आदित्य देसाई

बेफिकीर - मलाही कोतबो - आदित्य देसाई

Submitted by बेफ़िकीर on 1 September, 2014 - 08:34

मंगळागौर फक्त बायकांची असते म्हणून! पुरुषांचीही असती तर घरातले सगळे पुरुष माझ्याभोवती फेर धरून विव्हळले असते "हास रे आदे" आणि मी पुटपुटलो असतो "कसा मी हासू"!

आज मी मन मोकळे करणार आहे. इतके दिवस काय काय मोकळे करायचा प्रयत्न केला, शेवटी समजले की आपल्या नशिबात फक्त मनच मोकळे करणे आहे.

माझ्या बायकोचे वडील बाबाजी बाबाजी असे ओरडत झोपेतून उठतात आणि माझी बायको 'आजी की माजी' असे ओरडत उठते. मी तिला थोपटत 'माजी हो, माजीच' असे समजावून पुन्हा झोपवतो तेव्हा ती किती प्रेमाने मला म्हणते, 'तुझं मन किती मोठंय, जा आता वर पलंगावर'!

Subscribe to RSS - आदित्य देसाई