प्रत्येक गोष्ट काही कारणासाठी घडते ..?

Submitted by TuKaRam44 on 29 June, 2019 - 02:13

हे जे सायबर अत्याचार झाले, ते सगळं काही करणांसाठीच घडलं का? मी अजुन माहिती काढली आणि कळलं की 'मीना उत्तरा' ह्यांनी केलेल्या अनेक कौटुंबिक वादांच्या निरसनांमुळे त्यांना 90's मध्ये मुंबई हायकोर्टाने फॅमिली कोर्टमध्ये ऑनोररी पद्धतीने लोक अदालत संबंधित अनेक केसेस सोडवायला फॅमिली कोनसेलर म्हणून बोलावले होते व त्यांनी अनेक केसेस सोडवल्या होत्या , कुटुंब मिञांपासून वाचवलेली कळलं, ते त्यांनी केले अत्यंत यशस्वी पणे, त्यांच्या प्रतिसादात त्यांनी हेच म्हटलेलं लक्षात आलं की कोउनसेलर म्हणुन त्या स्वतः बरच काही शिकुन गेल्या! ... इथे वादात न पडता त्यांनी वरील प्रतिसदांच्या माळेत विस्तृत केलेल्या अत्यंत गैर गोष्टी सहन केल्या कोणतेही अपशब्द न लिहिता, आणि 'हे माझे व्यासपीठ नाही' म्हणुन चालु पडल्या ... ट्रॉलिंग करणारे महाभाग (घरच्यांपासुन गुपचूप) कसे वागतात हे त्यांना समजुन चुकले असेल कदाचित आणि त्यांना ह्या घाणेरड्या माणसांचा त्यांच्याच कुटुंबियांना कसा त्रास होत असेल कळलंही असेल... आणि त्याचबरोबर लेखन करणाऱ्यांची संवेदनशील मनं आणि व्यक्तिमत्व ही भ्याड समजत फक्त सायबर अत्याचार करण्याची अश्लील मौज करणारे लुटणारे कसे लेखन करणाऱ्यांना जुमानत नाहीत हेही ! आणि हे सर्व त्या मार्गदर्शीत करत असलेल्या मराठी शाळांत कामी येणार असेल... ते हे रुजवायला की चार शिव्या देऊन पुरुषार्थ अथवा शौर्य होत नसतं आणि नुसतं सभ्य बनून कमकुवत व्हायचं नसतं , कमकुवत माणसांच्या कविता आणि लेख फोल आहेत जर त्यांना आपल्या लिटररी कंमुनिटीचं संरक्षण करता येत नसले तर,

शिवरायांनी संरक्षण केलं होतं , संभाजीराजांनी तेच केलं , संतांचं, सभ्य स्त्री पुरुष मुलांचं संरक्षण करीत...

वारीचा काळ चालु आहे, वारीत शिकायचं ते एकमेकांना 'माऊली' म्हणण्यापासून भरपुर काही...इथे ह्या घटनेतुन काय घ्यायचं आपण..?... त्यावर एकमेकांशी संवाद घडला तर मीना उत्तरा ह्यांच्या थोडक्या उपस्थितीचा आणि त्यांच्या पदरी आलेल्या वाईट वृत्तीचा एक अप्रत्यक्ष फायदाच होईल सगळ्यांना ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users