थाइलंड - कोणी थाइलंड ला आहे का? किंवा काही माहिती आहे का ?

Submitted by 'सिद्धि' on 9 May, 2019 - 04:35

आम्ही ३ दिवसां पूर्वीच बँकॉक मध्ये आलो आहे. company कामानिमित्त एक महिना इथे आहे. बँकॉक पासून ट्याक्सी ने २ तासांच्या अंतरावर होटेल रिव्हर, ठिकाण नाखोनपातम असं काहीस pronunciation आहे.
Address च्या अधीक माहिती साठी होटेल booking जोडलय... please help .

IMG_20190509_140755.jpg
.
ईकडे Indian food जवळपास कुठे मिळेल का?
Veg किंवा non veg काही ही चालेल.
डाळ-भित,बिर्याणी, पुलाव, भाजी-पोळी काही चालेल. इथलं जेवण फार वेगळ आहे, चव सुद्धा विचित्र लागते.

होटल receptionist सहित इथे कोणालाही इंग्लिश सुद्धा समजत नाही. मराठी, हिंदी तर सोडूनच बोला.
इंग्लिश भाषा थाई भाषेमध्ये translate करण्यासाठी काही applications असेल तर लींक पाठवा please.
इथे language problem आहे.
काहीच कळत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाड थाइ, रेड करी, येलो करी , फ्राईड राइस हे काही (विथ मिट ऑर नो मीट) अस इथे युअस मधे मिळणारे आणी आवडु शकणारे थाई पदार्थ ... ऑन्थेटिक थाई पदार्थ अजुन वेगळे आहेत का ते माहित नाही...

रेड/ ग्रीन थाय करी ट्राय करा. भारतीय जिभेला नक्की आवडेल. थाय आईस टी पण एकदम बेस्ट लागतो. बाकी स्पायसी फ्राईड राईस, सॉफ्ट टोफू वाल्या गोष्टी ही आवडतील.
व्हिएतनामीज फो पण अशक्य भारी लागतं. राईस नूडल सूप असतं. बीफ वालं नको असेल तर सीफूड चं ही उत्तम लागतं. स्पायसी सॉस वेगळा घ्या. हाचा सुगंध आपल्या तांबड्या रश्श्यासारखा येतो.

बॅंकाॅक मधे phahurat फौरात नावाने indian area आहे,
टॅक्सी ड्राइवर ला मुस्तफा ला किंवा फौरात ला जायचंय सांगा
रस्त्यावर youngsters ना विचारा, जनरली ते थोडं फार इंग्लिश बोलू शकतात
थाय फूड मधे फिश साॅस हा ingredient चा वास कष्टदायक वाटू शकते, त्यामुळे कोणाकडून नो नाम प्ला (fish sauce) लिहून ते रेस्टॉरंट मध्ये दाखवा, it works.
Download translation app on your mobile.

भरत धन्यवाद- link वरती बरीच माहिती मिळाली.

प्राजक्ता, अमितव- धन्यवाद.
चिकन वैगरे it's ok but no बीफ.
कोकणस्थ आहे मी fish try करते.

वर्षू-download translation app on your mobile.
App download केलंय. Problem असा आहे की बोलताना त्याच pronounciation व्यवस्थित नाही झालं ना तर काही वेगळा अर्थ होत असावा, ईथले लोक तोंडाकडे बघत बसतात.
पण ठिक आहे app मुळे थोडंफार तरी थाई समजतं आणि समजवता ही येत.
phahurat मध्ये नक्की जाईन, धन्यवाद.

इथे indian community असेल ना त्यांच काही contact असेल तर please share.
कदाचित जास्त दिवस रहावं लागेल असं वाटतं.

वेका-व्हिएतनामीज फो बरेचदा बीफ ब्राॅथ असतो.
होय सगळ्यांकडून हेच ऐकायला मिळालं , काही ही खायला घेताना आधी चोकशी करुनच हात लावते.

कारवी- link बद्दल धन्यवाद, बघते हे जवळपास आहे का.

कारवी- link बद्दल धन्यवाद, बघते हे जवळपास आहे का >>>>
त्या लिंकवर सर्च सुविधा आहे 'सिद्धि'. इंडियन क्यूझिन + डेस्टिनेशन नेम वापरून रेस्टोरंटची नावे मिळतील.
नाखोन पातोम वरून जवळ असणारी डेस्टिनेशन नावे गुगल मॅप / लोकल मॅप वरून घेता येतील.

Search for "DOSA KING" in Sukhamvit SOI 11/1.
Sukhamvit.pngSukhamvit.png

Subway is also available as shown in the snap shot.

श्री, कारवी, Rajesh188,ओबामा - मनापासुन आभार तुमचे.

च्रप्स- थायलंड ला विथ फॅमिली पण लोक जातात हे नवीनच आहे.
हो office चां काम आहे, नवरा इंजिनियर आहे Indorama या थाई company च्या project वर.
त्यानिमित्ताने दोघेही गेलो. office plus family trip.
इतर ठिकाणी अनुभव आहे पण Frist tym Thailand project मिळालाय.

आणि दुसर म्हणजे प्रश्न हॉटेल्स चां नाही, हॉटेल्स खुप आहेत इथे language problem आहे. खुप कमी लोकांना इंग्लिश येत. प्याकेटस wrappers वरती देखील थाई भाषा आहे,
हा फोटो पहा KFC चां . नक्की काय problem आहे लक्षात येईल.
IMG-20190510-WA0004.jpg
आपल्या भारतीयां सारखं सगळीकडे इंग्लिश चां वापर नाही करतं ईथे.
बर्याचदा सगळ्या पदार्थांमध्ये बिफ आढळतं.

पण सगळ्यांचे मनापासुन आभार, मा.बोलीकरांची खुप मदत झाली, तुम्ही दिलेल्या links, हॉटेल्स, थाई मध्ये भारतीय पदार्थांची नावं वैगरे हे उपयोगी पडत आहे.

You can switch to an airbnb and cook your own food. Get an induction cook top and the best fruits and vegetables are availablein markets. Thai fresh fruits are the best.

Near Indra market lots of Indian hotels. No of peoples talks in Hindi in that market. Mostly Gujarati n Punjabi hotels in bangkok n pattaya

Indra Square is a good place where you can do shopping, there are so many Indians who have shops there. Also you will get good exchange rates for currency exchange you just need to find out over there.There are so many Indian restaurants. You will get all Indian veg nonveg varities.
Please check the images its faar from you but you can try.

Screenshot_20190513-063835_Chrome.jpg

आपण काही दिवस तिथे राहणार आहात तुम्हला जे आवडत ते जेवण तिथे मिळावे ही अपेकशा गैरलागू आहे त्यांच्या जेवणाची चव घ्या
त्यांचे जीवन पद्धती नक्कीच वेगळी असणार आपले वेगळे पण सोडा आणि त्यांच्यात सामील व्हावे नवीन गोष्टीचा आनंद घ्या
ज्वारी ,गव्हू, फळे ह्यातील काहीतरी तिकडे नक्की मिळत असेल ते विकत घ्या आणि आवडीचे जेवण बनवा
पोसिटीव्ह बघा त्या देशाकडे आणि मजेत राहा
फक्त सुरक्षित जीवन असलं पाहिजे तिथे नक्कीच कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे

अमा -thanks.
सातारी जर्दा ,सोनल के - thanks for Indra Square . i'll definitely try to go there.

"Rajesh188 - फक्त सुरक्षित जीवन असलं पाहिजे तिथे नक्कीच कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे."
खरच कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे इथे प्रश्नच नाही या बाबतीत .
guide केल्याबद्दल सगळ्यांचे आभार.