स्वर गंगेच्या काठावरती - कलाभवन पेनसिलव्हेनीया

Submitted by अनिलभाई on 1 July, 2013 - 10:15

.. पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर ह्यांच्या २१ अजरामर अविट गाण्यांवर साकारलेली संगित नृत्यमय प्रेमकहाणी ..
....

***** स्वर गंगेच्या काठावरती - प्रोमोज (राशी विनय देसाई) *******

SwarGangeChya.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाई, प्रोमोत आहे ते 'जैत रे जैत' मधलं ('ही दुसर्‍याची बाइल') गाणं आहे का?
तुमचं अ‍ॅक्टिंग भारी हाँ! कार्यक्रमाला शुभेच्छा! Happy

काय भाई सांगू? प्रोमोच टाकला नाही...

http://www.youtube.com/watch?v=IdlA7VGLVdc

हा घ्या प्रोमो.. (स्वार्थ स्वार्थ म्हणतात तो हाच Proud )

दुसर्‍याची कुठली..? समोर भाईंची बाईलही उभी आहेच की (मीनाच्या पलिकडे)...

लै भारी ... तयारी जोरदार आहे ... कधि आणि कुठे होणार आहे हा प्रोग्रम?? पुर्ण कार्यक्रम कुठे बघता येईल???

भूमिकेमधे शिरण्यासाठी भाईंनी काय काय केले असेल ते सांगता येत नाही << भूमिकेत सोडा अहो लुंगीत शिरण्यासाठी भाईना काय काय करावं लागलं याचा विचार करा. Proud

भूमिकेत सोडा अहो लुंगीत >>लुंगी न्हाय रुमाल.. भुमिका सुटु नये म्हणुन कोळ्यांचा रुमाल शिवुन घेतला आहे अंडरवेअरला. आता रुमालात शिरल्याशिवाय भुमिकेत शिरता येणार नाही. Happy

भाई - तुम्ही नाचणार, देसाई उभ्या उभ्या विनोद सांगून आम्हाला बसल्या बसल्या हसवणार, मग यायलाच पाहिजे ना Happy

भूमिकेत सोडा अहो लुंगीत शिरण्यासाठी भाईना काय काय करावं लागलं याचा विचार करा >> Lol नको देसायांनु भाईंच्या लुंगीला असा हात नका घालू. वस्त्रहरणचा प्रयोग वेगळा आहे BMM ला Lol

लुंगी न्हाय रुमाल.. भुमिका सुटु नये म्हणुन कोळ्यांचा रुमाल शिवुन घेतला आहे अंडरवेअरला >> भाई रुमाला साईझ विचारत नाही आत्ता Lol बायसिकल शॉर्ट्स घाला कि सरळ.

ते बी दिसतय रे मागनं म्हनुन तेलाच शिवलाय. आता आत अंडरवेअर्, बायसिकल शॉर्ट्स आनि तेला शिवलेला रुमाल. आररररर... लई डेजार काम हाय. Happy

Lol भाई कोण बाटलीवाले का ? प्रोमोच एवढा भारी तर कार्यक्रम किती मस्त होईल , सगळ्यांना शुभेच्छा !

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा...

माझ्याकडे तू बगीतलस बी न्हाय
माझी अंजिरी सारी पाहिलीस बी न्हाय ||
अंगात घातलीया गर्द पिवली चोली
दिसतेय ना रे मी चमचमनारी मासोली ||
गजरा बी माललाय हा नवा
तुझ्यासाठी नटुन आलेय मी शिवा ||

आम्ही नटलोय..
तुम्ही सगलेपन नटुन थटुन या हो या.... Happy

आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर...

ए बन्सी काय बसुन राहिलीस हथ
सगळे मनापसुन नाचताहेत तथ ||

मग येनार का आमच्या संग नाचाया... Happy

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात.. सख्यारे आवर ही सावर ही चांदरात..

खरच ग आता मला कोठे बी जायाच न्हाय
माझा स्वर्ग, माझी दुनिया, इथेच गावली ग बाय !!!

तुम्हालाही अगदी हेच वाटेल.. चला तर मग तयारीला लागा.. Happy