तुमचा अभिषेक - मलाही कोतबो - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते

Submitted by तुमचा अभिषेक on 31 August, 2014 - 04:08

हेल्लो माबोकर्स.. मी राजची हेलोवीन .. ऊप्स, शॉली शॉली, राजची हिलोईन..

नाही हं, तो बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रेहती है शेनोलिटा, वाला राज नाही काही.. अहो तो नाही का, जो चष्मा घालून खुर्चीवर बसून गिटार वाजवतो. तो हो, जो येडा बनून तमिताभने दिलेला प्रसादाचा पेढा खात नाही.. हा तोच तो, राज आल्यन मल्होत्रा.. नाम तो सुना ही होगा ! बेंबेंबे हेहेहे खीखीखी.. तोच तो !

काय बोलता, कोण तमिताभ ?? शॉली शॉली, माय मिस्टेक अगेन. ते मी कधी कधी थोडे बोबले बोलते ना. त्याचे झाले काय, सुसाईडच्या चक्करमध्ये दोन माळ्याच्या बिल्डींगवरून उडी घेतली खरी, पण पुढचे चार दात तोडून घेतले, तोंडाचा बोळका झाला, और फिर मै कभी किसी को मुंह दिखाने के काबिल नही रही. म्हणून मग पांढरी साडी नेसली आणि भूत बनून अद्रुष्य झाले. आता दुधाचे दात बनवायला टाकलेयत, ते मिळेपर्यंत पुढचा जन्म काही घेऊ शकत नाही. बाईचा जन्म कठीणच बाई..

हं तर मी काय सांगत होते, तमिताभ म्हणजे अमिताभ हो, माझा सासरा.. उप्स शॉली शॉली, पुन्हा गडबडले. पिक्चरमधलेच बोलायचेय ना.. तर माझा नाही हो त्या राजचा, होऊ घातलेला पण होऊ न शकलेला सासरा. अहो तो नाही का, पहाटे साडेपाच वाजता, अर्ली ईन द मॉर्निंग, स्वताही उठतो, सुर्यालाही उठवतो, आणि त्याला घूर घूर के बघून, शायनिंग मारतो. नाही ओळखले अजून .. चला तीन हिंट देते.., एक) परंपरा दोन) प्रतिष्ठा तीन) अनु... हो हो, शासन शासन, तोच तोच, श्री नारायण शंकर... महादेवन.. पुरा नाम .. हाईंग !

पटली ओळख ! आता माझे नाव सांगा?? नाही आठवत, चला मीच सांगते. माझे नाव मेघा ......... हो, बस्स एवढेच ! या दोन सुप्पर्रस्टारच्या जुगलबंदीमध्ये मला फूटेज पण कमी आणि माझे नाव पण कमीच. त्यात एक माझे वडील.. तेच ते, परंपरा प्रतिष्ठा, बोल दिया ना, बस्स बोल दिया .. स्वता आयुष्यभर निरुपा रॉयच्या पोटी जन्म घेतला, पण आता स्वताच्या पोटी ऐश्वर्या राय जन्माला आलीय तर तिचे एकतरी प्रेमप्रकरण असणार हे समजायला हवे ना. पण नाही, आमच्या डॅडी कूलना गुरू कुलची प्रतिष्ठा जास्त महत्वाची. अरे डॅडू पण मग निदान बॉईज स्कूल तरी उघडायचे नव्हते ना. आता लोण्याजवळ विस्तव पेटवला तर एक तरी शोला भडकणारच ना.. एक तरी निखारा तडतडणारच ना.. तो नेमका क्कककक्कक् ‘कोयला’ कडकडला !

अच्छा मुलांची शाळा उघडली तर उघडली, पण मग त्यात त्या राहुलराजला कशाला अ‍ॅडमिशन दिलेत. आधीच त्याला जोशमध्ये माझ्याशी रक्षांबधन करावे लागले होते आणि देवदासमध्ये पारोच्या जागी दारोला कवटाळावे लागले होते, तर यात तो हमखास चान्स मारणारच होता... त्याने तो मारला आणि फुकट मी मेले!

पण माझा प्रॉब्लेम इथेच संपत नाही. मी मेले, संपले, भूत बनून अदृष्य झाले, पण तो राज काही भूतयोनीतही मला सुखाने मरू देत नाहीये. त्याला माझा पासवर्ड माहीत आहे ना, त्यामुळे बघावे तेव्हा पुंगी वाजवून नागाला बोलावतात तसे अधूनमधून खुर्चीवर बसून वाजवायची गिटार बडवतो आणि मला बोलावत राहतो. गायचा मूड त्याला होतो आणि नाचायला मला बोलावतो. ईडियट बोलावतो सुद्धा अचानकमध्ये. अरे मला मेकअप शेकअप करायला तरी वेळ दे. आफ्टर ऑल मी जगातली सर्वात सुंदर भूत आहे यार !

बरे याला मी लांबूनच दर्शन दिलेले ही चालत नाही, याचा चष्मा पण जवळचाच ना. म्हणून मग याच्या जवळ येऊन याला फेरी मारून जा. काय तर म्हणे मोहोब्बते, आता त्या येड्याला समजलेय ना की भूतं खरोखरची असतात ते, तर मग माझ्यावर खरे प्रेम असेल तर मर ना बाबा एकदाचा तू सुद्धा आणि भेट मला कायमचा, कश्याला उगाच त्या रिकी टिकी मिकिच्या लव्हस्टोरीमध्ये दुनियादारी करत बसलायंस..

बरं त्या पोरांना इन्स्पिरेशनच द्यायचे होते तर लैला-मजनू, हीर-रांझा किंवा गेला बाजार वीर-झाराचीच लव्हस्टोरी सांगितली असतीस. पण नाही, आपलीच प्रेमकहाणी सांगायची होती. बरे सांगितलीस ती सांगितलीस, पण मला साधा सुईत धागा ओवता येत नाही हे सुद्धा सांगायची काही गरज ??? ... पण नाही !

हुश्श, मला वाटलेले पिक्चरच्या शेवटी तरी त्यांचे मिशन मोहोब्बते सक्सेसफुल झाल्यावर माझी यातून सुटका होईल. पण नाही, वेड्याने मला बोलवायचा पासवर्ड माझ्या बापाला पण देऊन ठेवला, आणि लावली माझी डबल ड्यूटी !

कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है, या दोन सुप्पर्रस्टारच्या लफड्यात या गरीब बिचार्‍या पारोचाच पार देवदास झालाय. भूतयोनीत रात्री कंपलसरी जागावेच लागते आणि पहाटे साडेपाचला हे हजर.. वरना अब से पहले, पीपल पे लटक रही थी मै कही ...

चला येते मी, माझे सातशे शब्द संपत आलेत. ईथे कोणी मनसोक्त त्रागा ही करू देत नाही यार. त्याला पण शब्दमर्यादा. एनीवेज, तसेही राज डार्लिंगचे तुणतुणे आणि शंकर पप्पांचे सुर्यनमस्कार कानावर पडू लागलेत, तर निघावे लागेलच.

पण थॅंक्स हं, तुमच्याशी बोलून हलके झाले बाई. जर कोणी माझी हल्लीची साईज पाहिली असेल तर समजले असेलच, या रायचा कसा पर्वत झालाय आणि हलके होण्याची मला किती गरज होती ते Wink

..... तुमचीच
बरसो रे मेघा मेघा ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ भाऊ डेहर चुकलं की ओ Proud

तुमचा अभिषेक - मलाही कोतबो - मेघा (मोहोब्बते) असं हवंय.
बाकी नेहमीप्रमाणेच अभिषेकस्टाईल! लै भारी

रिया _ बिचार्‍या त्या मेघाची तीच कैफियत आहे की राज आर्यन आणि नारायण शंकरच्या पुढे तिचे नावही कोणाच्या खास लक्षात राहत नाही. आणि आता लेखातही तेच नाव टाकले तर तिचा लेखही दुर्लक्षित राहील अशी भिती तिला वाटू नये म्हणून मुद्दामच मी ती चूक केली Wink

दिमाग हं Lol
भारीये Lol

तस पण राज आर्यन तिथे असताना कोणी कशाला त्या मेघाला लक्षात ठेवेल :डोळ्यात बदाम असलेली बाहुली:

धमाल लिहीले आहे Lol

स्वता आयुष्यभर निरुपा रॉयच्या पोटी जन्म घेतला >>>
पहाटे साडेपाच वाजता, अर्ली ईन द मॉर्निंग, स्वताही उठतो, सुर्यालाही उठवतो, आणि त्याला घूर घूर के बघून, शायनिंग मारतो. >>>
सुसाईडच्या चक्करमध्ये दोन माळ्याच्या बिल्डींगवरून उडी घेतली खरी, पण पुढचे चार दात तोडून घेतले, तोंडाचा बोळका झाला, और फिर मै कभी किसी को मुंह दिखाने के काबिल नही रही. >>> जबरी Lol

आणि महान्मेघा, आपली जीवनविषयक तत्त्वज्ञान ऐकले होते चित्रपटात. आत्महत्येच्या प्रयत्नाच्या संदर्भात स्वतःच वाचून पाहा:

"मोहब्बत भी जिंदगी की तरह होती है. कुछ मोड मुश्किल होते है, कुछ आसान...
मगर जिस तरह हम कभी जिंदगी का साथ नही छोडते, उसी तरह मोहब्बत का साथ भी नही छोडना चाहिये"!

Happy

अभिषेक,
धमाल लिहीलेस रे!
स्वता आयुष्यभर निरुपा रॉयच्या पोटी जन्म घेतला >> Happy
आधीच त्याला जोशमध्ये माझ्याशी रक्षांबधन करावे लागले होते आणि देवदासमध्ये पारोच्या जागी दारोला कवटाळावे लागले होते, तर यात तो हमखास चान्स मारणारच होता... त्याने तो मारला आणि फुकट मी मेले!>> Biggrin
मला बोलवायचा पासवर्ड माझ्या बापाला पण देऊन ठेवला, आणि लावली माझी डबल ड्यूटी >>> Rofl

"मोहब्बत भी जिंदगी की तरह होती है. कुछ मोड मुश्किल होते है, कुछ आसान...
मगर जिस तरह हम कभी जिंदगी का साथ नही छोडते, उसी तरह मोहब्बत का साथ भी नही छोडना चाहिये"!
>>>>>>>>>
यात त्या बिचारीचा दोष नाही रे, आधी तिचा पाय घसरला आणि मोहोब्बत झाली, मग गच्चीवरून पाय घसरला आणि सुसाईड झाली. Proud

बाकी प्रतिसादासाठी धन्स रे फारेण्डा, हे लिहिताना तुझेच लिखाण बेंचमार्क म्हणून होते डोळ्यासमोर..

मस्त

हुश्श, मला वाटलेले पिक्चरच्या शेवटी तरी त्यांचे मिशन मोहोब्बते सक्सेसफुल झाल्यावर माझी यातून सुटका होईल. पण नाही, वेड्याने मला बोलवायचा पासवर्ड माझ्या बापाला पण देऊन ठेवला, आणि लावली माझी डबल ड्यूटी !

भन्नाट आहे हा लेख, ऑफिस मध्ये असताना वाचला खूप हसू येत होत .
खरच अभी , खूप मस्त लिहतोस तू Happy

स्वता आयुष्यभर निरुपा रॉयच्या पोटी जन्म घेतला, पण आता स्वताच्या पोटी ऐश्वर्या राय जन्माला आलीय तर तिचे एकतरी प्रेमप्रकरण असणार हे समजायला हवे ना. पण नाही>>>>.

24_0.gif24_0.gif24_0.gif

स्वता आयुष्यभर निरुपा रॉयच्या पोटी जन्म घेतला, पण आता स्वताच्या पोटी ऐश्वर्या राय जन्माला आलीय तर तिचे एकतरी प्रेमप्रकरण असणार हे समजायला हवे ना.<<<<< मस्तच Rofl