रात्र

Submitted by एडी on 18 April, 2012 - 03:06

एक काळोखाचा आविष्कार...

रात्र तस पाहायला गेल तर एक संपलेला दिवस...

पण ती खर तर एका नव्या दिवसाची सुरुवात असते..

काही रात्री कुणाच्या आठवणीत बुडालेल्या...तर काही मदहोश करून टाकणाऱ्या...

काहींना आवडतं रात्रीत बुडून जायला...त्यातलाच मी एक....

दिवसापेक्षा मी खर तर रात्रीची वाट पाहत असतो... दिवसभराच्या धकाधकीतून एक रात्रच आपली असते जी आपली हक्काची वाटते...

ना कुणाला प्रश्न विचारण...कि ना कुणाला उत्तर देण...

काळोख असा एन्जोय करावा असा...

आपल्याशी संवाद साधण्याची अचूक अशी वेळ...

आपण काय केल... काय करणार आहोत...साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तुम्हाला...

एकदा अनुभवून पहा हि...

नितांतसुंदर रात्र...

गुलमोहर: 
शब्दखुणा: