नवरात्र : माळ तिसरी

Submitted by snehalavachat on 11 October, 2018 - 10:12

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

तिसरी माळ

देवीचे अंतकरण कायमच आपल्या भक्तांसाठी प्रेमाने ओथंबलेले असते. माय, माऊली, जगत्जननी ही तिची संबोधने तंतोतंत आहेत. आजची ही आपली तिसरी माळ आपल्या मावशीसाठी आहे.

आपल्या लहानपणी आजोळी आपले सगळ्यात जास्त लाड मावशी व मामानी केलेले असतात. “माय मरो आणि मावशी जगो” या मागे एकच भावना असते की, आईच्या ममतेने आपले कोडकौतुक करणारी आपली हक्काची मावशीच असते. आपले सर्व हट्ट पुरवण्यात तिला कमालीचा आनंद असतो. आपले वय जसे जसे वाढत जाते तसेतसे ही मावशी आपली घट्ट मैत्रिणच होऊन जाते. अगदी कायमचीच जणू अट्टिगट्टी असते.

आजच्या आपल्या हिरव्या रंगासारखेच मावशीचे प्रेम हे निखळ आनंद देणारे असते. आपल्या आयुष्यात भरभराट होवो याचा तिला सदैव आनंदच असतो.

तिला लहानपणापासूनच आपले कधीही ओझे वाटत नाही, तर आपला सांभाळ व नाते जपण्यात ती कायम तन, मन ओतत असते. आपण स्वावलंबी होण्याचा आनंद आई इतकाच मावशीला देखील असतो.

माय भवानी तुझे लेकरू कुशीत तूझिया येई
सेवा मानून घे आई

आपल्या भवानी मातेला देखील आपल्या खारी एव्हड्या सेवेने देखील अतोनात समाधान मिळते व ती कायमच आपल्या लेकरांच्या सेवेने तृप्त होऊन जणू आपल्यावर संकटातून तारण्यासाठी वरदहस्तच ठेवत असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users