थोड वेळेआधी

Submitted by rasika_mahabal on 2 April, 2013 - 08:41

भारतातील रिती, रुढी, रिवाज, परंपरा, प्रथा ह्यांच्या नावाखाली स्त्रीयांना सतत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. उदाहरण द्यायची झालित तर भरपूर आहेत.

कुठल्याही लग्नात होणारया विधी बघितल्यात तुम्ही? पुरुष सर्व प्रकारचे विधी करतात व बाई फक्त त्याच्या हाताला हात लावून support दर्शवते. आजकालच्या जमान्यात बायका घर दार सगळ चालवतात, त्यांचा रोल कर्त्या बाईचा असतो, जे काय आयुष्यात घडत ते एक एकमेकांच्या equal मदतीने घडत त्यामूळे निम्म्या विधींमधे पुरुषांनी हाताला हात लावून बसायला हरकत नाहीये. लग्न लावुन देणारया पुरुष पूजारयांच्या ते पचनी पडायचे नाही. एखाद गोष्ट नुसती रीत आहे म्हणून follow करत बसायच कारण?

जन्मल्यावर वडिलांचे व लग्नानंतर नवरयाचे नाव लावायची अजून एक प्रथा. ह्या परंपरेच्या नावाखाली पुरुषांना पुरुषप्रधान समाज ठेवण्याची सोय मिळाली आहे. आईच नाव कुठेच का येऊ नये? शेवटी जन्म द्यायच सर्वात अवघड काम एक नारीच करते. अर्थात ह्या बदलाकरता पुरुषांचा विरोधच असणार कारण तस घडल नाही तर त्यांच्या नाहक अहंकारास ठेच पोहोचेल.

लग्न झाल्यावर मुलगी आता दुसरया घरची झाली वगैरे संवाद मला बोसट आणि मागासलेले वाटतात. मुलीच एक घर असत व मुलाच एक. कोणी कोणाच्या घरी न जाता दोघांच मिळून एक घर बनवायच असत. आईवडिलांसोबत वर्षानूवर्षां पासूनचे धागे दोरे तोडुन मुली बाहेर पडतात, पुरुषांची मात्र साधी नाळ सुध्धा तुटू नये? एकमेकांच्या आई वडिलांची गरजेनुसार सेवाशुश्रुषा करावी. फक्त मुलगा असेल तरच म्हातारपणाची काठी बनतो हे disprove केल्याशिवाय मुलगी झाली म्हणून तिचा निर्घुण बळी दिला जाणार नाही.

बायांनो तुम्ही married असाल तर मंगळसुत्री, टिकल्या, जोडवी घाला, आम्ही मात्र बोंगाडे फिरतो. ह्या प्रथा झिडकवणारया बायकांची छीथू करण अर्थातच पुरुषांच्या फायद्याच आहे पण बायकांकडूनही त्यांचा धिक्कार होतो तेव्हा मला त्यांची कीव करावीशी वाटते. अश्या बायका कदाचित बाई म्हणून जन्मण हे स्वलांछ्न, कमीपणाच व बांधीलकीच काम समजतात.

एक एक दोन दोन वर्षांनी भारताबाहेर राहणारी जोडपी स्वकीयांसोबत वेळ घालवायला मायदेशी जातात. त्यात पुरुष सगळे दिवस स्वतःच्या घरी राहतात व मुलिंकडून ही अपेक्षा ठेवली जाते की त्या अर्धा अर्धा वेळ दोनीही घरी घालावतील. अशी बळजबरी करण्याच कारण? तुमच्या सारख्या त्याही त्यांच्या कुटूंबियांना भेटण्याकरता, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याकरता व्याकूळ आहेत. त्यांनी त्यांच्या ईच्छांना ठेचून, स्वतःच मन मारुन का जगाव?

बायकांना त्यांनी दिलेल बलिदान, त्यांची ममता, सहनशीलता अशी काही अवजड विशेषण लावून मग घाऊक पुजल जात, ओळखल जात, एक स्त्री म्हणून जन्मदात्यांकडून ते जडवल; घडवल जात. ह्या सर्वात त्यासूध्धा तुमच्यासारख्याच एक भावनाप्रधान मानव आहेत हे का विसरल जात? एक पुरुष व बाई समाजातील स्वतंत्र्य व समर्थ घटक आहेत, त्यांना पदोपदी क्षणोक्षणी equal treatment मिळालीच पाहीजे व त्याकरता कोणीही स्वतःच्या साध्या भावनांचा बळी द्यायची गरज नाहीये.

समाजात घडणारया अनेक निर्दयी घटनांच कथन करायच राहिल ते पून्हा कधी करेन. तोवर तुम्ही मी म्हणते त्यावर शांत डोक्याने विचार करुन बघा ते नाही जमल तर तुमच्या शिव्यांची लाखोली comment मधे वहा. ती मी आनंदाने accept करेन. Revolution तर लवकरच घडणार आहे पण कदाचीत मी थोड वेळेआधी लिहीते आहे. कुठलीही inspiration वेळेआधी rebellious च वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो हे सगळे पन्नास वर्षांपूर्वीपासून चर्चिल्या गेले आहे. पन्नास वर्षांपूर्वी जास्त प्रमाणात दिसत होते, पण आजकाल त्यात नक्कीच बदल होऊ लागला आहे. विशेषतः सुशिक्षित कुटुंबात.
सुशिक्षित, मधयमवर्गीय कुटुंबात तरी लग्नाआधी मुलगा मुलगी खाजगी मधे एकमेकांशी बोलू शकतात. अगदी ४५ वर्षांपूर्वी सुद्धा हे होत असे.
जर कुणाशी प्रेमाने वागता येत नसेल, दुसर्‍यासाठी स्वतःच्या इच्छेला बाजूला ठेवणे अजिबातच जमत नसेल तर बायकाच काय पुरुषांचेहि असे वागणे सहन होणार नाही नि मग लग्न होण्याचा प्रश्नच नाही.

माझी मते अर्थात् जुनाट, बुरसटलेली नि थोडी उपरोधिक नि तुमच्या मताशी न जुळणारी आहेत. पण तुम्ही लिहीलेले सर्व सत्य आहे नि ते नाकारणे अशक्य.

१. माझ्या मित्राचा घटस्फोट झाला. त्याच्या बायकोने त्यांच्या मुलीचे लग्न लावले. सर्व विधी तिनेच केले. घटस्फोटीत नवरा (आमचा अनेक वर्षांचा मित्र) कुठेतरी हॉलमधे मागे बसला होता. पण त्याची काहीहि तक्रार नव्हती. कारण घटस्फोट घेतला तरी दोघेहि शिकलेले, दोघांनाहि माहित आहे घटस्फोट का झाला,. तेंव्हा हे असे होणार हे मान्यच. लग्न लावणार्‍या पुरुष भटजीला किंवा लग्नाला आलेल्या कुणालाहि त्यात काही गैर वाटले नाही.

२. नाव बदलणे - यावर मायबोलीवर बरीच चर्चा होऊन गेली आहे. ही परिस्थिती बदलेल अशी आशा आहे, भारतात तरी सध्या अजून कायदे सुधारायला पाहिजेत. कुणाचीहि हरकत असू नये. पण भारत म्हणजे काय, धम्माल नुसती. कामाच्या बाबतीत उजेडच. भ्रष्टाचार, जातीयवादी राजकारण, नि इतर अनेक धंदे करण्यातून कुणाला वेळ झाला तर.

३. नवर्‍याच्या 'घरी' न जाता, स्वतंत्र घर करणे हे भारतात तरी फक्त मध्यमवर्गीय, सुशिक्षित व श्रीमंत लोकांना शक्य आहे. शिवाय आपल्याकडे स्वतंत्र, कुणावर अवलंबून न रहाता रहाणे हे अजून लोकांच्या पचनी पडलेले नाही, त्यामुळे जरी नवरा बायकोने वेगळे घर केले तरी म्हातारे सासू सासरे त्यांच्या घरी येऊन रहाण्याची शक्यता बरीच आहे. मग सासू जास्त बॉसी की सून यावर बरेचसे अवलंबून आहे. नि सासू ची कायमच तक्रार असणार, असतेच. जगात कुठेहि गेलात तरी असेच असते. आता भारतीय जगात सर्वात हुषार (असे तेच म्हणतात, दुसरे कुणि म्हणत नसले तरी) , तेंव्हा यावर मार्ग त्यांनाच काढणे शक्य आहे.

४.<<<< ... मंगळसुत्री, टिकल्या, जोडवी घाला, ... पण बायकांकडूनही त्यांचा धिक्कार होतो तेव्हा मला त्यांची कीव करावीशी वाटते. अश्या बायका कदाचित बाई म्हणून जन्मण हे स्वलांछ्न, कमीपणाच व बांधीलकीच काम समजतात. >>>>

अहो या गोष्टी सुंदर दिसतात असे जर नवर्‍याचे मत असेल तर घालू दे त्यांना. आता आ़जकालचे सुशिक्षित नवरे नाही आग्रह करणार. कारण इतरहि कारणांनी सर्व जण (पुरुष सुद्धा) भरपूर नट्टा पट्टा करतातच. तेंव्हा या गोष्टींनी तुमचे सौंदर्य कमी होत असेल तर नवर्‍याला सांगा. नाहीतरी दोन तीन वर्षे झाल्यावर नवर्‍याच्या मताला कुठलीहि बायको काडीचीहि किंमत देत नाही.

आणि वेगळेच रहायचे, आपले आपण रहायचे तर बाकीचे लोक काही का म्हणेनात. नातेवाईक नाही तर इतर समविचारी मित्र मैत्रिणी अनेक आहेत.

आता मा़झ्या आयुष्यात कधी गरीब, अशिक्षित समाजातले लोक मला भेटले नाहीत. त्यांच्यात हे चालत असणार, नि त्यासाठी तुमच्या सारख्या महिला व पुरुष सुद्धा नक्कीच काही करत असणार. तुम्हाला सुयश.

My 2 cents ... आईला "आईपणापासून" पळून जाण्याची सोय निसर्गानेच ठेवलेली नाही ..... सगळया जगाला कळलेले असते अमूक एका बाळाची आई कोण ते ... पण तस वडिलांचे नसते .... आईने मूलाला आणि समाजाला जाणीव करून द्यायची असते ..... बाळाचा बाप कोण ते hence father's name is in picture.... जरा other way around बघितले तर किती मोठी 'पावर' निदान ह्या बाबतीत तरी बाई म्हणेल ती पूर्व दिशा असते .... हां! आता ती तिची हि 'पावर' खरोखर वापरते का? किंवा वापरू शकते का तो दूसरा मुद्दा.

तुमच्या विचारांना अनुमोदन असले तरी ..... अश्या रूढी, परंपरा मागे "बळी तो कान पिळी" हे अंतीम सत्य आहे सो जोपर्यंत शारिरीक दृष्ट्या बलवान होत नाही, आपली by default natural ability to produce नष्ट होत नाही, production ability ला supplement करणार hormones आपल्या शरीरात आहेत तोवर परिस्थिती फार drastic बदल काही होणार नाही.

स्त्री शिकली, स्वतन्त्र झाली, बरोबरीने काम करते वै. मध्ये"भारताला स्वातंत्र्य मिळाले का दिले का भारत स्वतंत्र झाला?" इतकेच तथ्य आहे .... अस मझ्या अल्पमतिला वाटते . Sad

सुंदर लिहिलंय. पटले. अगदी रोजच्या जगण्यात ही हे जाणवते.
आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ,घरातले इतर निर्णय , घरातल्या कांमाची विभागणी, मुलांचा अभ्यास यासारख्या गोष्टीतही विषम विभागणी असते.

एक एक दोन दोन वर्षांनी भारताबाहेर राहणारी जोडपी स्वकीयांसोबत वेळ घालवायला मायदेशी जातात. त्यात पुरुष सगळे दिवस स्वतःच्या घरी राहतात व मुलिंकडून ही अपेक्षा ठेवली जाते की त्या अर्धा अर्धा वेळ दोनीही घरी घालावतील. अशी बळजबरी करण्याच कारण? >>> कारण लग्नानंतर नवर्‍याच्या घरचेही मुलीचे कोणीतरी लागतात, ते घर तिचेही असते. आता, मुलीला जर नवर्‍याचे घर-माणसे आपली आहेत असे वाटत नसेल, तर ...लग्न म्हणजे नवरा आणि बायको यांचेच फक्त नाते असे आहे का?
हल्ली जावईपण येऊन रहातोच कि ४-८ दिवस सासुरवाडीला, तेव्हा फक्त मुलीलाच रहावे लागते असे काही नाहीए!