संगीत-नाटक-चित्रपट

अनसंग हीरो

Submitted by बावरा मन on 13 April, 2013 - 05:09

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.

नाट्यपदांचा सरळ भाषेतला अर्थ

Submitted by सौ. वंदना बर्वे on 13 April, 2013 - 00:55

जुनी नाट्यगीतं विशेषत: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या नाटकातली नाट्यगीते श्रवणीय असली तरी दुर्बोधतेकडे झुकणारी होती. या नाट्यपदांचे अर्थ लावणे हे खरोखरच क्लिष्ट काम.

तू लिही तू लिही

Submitted by रोहितगद्रे१ on 2 April, 2013 - 11:22

तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
खांद्या वरून डोकवून
नाहीतर तिरप्या नजरेतून
पण ठाव त्यांच्या शब्दांचा
लागल्यावरच लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
तसं येत नसेल तर असही चालेल
अरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...!
ते तिकडे काय पडलाय ते दाखव की
अरे हेच ते...हेच शोधत होतो मी...!
बाकी असू दे...नंतर वाचू
इथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू
चल येतो...चाल लावायची आहे
शब्दांना पांघरायला शाल विणायची आहे
गप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल
हिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल

'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..

Submitted by मी अभिजीत on 17 February, 2013 - 04:05
तारीख/वेळ: 
20 February, 2013 - 04:30 to 07:30
ठिकाण/पत्ता: 
शुभमंगल कार्यालय , डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ डोंबिवली (पूर्व)

सर्व मायबोलीकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मायबोलीवरील 'मी अभिजीत')) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे.

आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण..!
invitation1.jpg

प्रांत/गाव: 

पुणे ५२ : रसग्रहण

Submitted by सिद्धार्थ राजहंस on 28 January, 2013 - 13:32

चित्रपट हा माझ्या अतिप्रचंड आवडीचा विषय असुनही मला कधीही एखाद्या चित्रपटाविषयी लिहावेसे वाटले नाही कारण इतर बरेचसे लोक हे काम माझ्यापेक्षा चांगले करतात आणि कित्येक लोकांना (पक्षी : समीक्षक) या कामाचे पैसे मिळतात. तसेच एखादा चित्रपट कोणाला कधी आणि कशासाठी आवडावा किंवा आवडू नये हे बऱ्यापैकी व्यक्तीसापेक्ष आहे. तुम्ही बदलत जाता तशी तुमची आवडही बदलत जाते. तसेच अगदी चित्रपट बघतानाचा मूड, तेंव्हाच्या अपेक्षा यानीपण फरक पडतो. त्यामुळे हाच चित्रपट बघा वगैरे सांगण्यात मला फारसा अर्थ वाटत नाही. पण...

शब्दखुणा: 

पद्म पुरस्कार २०१३ : सध्या निकष काय आहेत ?

Submitted by असो on 25 January, 2013 - 22:39

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची ही संपूर्ण यादी.
http://zeenews.india.com/news/nation/padma-awards-full-list-of-winners_8...

सर्वांचे अभिनंदन !

पुरस्कारांचे निकष काय असतात / असावेत यावर इथे चर्चा करू.

द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण

Submitted by बावरा मन on 20 December, 2012 - 03:20

सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्‍या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्‍या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्‍या एका परिवाराभोवती फिरते.

Dreamum wakeuppam अश्लील गाणे?

Submitted by रमेश भिडे on 17 December, 2012 - 23:54

Dreamum wakeuppam हे नवीन गाणे काही दिवसपूर्वी कानावर आले. आणि कालच पुतण्याला मुंबईत फोन केला तर हे गाणे मागे वाजत होते. कुतूहल चाळवले,म्हणून विचारले तर म्हणाला की हे गाणे तर सुपरहिट आहे...म्हणून डाउनलोड करून काळजीपूर्वक ऐकले तेव्हा मला धक्काच बसला .........................!

संगीत,ठेका ,शब्दोच्चार पद्धत इत्यादि बाबतीत गाणे catchy असले तरी गाण्याचे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले. अशा गाण्यांना सेन्सॉर बोर्ड परवानगी काशी काय देते बुवा?

..
Aiyyaayo..

Dreamum wakeuppam
Critical conditionum
Hey earthum quakepum
Hil dool sab shakeupum

माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे

Submitted by मुग्धानंद on 6 December, 2012 - 01:14

माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे
गीतकार : कुसुमाग्रज, गायक : अनुराधा पौडवाल, संगीतकार : श्रीधर फडके, चित्रपट : लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव - / Lyricist : Kusumagraj, Singer : Anuradha Paudwal, Music Director : Shridhar Phadke, Movie : Laxmibai Bhratar Vasudev -

ऑडिओ फाईल कुठे शोधु? तुनळी वर नाही. मोबाईल वर घेता आले तर उत्तम.

"लम्हे"

Submitted by रमेश भिडे on 23 November, 2012 - 10:42

परवा माझा एक मित्र आणि मी "लम्हे" या सिनेमाबद्दल बोलत होतो...यश चोप्रांची मला आवडलेली उत्तम कलाकृती म्हणजे लम्हें...वेगळे कथानक, उत्तम लोकेशन्स, सर्व कलाकारांचा ताकदीचा अभिनय...मस्त.

Pages

Subscribe to RSS - संगीत-नाटक-चित्रपट