कादंबरी

तुम्हे याद हो के न याद हो - ३

Submitted by बेफ़िकीर on 27 May, 2011 - 04:13

राहुल - तुला आता कमी करायला लागेल विन्या दारू

विनीत - का?

राहुल - आता तू एकटा राहणार मुंबईला ... मग फार होईल.. आत्ताच नियंत्रण ठेवावे लागेल..

प्यासामधली आज ही शेवटची भेट होती. विनीत मुंबईला जाणार म्हणून! एका आठवड्यात तो निघणार होता. अक्का एका डोळ्याने हासत होत्या आणि एका डोळ्याने रडत! भुमकर काकू मात्र पहिल्या दिवशी वचावचा ओरडल्या तेवढ्याच! नंतर अचानक गंभीर होऊन टिकूटुकू बघत फक्त होत्या.

मुंबई! महिना तीन हजार! मागे कधीतरी दिलेल्या आणि विसरूनही गेलेल्या मुलाखतीचे आज मिळालेले फळ!

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - २

Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2011 - 03:28

"दादा? ती समोर राहायला आलेली निवेदिता तुझ्या शाळेत होती का रे?"

धाकटी बहिण क्षमाने घरातील सर्वांसमोर हा प्रश्न विचारल्यावर आपल्यातील उत्साह फार वाटू नये म्हणून अत्यंत विचारात पडल्यासारखा चेहरा करत उमेश म्हणाला..

"हो का? मलाही जरा पाहिल्यासारखा वाटला चेहरा.. काय करते ती??"

गुलमोहर: 

तुम्हे याद हो के न याद हो - १

Submitted by बेफ़िकीर on 23 May, 2011 - 04:12

"कटकटे स्साली"

सायंकाळी सहा वाजता रास्ते वाड्यातील प्रमुख चौकातील एका चौथर्‍यावर विनित, उम्या आणि अप्पाच्या शेजारी बसून राहुलने वैताग व्यक्त केला. विनितच्या हातात बॅट, उम्याच्या हातात स्टंप म्हणून वापरले जाणारे फळकुट, अप्पाच्या हातात बॉल आणि राहुलच्या हातात त्याच्या नव्या स्लीकची किल्ली होती.

आज क्रिकेट खेळताच येत नव्ह्ते.

कारण साडे पाच वाजल्यापासून समोरच्या दोन रिकाम्या खोल्यांमध्ये सामान येऊ लागले होते. कपाट, बेड, एक दिवाण, एक टीव्ही, फ्रीझ, काही बॅगा! संपतच नव्हते.

गुलमोहर: 

सावट - ११ - अंतिम भाग

Submitted by बेफ़िकीर on 21 May, 2011 - 04:37

मायबोली प्रशासनाचे मनापासून आभार की ही कादंबरी येथे प्रकाशित होऊ दिली. या कादंबरीची मूळ कल्पना श्री. मंदार जोशी यांची! मला ती कल्पना कितपत जमली ते कृपया कळवावेत. सर्व प्रतिसादक, चुका सांगणारे तसेच सर्व वाचक यांचाही मी ऋणी आहे.

ही कादंबरी (सस्नेह) गगोवरील माझ्या सर्व मित्रांसाठी बहाल!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!
===========================================

बाहेरच्या कुणीही आत्ता आत डोकावून पाहिले असते तर 'हे काय खुळ' म्हणून वैतागून तेथून निघून गेले असते.

गुलमोहर: 

सावट - १०

Submitted by बेफ़िकीर on 20 May, 2011 - 06:45

सर्वांना सप्रेम नमस्कार! सावट या कथेचा अंतिम टप्पा आलेला आहे व बहुतेक अंतिम भाग उद्या प्रकाशित होईल. प्रतिसादकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाचा मी अत्यंत ऋणी आहे. चुकले माकले माफ करा. हा भाग कसा वाटला तेही कळवा. काहीसे आडवळणाने मुद्दाम लिहीले आहे. मायबोली प्रशासनाचेही आभार!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

========================================

सकाळचे आठ वाजले होते.

गुलमोहर: 

सावट - ९

Submitted by बेफ़िकीर on 20 May, 2011 - 04:01

"मनू"

अजितच्या तोंडातून हे नांव ऐकल्यानंतर व्हायचे तेच परिणाम झाले. अर्चना किंचाळून ते खोटे आहे हे ठसवायचा प्रयत्न करू लागली. सतीश थक्क होऊन आपण काय ऐकले त्यावर विचार करत अजितकडे खिळल्यासारखा बघू लागला. मावशी आणि नमा दोघींना प्रचंड धक्का बसला. अविश्वसनीय बाब ऐकायला मिळाली होती. पण सर्वात आधी सावरल्या त्या मावशी!

मावशी - तुला... मी.. हाक काय मारायची???

अजित - अजितच म्हणा... तुम्हाला हे शरीर अजित कामत म्हणूनच माहीत आहे..

गुलमोहर: 

सावट - ८

Submitted by बेफ़िकीर on 19 May, 2011 - 05:14

भूत! अमानवी! मानवाच्या डोळ्यांना दिसेलच असे नाह, कानांना ऐकू येईलच असे नाही अशा बाबी विश्वात, निसर्गात आणि आपल्या आजूबाजूला असतात यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न!

पण एक गोष्ट मानवाला अजूनतरी अजिबात समजलेली नाही की मेल्यावर काय होते? शरीर मरते म्हणजे काय होते हे वैद्यकीय दृष्ट्या सांगणे शक्य आहे. हृदय बंद पडते. किंवा मेंदू बंद होतो आणि त्यामुळे दोन ते तीन मिनिटात सगळ्याच क्रिय बंद पडतात आणि शरीर मरते. काहीही!

गुलमोहर: 

सावट - ७

Submitted by बेफ़िकीर on 18 May, 2011 - 02:37

अडसुळ आणि पब्लिक पळून जाताना पाहिले तेव्हा गावालाही धक्का बसला. गेस्ट हाऊस पेटवून टाकावे किंवा त्या भागात अजिबात वावर ठेवू नये अशा विचारापर्यंत लोक आलेले होते. पेटवण्याची इच्छा असणारे खूप आक्रमक होते, पण गस्तीस आलेल्या नव्या पोलिसांच्या भीतीने गप्प होते इतकेच! अडसुळ आणि माने वगैरे अधिकारी काय पाहिल्याने भिऊन पळाले असतील हेच गावकर्‍यांना समजत नव्हते. गेस्ट हाऊसबाबतचे गूढ अधिकाधिक गडद होऊ लागलेले होते. आजवर शांत आणि दुर्लक्षित असलेले दिवे गाव गेल्या चार दिवसांपासून अचानक हादरू लागले होते. भीती! भीती, भय, दहशत अशा प्रकारच्या भावना प्रथमच गावाच्या मनात येऊ लागल्या होत्या.

गुलमोहर: 

सावट - ६

Submitted by बेफ़िकीर on 16 May, 2011 - 06:46

तमाम पब्लिकने खडबडून जागे होऊन मावशींच्या गेस्ट हाऊसची आता दखल घेतली. घटनाक्रम चकीतच करणारा नाही तर चरकवणारा होता.

मनीषा काकडेचा गंभीर मृत्यू, पाठोपाठ काका थोरात मरणे व त्यातच त्याचे प्रेत उठून बसणे आणि गायब होणे, गेस्ट हाऊसमध्ये काहीतरी गोलमाल आहे याची कल्पनाही नसताना तिसर्‍याच दिवशी पहाटे आपटे आजोबांची आत्महत्या आणि त्यानंतर चक्क पोलिस पाटील झुंबर गोरे यांचा मृत्यू गुत्यापाशी होऊनही बाजी आणि रामोशी शपथेवर सांगतायत की झुंबर गोरे आणि बाजी व रामोशी असे तिघे काल रात्री गेस्ट हाऊसवर तपासणीसाठी गेलेले होते व तेथे त्यांना मनीषा काकडे आणि आपटे आजोबा दिसले!

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी