लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधीच अंदाज आल्याने मी दहा पुड्या घेऊन ठेवल्या होत्या. जवळपास दोन महिने मी पुरवून वापरल्या. पण आता शेवटची पुडी संपत आली आहे. दुकानातही भेटत नाही. हे नवीनच संकट आले आहे.
तुमच्यापैकीही कोणाची अशी अवस्था झाली असेलच. तुम्ही यावर काय उपाय काढले. तंबाखूला कोणता पर्याय वापरला का? कसे मॅनेज केले?
दिवस कितीही दगदगीचा गेला तरी संध्याकाळी बहुतांश जण आंघोळ करत नाहीत. तशी आपल्याकडे पद्धतही नाही. तसे मनावर बिंबवण्यात आलेले नसते. उन्हाळ्यातील गर्मीचे दिवस सोडता आंघोळ ही एक कंटाळवाणी क्रिया असते.
यानिमित्ताने काही मनात आलेले प्रश्न
१. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आंघोळ करणे गरजेचे आहे का?
२. दिवसातून दोन वेळा आंघोळ केल्याने काही साईड इफेक्ट होतील का?
३. आंघोळीची गोडी कशी निर्माण करावी?
४. गार पाणी चांगले की गरम?
५.साबण/शांम्पू दोन्ही टाईम वापरावे का?
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात .
आज संध्याकाळी बायकोच्या मैत्रिणी घरी आल्या. खरं तर बायको आणि बायकोच्या मैत्रिणी पण मेडिकल फिल्ड मधल्या असल्याने त्यांना सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य असेल असा माझा समज साफ खोटा ठरला. आल्या आल्या स्वयंपाक घरात गेल्या आणि आणि तिथे बायकोसोबत गप्पा मारत बसल्या. अर्धा तास गप्पा मारल्यावर मस्त चहा नाष्टा केला आणि त्यात अजून म्हणजे माझ्या लहान मुलीला त्यांच्याकडे घ्यायला बघत होत्या. नन्तर त्यातल्या एका मैत्रीणीला फोन आला तर फोनवर बोलते थांब थोड्या वेळात येते. बायकोने विचारलं कोणाचा फोन होता तर बोलली इथून ज्या मैत्रिणीकडे जाणार आहे तिचा फोन होता.
६ मार्च २०२०. मी अमेरिकेहून विमानाने भारतात चाललो होतो. अमेरिकेत आणि सगळ्या जगातच कोरोनाची लागण सुरु झाली होती. खरं तर प्रवास करणं धोक्याचं होतं, पण आईची तब्येत बिघडल्यामुळे भारतात जाण्याला पर्याय नव्हता. विमानात कुणी खोकला, शिंकला की ‘अरे बापरे, याला कोरोनाची लागण नसेल ना?’ एवढा एकच प्रश्न मनात येत होता. विमान मुंबईला उतारण्याआधीच वैमानिकाने कल्पना दिली होती. आरोग्य तपासणीचे दोन फॉर्म भरून घेतले होते. त्या फॉर्मवर भारतातला पत्ता, फोन नंबर, ई-पत्ता इत्यादी माहिती होती. विमानतळावर उतरताच प्रत्येक प्रवाशाचे तापमान पाहून, त्याच्या फॉर्म वर शिक्के मारून जाऊ दिले होते.
लॉकडाऊन मध्ये मगरीचा बड्डे साजरा कसा करावा?
Submitted by तुमचा मेंढा on 25 April, 2020 - 21:00
हा धागा विडंबन वगैरे म्हणून काढलेला नाही, तर खरंच मनातले विचार मांडावेत म्हणून काढलाय.
जेव्हा जेव्हा कुणी म्हणत ना, की आज मुलाची फी भरायचीय, आज त्याची स्कुल ट्रिप, आज सुट्टी टाकून स्कुलमध्ये जायचंय, तेव्हा तेव्हा मी विचार करतो, खरंच मूल असणं गरज आहे, की पूर्वापार आलेली परंपरा म्हणून पाळायची म्हणून पाळायची?
सध्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीचं पालकत्व बघतोय. रात्री अपरात्री लहान मुलगी उठली, की रात्रभर त्याचा डोळा लागत नाही. सारखी रडत असते. सकाळी त्याचे तारवटलेले डोळे बघून वाईट वाटत. त्याच्या बायकोच म्हणणं तर असं की खूप कमी वयात तिच्यावर हे पालकत्व लादलं गेलंय.