कादंबरी

तुम्हे याद हो के न याद हो - १३

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2011 - 00:31

हसण्यावारी नेण्यासारखा प्रकार नव्हता तो! हळूहळू वाड्यात सगळेच समजायला लागले. शैलाचे लग्न एका रात्रीत, तेही आदल्याच रात्री आणि भर कार्यालयात का मोडले यावर ग्रूप्समध्ये प्रचंड कुजबूज होऊ लागली. तीही शैला आप्पाच्या घरात पाऊल ठेवतीय तोवर! त्या जमान्यात हा असा प्रकार म्हणजे खूप काही होते.

एका मुलीच्या लग्नासाठी अख्खा वाडा सजतो आणि ती वाड्यातून कार्यालयात निघताना रडतो. आणि दुसर्‍या दिवशी काय तर ती मुलगी ठरलेल्या स्थळाला कार्यालयातून हाकलून देऊन वाड्यातीलच एकाशी लग्न करून वाड्यातच परतली आहे.

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - १२

Submitted by बेफ़िकीर on 29 June, 2011 - 03:56

एकंदर प्रकार असा झालेला होता की उमेश आणि नितु यांच्यात मैत्री असण्यात आपटे कुटुंबियांना अडचण नाही हे वाड्याला समजलेले होते आणि राईलकरांना कधी अडचण नव्हतीच!

या कालावधीत बिचारा आप्पा चौकात झोपणार म्हणून विन्याने त्याला आपल्याकडे झोपायला ठेवून घेतले.

आणि वाड्यात एक नवी कोरी करकरीत सुखद बातमी मिळाली. राहुल्याची मोठी बहीण शैलाताईचे लग्न जुळले, ठरले आणि तोंडावरही आले.

कर्‍हाडचा एक मुलगा आणि त्याचे आईवडील व मोठा भाऊ येऊन तिला बघून गेले. बघितल्या बघितल्याच पसंती झाली आणि बैठकही तिथेच!

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - ११

Submitted by बेफ़िकीर on 24 June, 2011 - 04:45

कॉलेजला जायला म्हणून नीतू घराच्या दारातून बाहेर पडली आणि नेमका समोरून उमेश आला आणि तिच्याकडे खुळ्यासारखा पाहातच राहिला. ती नजरानजर सहन न होऊन निवेदिता पापण्या झुकवून हासत हासत सायकल घेऊन वाड्याच्या बाहेर पडली.

तमाम वाड्याला, उमेश आणि नीतूसकट सगळ्यांना, कळलेले होते की आपटेंनी आजोबांची माफी मागीतली, त्यांच्यात समेट झाला, आजोबा 'उमेश - नीतू' या बाबतीत जरा अधिकच सूचक बोलत होते आणि ते विचार आपटे तसेच राईलकर या दोन्ही घरातील जे कोण सदस्य तेथे उपस्थित होते त्यांना आवडतही होते.

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - १०

Submitted by बेफ़िकीर on 21 June, 2011 - 03:29

संतापाने थरथरत आपटे आपल्या पत्नीकडे पाहात होते. सकाळी उठल्या उठल्या त्यांनी जाहीर केले होते की अकरा वाजता गुरुवार पेठेत शिफ्ट व्हायचे आहे. आणि ते ऐकून रडवेला चेहरा करून निवेदिता सरळ कॉलेजलाच निघून गेली होती. शिफ्टिंगमध्ये मी काडीचा हातभार लावणार नाही हे तिने कृतीतून स्पष्ट केलेले होते. आणि आपटे मात्र युद्धपातळीवर पहिल्याच आठवड्यात ही जागा सोडायच्या मागे लागलेले होते.

एक आठवडा! फक्त एक आठवडा! काय होऊ शकते एका आठवड्यात? प्रेम जमू शकते? हिंदी चित्रपटासारखे??

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - ९

Submitted by बेफ़िकीर on 15 June, 2011 - 02:03

"मला काहीही माहीत नाही... क्षमाने आग्रह केला म्हणून ऐन पहाटे जायला निघालो... तर क्षमाचाच क्लास होता.. आमचे तिघांचेही ठरले की ताबडतोब घरी यायचे... पण क्षमाने पुन्हा आग्रह केला आणि आम्ही दोघेच सिंहगडावर गेलो... तेथे क्षमाचा ग्रूप होता.. पण ते परत निघालेले होते... आता सिंहगड चढून वर गेल्यानंतर लगेच काय उतरायचं म्हणून थोडा वेळ फिरायचे ठरले.... पण भयंकर पाऊस आला आणि आम्ही दुपारपर्यंत अक्षरशः अडकलो... यात तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसतोय तेच मला समजत नाही... क्षमा सांगतीय, मी सांगतोय तरीही विश्वास नाही याला काही अर्थच नाही... "

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - ८

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2011 - 05:55

मी माझ्या सदस्यत्वाचे नांव बदलले तेव्हा कोणीतरी ते नांव घेतले. म्हणून मी माझ्या मूळ नावाने एक आय डी तयार करून ठेवला व चुकून हा भाग त्या नावाने प्रकाशित झाला. आता 'बेफिकीर' याच नावाने प्रकाशित करत आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

"नीतू... मी भाजी घेऊन येते... अभ्यासाला बस..."

"होSSSSSSयSSSS... "

एक नित्याचा चिडका स्वर!

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - ७

Submitted by बेफ़िकीर on 10 June, 2011 - 03:39

माणसाने पैसा आणि निसर्गाने प्रेमभावना निर्माण केली नसती तर जग खूप वेगळे असते. स्वतःलाच पुन्हा निर्माण करत राहणे या हेतूने निसर्गाने मानवी मनात पेरलेल्या भावनांचा उद्रेक होऊन पुढे निसर्गाच्या मूळ हेतूव्यतिरिक्तही कित्येक असे वेगळेच आणि केवळ मानवी हेतू साध्य होत राहतील याची निसर्गाला कल्पना नसेल असे नाही. असेलच कारण त्यानेच सर्व निर्माण केले. पण....

.... पण मानवाने स्वतःच स्वतःच्या सुरक्षितेततेसाठी निर्माण केलेले सामाजिक कायदे आणि निसर्गाकडुन मिळालेल्या भावना या दोनमधील युगानुयुगे चाललेले युद्ध अजूनही चालूच राहणार आहे.

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - ६

Submitted by बेफ़िकीर on 8 June, 2011 - 07:16

'तू किसी औरकी जागीर है ओ जाने गझल
लोग तुफान उठायेंगे मेरे साथ ना चल'

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - ५

Submitted by बेफ़िकीर on 6 June, 2011 - 10:47

थंड हवेच्या ठिकाणी सूर्य उजाडता उजाडता आजूबाजूची मैलोनमैल पसरलेली मुलायम हिरवळ दिसू लागावी..... त्यातच एका गुलाबाच्या रोपाला एकही काटा नसावा आणि त्याची पहिलीवहिली लाल रंगाची कळी अलगद उमलावी... तीवर सूर्याचा पहिला किरण पडावा आणि त्या कळीने कुमारिकेच्या लज्जेने आपल्या रंगावर शरमेची सोनेरी झळाळी चढवावी... पहिल्या वार्‍याच्या सुखद झुळका अंगाला स्पर्शून जाताना सांगत असाव्यात.. निसर्गाच्या आणि मानवी मनासाठी असलेल्या सुखाच्या शिखरबिंदूवर तू आत्ता आहेस... त्या कळीचा नवानवेला सुगंध आसमंतात विखुरतानाच त्या सुगंधाने मोहरलेली हिरवळ डोलू लागावी...

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - ४

Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2011 - 03:47

"कुठल्या कॉलेजलाय गं ती?"

"निवेदिता?"

"हं?"

"गरवारे"

"काय करते?"

"कॉमर्स.. एफ वाय"

"......."

"दादा... तिचे वडील सब इन्स्पेक्टर आहेत.. वाटत नाहीत नाही?"

"त्यात काय वाटायचंय?... तू तरी कुठे वाटतेस यडचाप असशील असे?"

"गप्प बस.. "

"वरून तरी तशी शहाणीच वाटतेस.."

"तू वरूनही यडचाप दिसतोस आणि खराही यडचापच आहेस..."

"मोठ्या भावाला असे बोलू नये.."

"मोठ्या भावाने स्वतःचा आदर ठेवून घ्यायला शिकावा आधी.. चल मला उशीर होतोय.."

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी