कादंबरी

द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ९

Submitted by बेफ़िकीर on 25 February, 2011 - 09:24

आज सुटका!

वाघसाठी अनेक वर्षांनी, नसीमसाठी तर मरणाच्या दाढेतूनच, मुल्लासाठी एका नव्या आयुष्याला चांगली सुरुवात करण्यासाठी, आकाशसाठी स्वातंत्र्य देणारी आणि...

.... संजयबाबूसाठी आठवा मर्डर करायला परवानगी देणारी... किंवा मग... एखादवेळेस नववाही!

निर्मल जैन... आणि द डेप्युटी इन चार्ज ऑफ द जेल... नवले...!

पहाटे साडेपाचला अलार्म झाला.. संपला कालच दिवस आणि रात्र... आजचा दिवस सुरू... सुटकेचा दिवस.. सगळे जागेच होते रात्रभर खरे तर... पण एक प्रथा म्हणून चुळबुळत उठून बसले... एकाच्याही चेहर्‍यावर सहजता उरलेली नव्हती... ताण.... नुसता ताण... आणखीन ताण... फक्त ताण.. !!!

गुलमोहर: 

घर - १६

Submitted by बेफ़िकीर on 25 February, 2011 - 06:15

लघुरुद्राच्या दिवसापासून घरात पुर्वीसारखेच हासरे वातावरण तयार झाले. गौरीला आता स्वीकारले गेले होते. बर्‍याच अंशी! काही प्रमाणात अंजली व तारका या दोघींचे इगो हर्ट झाले होते हे खरेच! आजवर जिला बोलायचो तिची माफी मागावी लागणे हे काही साधे काम नव्हते. पण कुमारदादा आणि शरद या दोघांनी लघुरुद्राच्या आदल्या दिवशी दोघींना भयंकर झापले होते. आजवर झालेल्या प्रत्येक गोष्टीतील त्यांचे दोष त्यांना दाखवून दिलेले होते. त्यामुळे त्या दोघींनी घाबरून जाऊन गौरीकडे येऊन तिची माफी मागीतली होती. दरम्यान वसंताने मात्र कुमारदादाच्या घरी जाऊन सर्वांसमोर मनातली भडास काढली.

गुलमोहर: 

द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ८

Submitted by बेफ़िकीर on 22 February, 2011 - 08:47

मिनीच्या ओठांचा कच्चकन चावा घेऊन नवलेने आपल्या पुरुषी ताकदीचे तिला प्रत्यंतर दिल्याच्या आनंदात अभिमानाने तिच्याकडे पाहिले. जीवघेणी कळ आल्यामुळे मिनीने तोंड फिरवले होते आणि मूठ ओठांवर दाबलेली होती.

"क्या साब... आहिस्ता जरा..."

"आहिस्ता करेगा वो मर्द थोडी होता है??"

"खून आ जाता.."

"वो भी पी लेता मै.."

गुलमोहर: 

जलजीवा (१६ भाग एकत्र)

Submitted by निमिष_सोनार on 21 February, 2011 - 05:20

[माझी आतापर्यंत क्रमश: प्रसिद्ध झालेली कादंबरी "जलजीवा" ही आता येथे पुन्हा वाचकांच्या सोयीसाठी सर्व १६ भाग एकत्रीत करून देत आहे]

(भाग-1)
लंडन शहरातल्या ट्यूब (लोकल ट्रेन्स) मध्ये प्रवास करत असतांनाच त्याला तो कॉल आला. असा एक कॉल ज्याने आपले आयुष्य खुप बदलणार आहे, आपले ते पूर्वायुष्य आपल्याला पुन्हा भेटणार आहे याची त्याला पुसटशीही जाणीव नव्हती.

गुलमोहर: 

द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ७

Submitted by बेफ़िकीर on 21 February, 2011 - 03:33

क्वीन मेरी चर्च!

तेरा तारीख उजाडली तरी कुणालाही समजत नव्हते की नक्की भानगड काय आहे? क्वीन मेरी चर्चच्या व्हिजिटच्या दिवशी आपण नक्की कसे सुटणार आहोत किंवा सुटू शकतो?

नुसतेच आपले चौघे सगळीक्डे लक्ष ठेवून होते. दिनचर्येची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. मात्र आज चक्क यु़झ अ‍ॅन्ड थ्रो वाले रेझर्स मिळाले. आता हे रेझर्स निदान महिनाभर तरी वापरता येणार असे आकाशला वाटले पण कुणीतरी त्याला सांगीतले. दाढी करून झाल्यानंतर रेझर परत द्यावा लागतो. नाहीतर रेझरने मारामारी करण्यापर्यंतही कैद्यांची धाव जाते. काही का असेना, आपली आपली दाढी करून सगळे जरा बरे दिसू लागलेले होते.

गुलमोहर: 

घर - १५

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2011 - 23:48

दुपारी दोन ते संध्याकाळी सात!

इतका वेळ एकाच जागी बसणे परवडत तर नव्हतेच, पण वसंताचा स्वभाव लक्षात घेता ते शक्यही नव्हते. सतत काही ना काहीतरी करत असणारा वसंता आज एकाचजागी पाच तास नुसता बसून होता. एखादा असता तर दारू प्यायला गेला असता, एखादा असता तर मित्रांबरोबर टाईमपास करत बसला असता. कारण संसारात न रमू शकणार्‍या मनाला रमवण्याचे हेच सर्वश्रुत उपाय होते पुरुषांसाठी!

पण वसंता कोथरुडजवळील मृत्यूंजयेश्वर मदिराच्या ओसरीवर बसून होता. अनेक भाविक येऊन शिवाचे दर्शन घेऊन जात होते. सगळ्यांना तो दिसत होता, पण त्याला सगळे दिसूनही दिसत नव्हते.

गुलमोहर: 

द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ६

Submitted by बेफ़िकीर on 15 February, 2011 - 03:26

नवलेच्या क्वार्टरपर्यंत जाणे शक्यच नव्हते आणि तिथ जाऊन मोबाईल शोधणे तर दुरापास्तच! दोनच दिवसात विविध मार्गांनी ती परवानगी मिळवण्याचे निष्फळ प्रयत्न करून वैतागून सगळेच आत्ता दुपारी चार वाजता बरॅकमध्ये बसलेले होते. आज खेळायला परवानगी नव्हते म्हणे काहीतरी कारणाने, त्यामुळे वैतागलेलेही होतेच! आणि त्यातच..........

"राजासाहब आप???"

गुलमोहर: 

घर - १४

Submitted by बेफ़िकीर on 14 February, 2011 - 03:13

संशयाची भावना मनातून जाणे शक्यच नव्हते. गौरीने स्पष्टपणे सांगीतले की तिच्या आधीच्या कुटुंबाच्या अपघाती निधनानंतर तिला एका 'समजणार्‍या' माणसाने दर अमावास्येला लिंबु, मिरची, हळद व कुंकू परसात ठेवायला सांगीतलेले होते. तेही तिन्हीसांजा होताना! याचे कारण म्हणे असे होते की ती अभद्र छाया, जी त्या तिघांना संपवून गेली, ती आता राहू नये म्हणून! अर्थात, गौरीला तेव्हा जगावेसेही वाटत नव्हते. तिची आई मात्र हे करत होती. पण वसंताशी लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आयुष्यात आलेल्या गौरीला जाणवले की आपल्याला असे असे सांगण्यात आलेले होते आणि या घरात आपल्याला अपशकुनी समजले जाते.

गुलमोहर: 

द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ५

Submitted by बेफ़िकीर on 11 February, 2011 - 07:38

'जपानला पुन्हा भुकंपाचा धक्का'

'मुंबई हैदराबाद बसला भीषण अपघात, १६ ठार'

'आज गानकोकिळा पुण्यात'

'सोने कडाडले'

'काय सांगता'

'बुडणार्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात युवक स्वतःच ठार'

'बदल्यांचे अधिकार पुन्हा कृषी आयुक्तांना'

'राजधानी परतीच्या प्रवासात रतलामला थांबणार'

'सुलभ कररचनेचे सुतोवाच'

'गावनिहाय पॅकेज हवे'

'तापमान - हलक्या सरी येण्याची शक्यता'

'पीएला केले कार्यमुक्त'

'द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या पाचशे जागा वाढणार'

'उपसंचालकांना घेराव'

'पंपचालकाची पाठराखण'

'आयटीआय आंदोलन प्रकरणी पाच जण ताब्यात'

'कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या शाळांचा घसरला दर्जा'

गुलमोहर: 

घर - १३

Submitted by बेफ़िकीर on 11 February, 2011 - 03:16

गौरीला विलक्षण आनंद झाला होता.

सकाळी कुमारदादा आल्यापासूनच तिला समजले होते की आज आपल्या या नवीन घरात सगळे येणार! आईबाबांची समजूत घालायला!

आणि तिने कुमारदादाच्या हातात चहा ठेवून ताबडतोब गगनला घेऊन डेक्कन कॉर्नरकडे धाव घेतली. तीन भाज्या विकत घेऊन आणि वसंताच सांभाळत असलेल्या डेक्कनवरील चितळ्यांच्या शाखेतून श्रीखंड घेऊन ती लगबगीत घरी आली.

गगनने तुफान वेगाने हालचालींना सुरुवात केली आणि गौरीने जमेल तितक्या पटापटा स्वैपाक सुरू केला. वसंताशी दादा बोलत होता. आई आणि बाबा तिथेच बसलेले असले तरीही ते एक शब्दही बोलत नव्हते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी