बहावा

Submitted by Asu on 18 April, 2019 - 10:31

माझ्या मनावर सोनपिवळं गारूड घालणारा 'बहावा' माझ्या 'निसर्गभाव' या काव्यसंग्रहातून -
बहावा

हिरवी हिरवी गार
साडी नवरी नेसली
सोनपिवळ्या फुलांची
अंगी हळद माखली

भर उन्हात उभी
कुणी सखी साजणी
प्रेमभाव मनीचे
पक्षी गातात गाणी

थंड वाऱ्याची येता
मंद झुळूक वनी
पिवळ्या धम्म फुलांचे
डूल डुलती कानी

अंगठा रुतून भूमीत
लाजता ही नारी
वाटे आली जणू
नवरदेवाची स्वारी

हेमझुंबरे जणु बांधते
नवरी वृक्षमहाली
वर्षाव पतीवर हेमफुलांचा
करी बसुनि रंगमहाली

सोनपिवळं गारूड
सदा मनात रहावं
पुन्हा पुन्हा वाटे
डोळे भरून पहावं

किती वर्णावी शोभा
आणि म्हणावे वाहवा
कड्याकपारी रानी
पहा फुलला बहावा

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults