अंदमानातील आपले नग्न पूर्वज

Submitted by sumant_jo on 13 July, 2012 - 00:15

अंदमानच्या इतिहासाबद्दल भारतीय माणसाला फार माहीत नसत. बहुतेक लोकांना तिथल्या सृष्टी सौंदर्याबद्दल आणि सेल्यूलर जेलबद्दल थोडाफार माहीत असतं. एकदा तर मला कुणीतरी “तिथे जाण्यासाठी पासपोर्ट लागतो का” असही विचारलं. भारतीय नौदलात असतांना मी अंदमानात चार वर्ष काढली तेव्हा तिथल्या इतिहासाबद्दल खूप शिकलो. पुढे मधुश्री मुखर्जी यांच्या “The Land of Naked People” पुस्तकाच मी मराठीत भाषांतर केलं. त्यातलीच एक छोटीशी गाथा.
front page small.JPG
“योहान्न विलियम हेल्फर हा ऑस्ट्रिया देशाच्या प्राग शहराचा रहिवासी होता. त्याच नवीनच लग्न झालं होतं आणी व्यवसायाने तो डॉक्टर होता. त्याचा छंद मात्र सृष्ट पदार्थ होता. त्या छंदापाई तो नेहेमी भारतात प्रवास करण्याची स्वप्न पाहत असे. ती स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून तो दुखी होत असे. शेवटी त्याच्या पत्नी पौलाईनन विचार केला “हा माणूस काही बदलणार नाही. आपल्याला आता भारतात जाण्याशिवाय गत्यंतर नाही”. १८३५ साली दोघ पती पत्नी इटलीच्या त्रिएस्ते शहरातून निघाले आणि मजल दर मजल कोलकाता शहरात पोहोचले.
कोलकात्याला हेल्फरच स्वप्न शेवटी साकारल. ब्रिटिश सरकारने त्याला सृष्टपदार्थवेत्ता नेमल आणि त्याला कोळसा शोधण्याच कामही देण्यात आल. हा कोळसा वाढत्या ब्रिटिश साम्राज्याला अतिशय महत्वाचा होता. पुढे हेल्फर पती पत्नी ब्रह्म देशात स्थायिक झाले. पौलाइनने लगेच घर लावल आणि बागेत कॉफी, सुपारी, नारळ वगैरे झाड लावण्यात ती दंग झाली. नवर्‍याने मात्र अंदमानात जाऊन यायचं ठरवलं. त्या बेटांबद्दल त्याने इतक काही चमत्कारिक ऐकल होत की ‘तिथे कधी जाईन’ असं त्याला झालं होत. बायकोला मात्र खूप भीती वाटत होती पण त्याच्या वेडेपणासमोर इलाज नव्हता. जानेवारी १८४० मधे तो केथरिना नावांच्या एका छोट्याशा शिडाच्या जहाजातून निघाला. प्रवास सुरू होताच जहाज एका जबरदस्त अंदमानी समुद्री वादळात सापडलं. झंजावाती वार्‍यांना तोंड देत देत ते कसेबसे कुठल्याशा बेटानजीक पोहोचले.
हेल्फरन आपल्या रोजनिशीत लिहिल “किनार्‍यावर मला एक काळा कभीन्न नागडा माणूस दिसला. हाच तो अंदमानी निग्रो. थोड्या वेळात, आणखीन एक आला आणि मग रीघच लागली. पण त्या लोकांनी आमची जराही दखल घेतली नाही”. वादळामुळे किनार्‍यावर उतरण शक्यच नव्हतं. जहाज मग तसच पुढे निघाल आणि तीन दिवसांनी उत्तर व दक्षिण अंदमानच्या दरम्यान असलेल्या समुद्रधूनीत पोहोचल आणि तिथे पाण्यातल्या एका भोवर्‍यात सापडल. अगदी बुडण्याचा प्रसंग आला. कसबस सगळ्यांनी मिळून जहाज त्या भोवर्‍यातून बाहेर काढल आणि एका खाडीत पोचले. पाहतात तर तिथे आधीच काही बोटी उभ्या होत्या. हे मलय लोकं होते व ते तिथे हवाबिल नावांच्या पक्ष्याची घरटी शोधत होते. हा पक्षी आपली घरटी लाळेने तयार करतो. पौर्वात्य देशात त्यांचं सूप करून खातात. ह्यालाच बर्ड नेस्ट सूप म्हणतात.
बेटावर हेल्फरला काही लोकं धनुष्यबाण आणि भाले घेऊन दगडांमागे लपलेले दिसले. पण कुणाला त्यांच्या जहाजाजवळ येण्याचं धाडस होईना. शेवटी एक माणूस त्यांच्या जवळ आला. “तो माणूस तरुण होता. अंगाने पिळदार, काळाकभिन्न आणि संपूर्ण नागडा. केस दोन्ही बाजूने बारीक कापलेले असल्यानं त्याच्या डोक्यावर केसांचा गुच्छा होता. शरीरावर कुठेही गोंदवलेल नव्हत किवा लेपही लावलेला नव्हता. तो खूप बडबड करत मोठयाने हसत होता. त्याने जहाजाच्या कॅप्टनला भांड भरून पाणी आणलं. बदल्यात कॅप्टनने त्याला भांड भरून भात दिला. हे सुरू असताना एका खलाश्याचा धक्का लागून ते भांड फुटल. त्यानंतर कदाचित हा एक अपशकुन आहे अस मानून ती लोकं जवळ येईनाशी झाली आणि लांबूनच हेल्फरच्या लोकांना धमकावू लागली. जहाजाला पिण्याच्या पाण्याची अतिशय गरज होती म्हणून किनार्‍यावर उतरण भाग होत. पण जहाजातल्या लोकांना अंदमानी लोकांची अतिशय भीती वाटत होती. त्यांची ख्यातीच एवढी भयंकर होती.
शेवटी बंदुकी घेऊन काही लोकं किनार्‍यावर उतरले. बंदुकी पाहून बेटवासी पळून गेले. थोड्याच वेळात सगळी पिंप भरून झाली. “आमचे लोकं सूर्यास्तापर्यन्त भरपूर पाणी प्यायले. अधून मधून आम्हाला ते लोकं दिसत होते. संवाद साधायचा होता म्हणून मी अश्या ठिकाणी उतरलो होतो जिथे काही वेळापूर्वी मला शेकोटीचा धूर दिसला होता”. हेल्फरने मग आजूबाजूला हिंडुन त्यांच्या झोपड्या आणि त्यात ठेवलेल्या डुकरांच्या कवट्या बघितल्या, थोडाफार झाडं झुडपांचा अभ्यास केला आणि सगळे जहाजावर परत आले.
“तर अशी आहेत ही जंगली लोकं”. हेल्फरन आपल्या रोजनिशीत लिहिल. “ही तर निसर्गाची निष्पाप लेकरे. त्यांना त्रास दिला नाही तर ती कोणाला कशाला त्रास देतील? थोड संयमाने घेतलं तर मैत्री करण काही कठीण नाही”. दुसर्‍या दिवशी हेल्फर आठ खलाशी आणि कॅप्टनसकट बेटावर परत उतरला. तिथे आधीच बरेच अंदमानी लोकं गोळा झालेले होते. सोबत आणलेले तांदूळ आणि नारळ दाखवताच त्या लोकांनी हळूच जंगलात माधार घेतली. हेल्फर त्यांच्यामागे जाणार तेवढ्यात त्या लोकांनी भाले व धनुष्यबाण घेऊन ओरडत अचानक हल्ला केला. दुर्दैवाने अंदमानी लोकांना भीती वाटू नये म्हणून हेल्फरने बंदूका नेल्या नव्हत्या. मग काय सांगता, सर्वांना पळता भुई थोडी झाली. त्या घाईगडबडीत हेल्फरची बोट पाण्यात उलटली. सगळेजण मग पोहोत जहाजाकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. किनार्‍यावरून त्यांच्यावर भयंकर बाण आणि भाल्याचा हल्ला सुरू झाला. एक बाण हेल्फरला डोक्यात लागला आणि तो जागीच ठार झाला. पाचच दिवसांनी त्याचा तिसवा वाढदिवस होता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एकदम छान.
मी सुद्धा गेल्यावर्षी गेले होते अंदमानला. ह्या जमातीला "जारवा" म्हणतात. काळकभीन्न जंगलातील वाट. आणि वाटेत मध्येच ही लोक दिसतात. ती कधीच विनाकारण इतरांना त्रास नाही देत. आम्ही रात्रीच्या प्रहारी प्राइवेट बस करुन त्या जंगलात प्रवेश केला होता तेव्हा कुठे अकराला दुपारी पोहचलो परत काळोख पड्ण्याच्या आत परतायचे होते. विरळ लोकवस्ती असलेले तो प्रदेश अक्षरक्षः खायला उठला होता. पण नशीब खराब होते, जारवा लोक दिसले नाहीत..................
खुप थ्रिलींग अनुभव होता. पुन्हा एकदा जायची खुप इच्छा आहे........
बघुया आता पुन्हा कधी जारवा बोलवत आहेत त्याची वाट..........

हे eBook मी Bookganga.com वर प्रकाशित केल आहे. खाली लिंक आहे. हयातून जे काही उत्पन्न होईल ते सर्व 'वयम' नावाच्या संस्थेला जाईल. ही संस्था नाशिक जवळ जव्हार, मोखडा आणि हरसूल भागात आदिवासी लोकांसोबत काम करते. अर्थात, ही संस्था सुरू करणारे पाती पत्नी श्री मिलिंद थत्ते आणि दीपली गोगटे हेच काम करतात, आमच्यासारखे फक्त थोडीफार मदद करतात. ह्या पुस्तकाच्या माध्यमाने जे जमेल ते करयचय. आपल्या देशाच्या निसर्गाची परिस्तिथी आपल्या आदिवासी बांधवांच्या जीवनाची जोडली आहे. आणि त्यांच्यावर, त्यांच्या जंगलांवर संकट उभ ठाकल आहे.

पुस्तक इथे मिळेल http://www.bookganga.com/eBooks/Book/4805660396641486871.htm?Book=Andama...

मिलिंदचा blog ह्या link वर आहे

http://vayamindia.wordpress.com/about/

वाचून काळे पाणी ची आठवण झाली, त्यात पण जारवा या जमातीचा उल्लेख आहे. मागे काही वर्षापूर्वी सकाळ मध्ये पण एक लेख मालिका येत असे.