आसक्ती

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 19 April, 2012 - 02:37

जवळपास गेला महीनाभर मी नेट पासुन दूर होतो. आज आलोय, पुन्हा आपल्यात आल्यासारखं वाटते. खरीगोष्ट म्हणजे आपण अजुनही एकमेकांना पाहीलेले नाही. परंतु मायबोलीने म्हणा किंवा आपल्या सारख्या सहकार्‍यामूळे एवढी आसक्ती झाली आहे की दिवसभरात किती तास आपण वा मी नेटवर घालवत आहोत कळत नाही.
तर सांगतो की गेली महीनाभर आपल्या पासुन दूर होतोच पण मनाने दूर होता येत नव्हतं या काळात काम तर होतेच पण बाकी वेळ घालवायचा म्हणुन काय करावे तर घरी सौ. ने नर्मदे हर हर हे आपले पुणेकर श्री जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक घरी आणलेले होते. एकदा वाचायला घेतले तर मन एवढे तल्लीन होत गेले की पुस्तक सोडवेचना, वाचताना त्यांनी जी नर्मदा परिक्रमा केली त्याचे एवढे आश्चर्य व कौतुक वाटते की आपणही या जगात छोट्या गोष्टीतही किती आसक्त आहोत त्यांनी केलेल्या ३ परिक्रमांमधुन जो बोध घेतला तेवढा आपल्या अंगी येणे शक्य नाही. परिक्रमाही होईल कि नाही याचीही शाश्वती नाही. निदान ते पुस्तक वाचुन जीवना काही गोष्टीची आसक्ती सोडली तर फायदा होईल याचा मला आनंद वाटतो.
आज आपल्या आलो. कित्येकांनी चांगले साहीत्य लेखन केले असेल. कोणी काय लिहीले. गगोवर काय गोष्टी झाल्यात. मी का नव्हतो येथ पर्यंत . माझे त्यांच्या लेखनावर प्रतिसाद का नाहीत. हे सगळे विचार मनात चालुच होते. पण बराच विसर पडायचा. कारण आपल्याशी एवढे जोडल्या गेलो की सहजासह्जी दूर होता येत नाही.
आणखी म्हणजे ऑफीस कामे आटोपली रे आटोपली की सरळ टेबल-टेनिस खेळायला पळालेलो असायचो. येथे एक मात्र आपण खेळात गूंतलो की दुसरा विचार नसतो, एकवेळ देवघरात आपण जपमाळ ओढताना माणसाचे दुसर मन विचलीत असतेच, ते दुसरा असा काहीतरी विचार करित असते. खेळात मात्र आपले मन तल्लीन झालेले असते, ते दुसरा विचारच करीत नाही.
असो योगायोगानी आज कार्यालयातील एका अधिकार्‍याने त्यांचे वाढदिवसा निमित्त वाटलेले श्री गाडगेबाबा यांचे श्री प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीलेले पुस्तक भेट म्हणुन मिळाले. येथे ही त्यांनी आसक्ती सोडावी असेच सुचविले आहे. असो जे घेता येईल ते घ्यायचा प्रयत्न आहेच.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

पटलं!

'नर्मदे हर' पुस्तक वाचल्यावर मतपरिवर्तन होउ शकतं!
तुमच्या आयुष्याकडे पहाण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन मिळतो.

Happy

मुक्तेश्वर तू फक्त आणि फक्त निरागस ह्या वर्गवारीत मोडतोस मित्रा.

तुझी निरागसता देव सर्वांना देऊ करो.

- 'कणखर'

खरे आहे, पुस्तक वाचल्यानंतर प्रभाव सर्वांवरच पडतो, पण दोन तिन दिवस राहतो, काही जणांच्या बाबतीत महिना पर्यंत, नंतर जय श्रीराम.

Happy बाकी मस्तच