जागर नवरात्राचा : पहिलि माळ

Submitted by snehalavachat on 9 October, 2018 - 10:44

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

पहिलि माळ

नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीच्या प्रती असलेला प्रेमाचा झराच जणू अखंड स्त्रवत असतो. चैतन्य, उत्साह, प्रेम, माया ओसंडून वाहत असते. देवीची लोभस रुपे डोळ्यात किती आणि कशी साठवून घ्यायची हीच रुखरुख असते.

नवरात्र म्हणजे नऊ रात्री. नऊ ह्या अंकाला विशिष्ट आध्यात्मिक संकेत तर आहेतच. पण त्याचबरोबर, घटाभोवती पेरली जाणारी नऊ धान्य, दुर्गेचे नऊ अवतार, महाराष्ट्रातील प्रसिद्ध नऊ देवस्थाने, नवरात्रीचे नऊ रंग, नऊ रत्न, नऊ प्रकारची दाने, नवविध भक्तीचे नऊ प्रकार, मानवी मनाचे नऊ गुणधर्म व शरीराच्या नऊ अवस्था.

बीज जेंव्हा आपण जमिनीत रुजवतो, त्यानंतर नऊ दिवसांनीच जमिनीतून अंकुर फुटतो. तसेच गर्भधारणेनंतर नऊ महीने नऊ दिवसांनी पूर्ण बाळ जन्माला येते.

त्यामुळेच आजची पहिली माळ ही मातृदेवतेसाठीच, जी आई बाळाला जन्माला घातल्यावर दिवसरात्र त्याच्याच भवितव्याचा विचार करून अहोरात्र कष्ट उपसत असते. स्वतचे आजारपण , थकवा, त्रास, कष्ट, तहानभूक या गोष्टींना दुय्यम स्थान देऊन फक्त आपल्या लेकराचाच विचार करत असते, अगदी तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत.

दुर्गामातेचे मन हे पण सागरासारखे अथांग व सर्वांना सामावून घेणारे असते. आकाशाच्या गर्द निळाईसारखे सुरक्षित कवच ती कायमच देत असते.

म्हणूनच, आज दुर्गामातेसमोर नतमस्तक होताना, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आपला कायमच हातभार असेल हा निश्चय करूनच तिची आजची पूजा सुफळ संपूर्ण करुयात.

जय अंबे जगदंबे
सकालांची माता तू ||
करवीरनिवासिनी
आळवितो गाथा मी ||
जय देवी जय देवी
जय जय जगदंबे ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> जी आई बाळाला जन्माला घातल्यावर दिवसरात्र त्याच्याच भवितव्याचा विचार करून अहोरात्र कष्ट उपसत असते. स्वतचे आजारपण , थकवा, त्रास, कष्ट, तहानभूक या गोष्टींना दुय्यम स्थान देऊन फक्त आपल्या लेकराचाच विचार करत असते, अगदी तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. > उगा कायतर सांगत फिरायचं Angry असलं काही कोणी करत नसतं आणि करुही नये.

उगा कायतर सांगत फिरायचं Angry असलं काही कोणी करत नसतं आणि करुही नये. ------ करू नये हे तुमचे वैयक्तिक मत झाले

नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीच्या प्रती असलेला प्रेमाचा झराच जणू अखंड स्त्रवत असतो. चैतन्य, उत्साह, प्रेम, माया ओसंडून वाहत असते. देवीची लोभस रुपे डोळ्यात किती आणि कशी साठवून घ्यायची हीच रुखरुख असते.. >> सहमत. छान लिहिले आहे.

>>>>>> स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आपला कायमच हातभार असेल हा निश्चय करूनच तिची आजची पूजा सुफळ संपूर्ण करुयात.>>>>>>>>> वाह!!!

असलं काही कोणी करत नसतं आणि करुही नये.>>>>>> करत नसतं यावर काही बोलायचे नाही.पण करु नये याबाबत अनुमोदन!