#मुंबई लोकल ट्रेन

सि- २ लोकल डायरी - ५

Submitted by मिलिंद महांगडे on 22 November, 2019 - 02:22

आज मलाच उशीर झाला . मी स्टेशनला आलो त्यावेळी आधीच लोकल प्लॅटफॉर्मला लागलेली होती . आज जागा मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याने मी निवांत चालत येऊन आमच्या डब्यात शिरलो . अपेक्षेप्रमाणे जागा नव्हतीच ! शरद आणि सावंत उभे होते . मी थेट जाऊन त्यांच्या मध्ये उभा राहिलो .
" ए भाई .... मध्ये कुठे घुसतो ? " शरदने सुरू केलं .
" कुठे घुसतो म्हणजे ? माझी जागा आहे .... आणि तू कोण रे विचारणारा ? " मी आवाज चढवला .
" मी आधी आलोय इथं, काय ? "
" आधी आला तर मग काय तुझी आरती करू का ? " मी त्याला चिडवायच्या सुरात म्हणालो .

विषय: 

सि- २ लोकल डायरी -४

Submitted by मिलिंद महांगडे on 22 November, 2019 - 02:17

अवंतीला मेसेज पाठवून मी चूक करून बसलो असं आधी मला वाटत होतं . पण नंतर शांतपणे विचार केला , आणि लक्षात आलं की हे कधी ना कधी तिच्या घरच्यांना कळणारच होतं ते आता कळालं . जाऊद्या जे होईल ते बघून घेऊ असा विचार करून मी सकाळी आठ वाजता स्टेशनला जायला निघालो . स्टेशनवर पोहोचलो तेव्हा भरत आलेला होता . तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या पाठीवर थाप मारली तसा तो एकदम दचकला आणि बाजूला जाऊन बोलू लागला . त्याच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव होते . थोड्या वेळात शरद सुद्धा आला . आमचे एक एक मेम्बर येत होते . तेवढ्यात गाडी येण्याची सूचना माईक वरून देण्यात आली .

विषय: 

सिझन २ - लोकल डायरी - १

Submitted by मिलिंद महांगडे on 28 October, 2019 - 10:52

नमस्कार वाचक मित्रहो ! लोकल डायरी चे ३० भाग प्रकाशित झाले होते . ज्यावेळी मी लोकल डायरी लिहायला सुरुवात केली, त्यावेळी काही कारणांमुळे तिचे केवळ तीनच भाग लिहू शकलो , पण नंतर हळूहळू तीनचे तीस कधी झाले माझं मलाही कळलं नाही . लोकल डायरी संपली आहे , असं मला वाटत होतं , पण वाचकांच्या प्रेमामुळे व सुंदर प्रतिक्रियांमुळे मला लोकल डायरी आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणा मिळाली . मधू आणि अँटीव्हायरसची लव स्टोरी , आणि त्या भोवती फिरणाऱ्या लोकल ट्रेनमधल्या ग्रुपच्या इतर सदस्यांच्या सुरस कथा घेऊन लोकल डायरीचे दुसरे पर्व लवकरच आपल्या भेटीला येत आहे . लोकल डायरी - सिझन १ संपले . आता सिझन २ !

Subscribe to RSS - #मुंबई लोकल ट्रेन