विशेष मुलीचे संगोपन आणि आजार

Submitted by चिमु on 31 May, 2020 - 01:42

नमस्कार.. माझ्या दिरांची मुलगी special child आहे.. ती 8 महिन्यांची असताना तिचं MRI स्कॅन केलेलं. त्यात तिला agyria pachygyria नावाचा आजार आहे असं कळलं.तिचा मेंदूची वाढ खुप स्लो आहे असं समजलं .डोकं ही लहान आहे तिचं. .आता ती चार वर्षांची आहे. अजुन चालत नाही .बोलत नाही ... आणि आता तिला दररोज फिट्स येतात ...डॉक्टर गोळ्या औषधं देतात पण त्यावर काही उपाय नाही सांगतात...
प्रश्न 1. Agyaria pachygyria या आजाराविषयी कोणाला माहिती आहे का., म्हणजे कशामुळे होतो किंवा काय आहे नक्की.
प्रश्न 2. अशा मुलांचे संगोपन कसे करावे .
प्रश्न 3. या साठी कोणते निष्णात डॉक्टर सुचवू शकाल का.. शक्यतो रायगड , पेण, पनवेल, ठाणे या ठिकाणी किंवा पुण्यात ही..
प्रश्न 4. यासाठी होमिओपॅथी किंवा आयुर्वेदाचा काही उपयोग होऊ शकतो का..

मायबोलीवर असलेल्या जाणकारांनी याविषयी काही माहिती दिली तर खुप बरे होईल...धन्यवाद..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉ. विजयकर आणि सहभागी डॉक्टर्स माटुंग्याला कन्यका परमेश्वरी मंदिरामध्ये दर ३ महिन्याला होप फॉर द होपेलेस म्हणून होमिओपॅथी कॅम्प विनामुल्य घेतात. खूप गर्दी असते, पूर्ण दिवस जातो. लांबून येणार आहात तर त्यांच्या इतर ठिकाणी असलेल्या क्लिनिक मध्ये जाऊ शकता. विजयकरांची इतर ठिकाणी क्लिनिक आहेत, जेथे पैसे देऊन पण औषधोपचार होतात पण नंबर लागायला खूप वेळ लागतो. www.prafullvijayakar.com

फिट्स करता neurologist ला दाखवा, डॉ. अनाहिता हेगडे - उदवाडिया यांचे पूर्वी डॉक्टर हाऊस, जसलोक च्या समोर क्लिनिक होते आता महालक्ष्मी ला रेसकोर्स जवळ NH SRCC Children's Hospital येथे आहे.

प्रयत्न सुरु ठेवा, physiotherapy चा पण उपयोग होईल. सर्वात महत्वाचे, स्वतः वर आणि देवावर विश्वास ठेवा, आपल्या आजूबाजूला पॉसिटीव्ह ऊर्जा असू द्या, खूप लांबचा पल्ला आहे म्हणून थकू नका. छोटे छोटे गोल ठेवा.

त्या मुलीला खूप शुभेच्छा, लवकर बरे वाटो. आई वडिलांना सकारात्मक रहाण्यासाठी सदिच्छा !! >>> अगदी अगदी.

लवकर उपचारांना सुरुवात होऊदे, त्यासाठी योग्य मार्ग मिळूदे यासाठी शुभेच्छा.