मंगळागौर फक्त बायकांची असते म्हणून! पुरुषांचीही असती तर घरातले सगळे पुरुष माझ्याभोवती फेर धरून विव्हळले असते "हास रे आदे" आणि मी पुटपुटलो असतो "कसा मी हासू"!
आज मी मन मोकळे करणार आहे. इतके दिवस काय काय मोकळे करायचा प्रयत्न केला, शेवटी समजले की आपल्या नशिबात फक्त मनच मोकळे करणे आहे.
माझ्या बायकोचे वडील बाबाजी बाबाजी असे ओरडत झोपेतून उठतात आणि माझी बायको 'आजी की माजी' असे ओरडत उठते. मी तिला थोपटत 'माजी हो, माजीच' असे समजावून पुन्हा झोपवतो तेव्हा ती किती प्रेमाने मला म्हणते, 'तुझं मन किती मोठंय, जा आता वर पलंगावर'!
हॅलो, हाssय, छे, हो, कसचे काय, आपले हाल कुत्रा पण खात नाय, हाय रे हाय'
आशिका, ऐक माझं, कधी कुठल्या घरची बडी बहू नको होऊ आणि झालीस तरी अशी उच्चकुलीन, खानदानी 'बडी बहू' तर नकोच नको गं बाई. का म्हणून विचारतेस, अगं काय सांगू माझी कर्मकहाणी. तुम्हा सार्यांना वाटेल की सुख टोचतं की काय हिला? पण नाही हो, नाही. माझ्याइतके दु:खी कुणीच नाही.
काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल.
हेल्लो माबोकर्स.. मी राजची हेलोवीन .. ऊप्स, शॉली शॉली, राजची हिलोईन..
नाही हं, तो बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रेहती है शेनोलिटा, वाला राज नाही काही.. अहो तो नाही का, जो चष्मा घालून खुर्चीवर बसून गिटार वाजवतो. तो हो, जो येडा बनून तमिताभने दिलेला प्रसादाचा पेढा खात नाही.. हा तोच तो, राज आल्यन मल्होत्रा.. नाम तो सुना ही होगा ! बेंबेंबे हेहेहे खीखीखी.. तोच तो !
सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
श्री. अजय पाटील यांनी काढलेले श्री गणेशाचे जलरंगातील चित्र.

प्रवेशिका बाद झाली आहे.
प्रवेशिका बाद झाली आहे.
प्रवेशिका बाद झाली आहे.
गणेशाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. पण मोदकांबरोबर बाप्पाला इतरही नैवेद्य आवडतात बरे! कोणी खीर करतात, तर कोणी मिठाई. नाना प्रकारची पक्वान्ने आपण बाप्पासाठी रांधतो. मग असे विविध नैवेद्य आपल्या मायबोलीकर मित्रांबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल ना तुम्हाला? चला, तर मग येऊ द्या तुमच्याकडचे एक से बढकर एक नैवेद्य.
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया ! सुरक्षेची कास धरूया !