कादंबरी

सावट - ४

Submitted by बेफ़िकीर on 12 May, 2011 - 05:26

मावशी झापत असताना अर्चना डोळे फाडून मावशींकडे बघत होती. दुसर्‍या दिवशी दुपारचा प्रसंग हा! सतीश आणि अजित कामाला गेलेले होते. नॉर्मल झालेली नमा एका संस्थेत बोलणी करायला गेली होती. मनू झोपलेला होता. आणि मावशी अर्चना स्वैपाकघरात बोलावून प्रचंड झापत होत्या. हे इथे चालणार नाही, तुझ्या नवर्‍याला माहीत नाही का, त्याला कळले तर संसार उध्वस्त होईल हे समजत नाही का! अजित तरी असा कसा काय वागू शकतो! पण मुळात बाईमाणसाने काळजी घ्यायला नको का! मला वाटलेच नव्हते की तू असली असशील!

गुलमोहर: 

सावट - ३

Submitted by बेफ़िकीर on 11 May, 2011 - 03:12

नेमके कोणत्या कारणावरून नमाला हाकलून द्यावे हेच लक्षात येत नव्हते. खिडकीत बसणे यात गैर काहीच नाही. तिचा एक हात तुटलेला होता असे अर्चनाला वाटणे यात अर्चनाला भास झालेला असण्याची शक्यता खूपच! तसेच स्वैपाकघरातही अर्चनाला तो तुटलेला हात माळ्यावरून चालताना दिसणे यातही तिला भास झालेल्या असण्याची शक्यता खूपच! स्वैपाकघरातले आवरले कुणी हा प्रश्न आणि मनूच्या डोळ्यांपाशी रक्त कसे काय आले होते हा दुसरा प्रश्न, हे दोन प्रश्न जर सोडले तर बाकी अर्चनाला झालेले भास म्हणून मनातून काढून टाकणे शक्य होते.

गुलमोहर: 

सावट - २

Submitted by बेफ़िकीर on 10 May, 2011 - 07:09

सावेळ्याच्या मनीषाच्या अपघाती निधनाची बातमी अजून पचलीही नाही तोवर दुसर्‍याच दिवशी संध्याकाळी सावेळे आणि दिवे गावांमध्ये दुसर्‍या ब्रेकिंग न्यूजने कहर माजवला.

काका थोरात गेला.

ही दोनच गावे काय, तर आजूबाजूच्या गावांमधील किमान दोनशे पब्लिक तिथे लोटले. दिवे गावात आजवर इतकी गर्दीच कधी झालेली नव्हती. म्हणजे इतकी माणसे आली तर त्यांच्यासाही सोय करण्याची कुवतच नव्हती या लहानश्या गावाची! त्यामुळे नुसतेच टुकूटुकू पाहात राहणे इतकेच काम दिवेकर करत होते.

गुलमोहर: 

सावट - १

Submitted by बेफ़िकीर on 9 May, 2011 - 03:24

सावेळा गावचं पब्लिक जाईचना! ताना आता अक्षरशः ओरडून त्यांना जायला सांगू लागला. तरीही हालेनात ते! असतील तीस एक लोक, काही स्त्रिया, काही पुरुष! त्यातला एक पुरुष हताश होऊन नुसताच चितेकडे बघत बसला होता. स्त्रिया हंबरडे फोडत होत्या. पोलिस केस होणेच शक्य नव्हते कारण नव्या सुनेला घराची मालकीण बनवणारे लोक होते काकडे! मनीषा उत्तम काकडेशी लग्न करून आली त्या दिवसापासून तिला महाराणीचाच थाट मिळाला. माहेरी झाले नसेल इतके कौतुक सासरी! आणि हे सगळे खरेखुरे! नुसते दाखवायला नाही. उत्तमच्या थोरल्या दोन भावांच्या बायकाही घराच्या मालकिणीप्रमाणेच वागवल्या जात होत्या. इतके दृष्ट लागेल असे घर सावेळ्यात दुसरे नसेल!

गुलमोहर: 

इ.स. १०००० - भाग ११ - अंतिम भाग

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2011 - 04:14

नमस्कार मित्रांनो! इसविसन १०००० चा हा अंतिम भाग! ही कादंबरी प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचा मी ऋणी आहे. तसेच, काहीसे रखडलेल्या या कादंबरीला प्रतिसाद देऊन मला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी सर्व वाचक, प्रतिसादक यांचा मनापासून आभारी आहे.

गुलमोहर: 

इ.स. १०००० - भाग १०

Submitted by बेफ़िकीर on 27 April, 2011 - 03:48

प्लॅटफॉर्मच्या बाहेर भयातिरेकाने पाच वेळा उडी मारूनही १६९९ पुन्हा आतच खेचली गेली. गोप तुफान आवाजात रामरक्षा म्हणत असतानाच पेंगुळल्याचाही अभिनय करत असल्याने त्याने गोळी खरच खाल्ली की नाही खाल्ली हे १६९९ ला समजत नव्हते. कारण तिची चीप स्पष्ट संदेश देत होती की तो असंबद्ध पण संस्कृतमध्ये बोलत आहे आणि १६९९ चे डोळे तर तिला सांगत होते की ४६३४४ झोपाळला आहे.

तंत्रज्ञानावर मानवी बुद्धीने मिळवलेला पहिला विजय होता तो!

गुलमोहर: 

इ.स. १०००० - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 11 April, 2011 - 03:03

अवकाशातील एका नगण्य ग्रहाच्या ठिपक्याकडे उदासवाणेपणाने बघत गोप बसून राहिलेला होता. आपण का जिवंत आहोत, कुठल्या माणसांमध्ये आहोत आणि इतके असहाय्य का आहोत या विचारांच्या पलीकडे गेला होता आता तो! झाड होणार होता तो आता! झाडाच्या भावना समजत नाहीत, पण ते जिवंत असते, तसा होणार होता गोप!

गुलमोहर: 

इ.स. १०००० - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 5 April, 2011 - 04:47

अचानक प्लॅटफॉर्मपाशी एक शटल आलेले पाहून गोप दचकलाच. १६९९ मात्र निराश झाली. कारण खुद्द १६२२ हा तिचा साहेब त्या शटलमधून स्वतःच्या 'स्पेसमधील फार्महाऊस'वर आलेला होता. १६९९ ने सर्व संदेश बंद केलेले असल्याने ४६३४४ चे नेमके झाले काय ही काळजी पृथ्वीवासियांना भेडसावत होती. तिथे काहीतरी भयंकर झालेले असले तर आपल्यालाही धोका होऊ शकतो असे वाटून कुणी तेथे जात नव्हते. पण १६२२ ला धाडस करणे क्रमप्राप्तच होते. कारण ४६३४४ सारख्या अतीश्रेष्ठ मानवाला जगवणे आणि या जगाला इतकी चांगली भेट देणे हे त्याचे महान कर्तृत्व नष्ट झाले की काय या काळजीने तो ग्रासला होता.

गुलमोहर: 

इ.स. १०००० - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 29 March, 2011 - 03:21

दहा लाख!

तसे पाहिले तर ही संख्या खूपच! दहा लाख मानव म्हणजे काय झालं!

पण हे दहा लाख मानव पृथ्वीवर विखुरले गेलेले होते. ज्याला आपण हिंद मानतो तेथे असतील पन्नास, साठ हजार! इकडे काही, तिकडे काही, अशा पद्धतीने मानव विखुरलेल्या अवस्थेत होते.

गुलमोहर: 

इ.स.१०००० - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 24 March, 2011 - 00:54

"तुम्ही २००० साली बेशुद्ध पडला असावात. कारण तसे डिटेल्स तुमच्या खिशात मिळाले. एका कागदांवर लिहीलेले होते. कसलेतरी बिल होते. त्यावर तारीख होती. बिल आणि रुपये या संकल्पना आमच्या १६२२ ने आम्हाला समजावून सांगितल्या. १६२२ ने आम्हाला सर्वच समजावून सांगितले. आम्हाला त्या संस्कृतीबाबत काहीच कल्पना नव्हती. पण १६२२ अतिशय हुषार! १६२२ इतका हुषार आहे की त्याला वर्षातून दोन दिवस या, इतक्या लांब राहता यावे, या प्लॅटफॉर्मवर राहता यावे, यासाठी एजंट्सनी हा प्लॅटफॉर्म त्यांच्या प्लॅटफॉर्मपासून जवळ ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. इथे केवळ शांतताच असते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कादंबरी