संस्कृती

नवरात्र : माळ आठवी

Submitted by snehalavachat on 16 October, 2018 - 09:49

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

माळ आठवी

“अंबे तुळजापूरवासीनी माते भंडासुर मर्दिनी
दुर्गे निशुंभनिर्दालनी भवानी महिषासुरमर्दिनी”

आजचे पूजन हे दुर्गेचे. दुर्गाष्टमीला या जगतजननीचे पूजन करण्यासारखे दुसरे सुख नाही. तिच्या सान्निध्यात राहून सदैव तिच्या सेवेत रहाण्याचे आंतरिक समाधान शब्दातीत असते.

नवरात्र : माळ सातवी

Submitted by snehalavachat on 15 October, 2018 - 10:07

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

माळ सातवी

“आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी, जागवते रात्र सारी
आज गोंधळला येवी, अंबे गोंधळाला ये ||”

आजचा दिवस हा महालक्ष्मीपूजनाचा. लक्ष्मीमातेचा आपल्या आयुष्यात सदैव वास असावा हीच प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्यासाठी ती प्रसन्न कशी राहील या साठी आपण कायमच प्रयत्नशील असतो.

नवरात्र : माळ सहावी

Submitted by snehalavachat on 15 October, 2018 - 03:05

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

माळ सहावी

नवरात्रात जगतजननीचे रोज एक वेगळेच रूप असते. आजचा मान सरस्वतीपूजनाचा. माणसाला आयुष्यात जर देवी सरस्वती प्रसन्न झाली तर लक्ष्मीचा पण सहवास लाभणारच हे एक समीकरण असते.

एक स्त्री शिकली तर तो पूर्ण परिवार शिक्षित असतो. यासाठी मानवी रूपातील सरस्वती सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांची थोरवी अपरंपार आहे.

नवरात्र : पाचवी माळ

Submitted by snehalavachat on 14 October, 2018 - 01:49

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

माळ पाचवी

शारदीय नवरात्रात आदिशक्तीची आराधना करणे व तिला आपली सुखदु:खे सांगणे व मन रिते करणे ह्यासारखे दुसरे समाधान नसते.

आजच्या दिवसाची माळ ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे. बहीण लहान असो वा मोठी असो त्याने नात्यात काहीच फरक पडत नाही. आपली सुखदु:खे कायमच सांगायला एक हक्काचे माणूस असते. लहानपणापासूनची कितीतरी गुपिते ह्या नात्यात दडलेली असतात. वयानुसार त्या त्या वयात येणारे अनुभव, संकटे ह्या साठीचा हक्काचा आधार व योग्य मार्गदर्शन मिळेल याची कायमची खात्री असते.

आदिशक्तीचा जागर : चौथी माळ

Submitted by snehalavachat on 13 October, 2018 - 05:37

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

चौथी माळ

या दिवसात देवीची आराधना ही पूजाअर्चा, अखंड नंदादीप, उपवास या मुळे उत्साहाचाच आणि उमेदीचा जणू काळ असतो. उपवास करणे हा उपासनेचाच एक भाग असतो. फक्त शरीराला हानिकारक न होता, यामुळे आपल्याला मानसिक बळ मिळावे हाच शुद्ध हेतू असतो.

आजची आपली माळ ही अश्याच आपल्या लाडक्या “आत्यासाठी”. लहानपणी वडील रागावल्यावर आई त्यांच्यासमोर फार बोलू शकत नसायची. पण ही आपली लाडकी आत्या आपल्या मदतीला कायमच धावून यायची. तिचे आपल्याला पाठीशी घालणे आणि आपले डोळे पुसणे हा आधार मनाला खूप सुखावून जायचा.

नवरात्र : माळ तिसरी

Submitted by snehalavachat on 11 October, 2018 - 10:12

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

तिसरी माळ

देवीचे अंतकरण कायमच आपल्या भक्तांसाठी प्रेमाने ओथंबलेले असते. माय, माऊली, जगत्जननी ही तिची संबोधने तंतोतंत आहेत. आजची ही आपली तिसरी माळ आपल्या मावशीसाठी आहे.

आपल्या लहानपणी आजोळी आपले सगळ्यात जास्त लाड मावशी व मामानी केलेले असतात. “माय मरो आणि मावशी जगो” या मागे एकच भावना असते की, आईच्या ममतेने आपले कोडकौतुक करणारी आपली हक्काची मावशीच असते. आपले सर्व हट्ट पुरवण्यात तिला कमालीचा आनंद असतो. आपले वय जसे जसे वाढत जाते तसेतसे ही मावशी आपली घट्ट मैत्रिणच होऊन जाते. अगदी कायमचीच जणू अट्टिगट्टी असते.

नवरात्र : आदिशक्तीचा जागर दुसरी माळ

Submitted by snehalavachat on 10 October, 2018 - 10:54

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

दुसरी माळ : दुधावरची साय

मायमाऊलीचे आपल्या सगळ्याच लेकारांवर सारखेच प्रेम असते. तसेच आपल्या आज्जीचा पण सर्व नातवंडांवर पण तेव्हडाच जीव असतो. दुधावरची साय तशी आज्जीची माय म्हणतात ते अगदी खरे आहे. आपली दुसरी माळ ही आपल्या आज्जी साठीच.

प्रेम, माया, ममता यांनी ओतप्रोत भरलेली प्रेमळ नजर आपल्याला किती काय सांगून जाते. तिच्या मायेच्या बटाव्यात किती गप्पा, गोष्टीं, गुपितांचा जणू खजिनाच असतो आपल्या प्रत्येकाचा. तिचा सुरुकुतलेला हात पाठीवरून फिरताना जगातला मोठा पुरस्कार मिळाल्याचा आनंद असतो.

जागर नवरात्राचा : पहिलि माळ

Submitted by snehalavachat on 9 October, 2018 - 10:44

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

पहिलि माळ

नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीच्या प्रती असलेला प्रेमाचा झराच जणू अखंड स्त्रवत असतो. चैतन्य, उत्साह, प्रेम, माया ओसंडून वाहत असते. देवीची लोभस रुपे डोळ्यात किती आणि कशी साठवून घ्यायची हीच रुखरुख असते.

नवरात्र म्हणजे नऊ रात्री. नऊ ह्या अंकाला विशिष्ट आध्यात्मिक संकेत तर आहेतच. पण त्याचबरोबर, घटाभोवती पेरली जाणारी नऊ धान्य, दुर्गेचे नऊ अवतार, महाराष्ट्रातील प्रसिद्ध नऊ देवस्थाने, नवरात्रीचे नऊ रंग, नऊ रत्न, नऊ प्रकारची दाने, नवविध भक्तीचे नऊ प्रकार, मानवी मनाचे नऊ गुणधर्म व शरीराच्या नऊ अवस्था.

शब्दखुणा: 

वेदांमधील अद्भुत विज्ञान

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 October, 2018 - 01:56

आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे ? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे ?

सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे.

मुंबई गणेशोत्सव २०१८ - बाप्पांना निरोप

Submitted by Admin-team on 30 September, 2018 - 22:51

मुंबई २०१८ गणेशोत्सव : बाप्पांना निरोप. सर्व प्रकाशचित्रे : श्री हेमेन खत्री. ही प्रकाशचित्रे त्यांच्याच विनंतीवरून आणि पूर्व परवानगी नंतर प्रकाशीत केली आहेत.
बाप्पांचे फोटो आपण पाहतोच. पण निरोप देणार्‍या भक्तांच्याही चेहर्‍यावरचे भाग पाहण्यासारखे असतात.

Pages

Subscribe to RSS - संस्कृती