासपोर्ट? यू मे यूज एनी डॅम वर्ड टू अब्यूज मी; आय विल नॉट बॉदर. बट यू काण्ट मी इन्सल्ट मी बाय कॉलींग मी अ पाकी. आय अॅम अॅन इण्डियन!! गॉट इट? अॅन ई ण्डि य न !!" वहिदभाईंच्या धमन्यांमधून वाहणार आझाद हिंद फौजेतल्या आजोबांच रक्त उसळू लागल होत.
हा हल्लागुल्ला ऐकून त्या पोलीसाचे वरिष्ठ अधिकारी आले. वहीदभाई आता जरा शांत झाले. त्यांच म्हणण ऐकल्यावर त्या वरिष्ठ अधिकार्यानी ही त्यांना झालेल्या त्रासा बद्दल दिलगीरी व्यक्त केली. व शिक्के मारुन त्यांना मोकळ केल.या भानगडीत वहीदभाईंच बहरिन दमाम विमात चुकल. वरिष्ठ अधिकार्याने त्यांची बसने दमाम ला जाण्याची व्यवस्था करायला विमानकंपनी वाल्यांना सांगितल. पण त्या पोलीसाने एक डामरट पणा केलाच. त्याने वहिद भाईंच्या सामानावर लाल फुल्या मारून ठेवल्या व सौदी सीमेवर फोन करून ठेवला. मग तिथे ही वरचा सगळा प्रकार परत एकदा घडला. घरी पोचेतो ऑडीटरसाहेब पुरते वैतागले होते.
नंतरच्या काळात अनेक इंजीनीयर कंपनी सोडून गेल्याने माझी परत बॅक टू पॅव्हेलियन प्लाण्ट ऑपरेशन ला बदली झाली सुदैवाने आता शिफ्ट क्वचितच करावी लागते. लंच करता कॅफेटेरियात वहीदभाईंची गाठ पडली तर ते आवर्जून माझ्या बरोबर येउन बसतात. त्यांचा मुलगाही माझ्याच कंपनीत अकाउण्ट्स मधे आहे.
" अरे भाई एक खुशखबरी है. आपको हैदराबाद आना है अगले मार्च मे. हमारे बेटे मोइद की शादी तय हुई है."
" अरे वा !! बधाई हो, इन्शाल्ला जरूर आयेंगे "
" आपको मेरे लिये एक और जेहमत उठानी होगी."
" हुकुम कीजिये सरकार"
" जुबैल मे मेरे बेटे और बहु के लिये एक फॅमिली अपार्टमेण्ट ढूंढना होगा आपको. ऐसा अपार्टमेण्ट जिसमे अपनी इण्डियन फॅमिलीज पडोस मे हो ताकी मेरी बहु अकेला न महसूस करे."
मी आता अशा अपार्टमेण्ट्च्या शोधात आहे.
http://www.mimarathi.net/node/7958 इथे ही आजच प्रकाशित.
छान लिहीलय. आवडलं
छान लिहीलय. आवडलं
छान लिहीले आहे, आपण चांगल
छान लिहीले आहे, आपण चांगल राहीलो तर लोक निश्चीतच मदत करतील.
एव्हान छान फ्लॅट मिळाला असेलच !
मस्त. आवडेश.
मस्त. आवडेश.
मस्तं...
मस्तं...
छान लिहिलंय. ही व्यक्ती
छान लिहिलंय. ही व्यक्ती तुम्हाला साहेब म्हणून मिळाली याचा तुमच्या इतकाच मला पण आनंद झाला.
छान लिहीलंय श्रीकांत. परदेशात
छान लिहीलंय श्रीकांत. परदेशात गेल्यावर माणसांतल्या अनेक भींती गळून पडत असाव्यात. त्यातलंच हे एक उदाहरण.
आवडले.
आवडले.
श्रीकांत साहेब, छान
श्रीकांत साहेब,
छान जमलाय लेख,
श्रीकांत, इथे इंग्लंडमध्येही
श्रीकांत, इथे इंग्लंडमध्येही अशीच परिस्थिती आहे. भारतीय आणि पाकी लोक दिसायला सारखेच. सुक्याबरोबर ओलंही जळतं या न्यायाने आमचाही उद्धार होत असे. शेनगन व्हिसासाठी फ्रान्सच्या वकिलातीत कपाळावर टिळा लावून गेलो होतो. काही अडचण आली नाही. भारतीय म्हंटलं की इथल्या लोकांच्या नजरा सुधारतात.
आ.न.,
-गा.पै.
अलिबागसे आया क्या ? आपने
अलिबागसे आया क्या ? आपने हिंदी फिल्मोंमे सुना होगा; वो वाला अलिबाग.>>>>>
श्रीकांत,
आपल हे विधान चुक आहे..... "अलिबागसे आया क्या ?" मधल अलिबाग महाराष्ट्रातील नसुन उत्तर प्रदेशातील आहे...
मी स्वःत अलिबागकर आहे त्यामुळे नमुद केल.
होय अलिबाग से आया क्या हे
होय अलिबाग से आया क्या हे विधान ते गाव कुठल ही असल तरी चूकच आहे. मी सतरा वर्ष अलिबागला राहिलोय अन अजूनही माझ घर अलिबाग लाच आहे.मी ही तुमच्यासारखाच अलिबागकर आहे. मलाही ते वाक्य आवडत नाही माझा परिचय दिल्यावर दुसर्या कोणी हे वाक्य म्हणू नये याकरता मीच स्वतःवर विनोद करून टाकतो.
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.
छान ओघवतं लिहील आहे वेगळा
छान ओघवतं लिहील आहे
वेगळा अनुभव समजता आला.