नर्मदे हर!

ll नर्मदा ll

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 March, 2013 - 07:16

रेवा तीरावर l संपावे जीवन
पापाचे क्षालन l व्हावे सार्‍या ll १ ll
नर्मदा हरच्या l घोषात चालून
दयावी उडवून l भवचिंता ll २ ll
तप:पूत मन l तप:पूत तन
अवघे होवून l जावे तेथे ll ३ ll
माईच्या प्रेमाने l भिजुनिया चिंब
पात्रातील थेंब l तिच्या व्हावे ll ४ ll
सोडुनिया भिती l काळजी उद्याची
जगावी रोजची l सुख दु:ख ll ५ ll
तीरावर उभे l संतांचे आशीष
तयाने जीवास l मार्ग लाभ ll ६ ll
कितीदा ऐकली l माईची ती माया
जीव तिच्या पाया l जडलासे ll ७ ll
साद घालतसे l युगे युगे वाहे
चल लवलाहे l आता तिथे ll ८ ll
जावे परीक्रमे l तिये दर्शनासी
उतावळी ऐसी l होय मना ll ९ ll

विक्रांत प्रभाकर

नर्मदे हर!

Submitted by मंजूताई on 3 April, 2012 - 08:25

चार-पाच वर्षांपूर्वी निवेदिता खांडेकरचे प्रत्यक्ष अनुभव ऐकण्यापूर्वी नर्मदा परिक्रमेबद्दल फारसं ऐकलं वा वाचले नव्हते. दोनएक वर्षापूर्वी जगन्नाथ कुंट्यांच 'नर्मदे हर' वाचण्यात आलं. त्यानंतर अमरकंटकलाही जाण्याचा योग आला. सध्या अनेक संस्थळांवर नर्मदा परिक्रमेवर लेख, चर्चा वाचण्यात आल्या. कधीतरी आपणही परिक्रमेचा अनुभव घ्यावा असं वाटू लागलं . अजून तरी योग आला नाही. पण प्रतिभाताईंनी मानस परिक्रमा घडवून आणली. नुकतीच माझ्या मैत्रिणीने सौ प्रतिभा चितळ्यांची, त्यांनी दोनहजार सात साली केलेल्या परिक्रमेच्या अनुभवकथनाची तबकडी ऐकायला दिली.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नर्मदे हर!