कोरोनामुळे सर्वांचाच शारिरीक स्वास्थ जपण्यावर भार आहे. पण अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे बहुतेकांचे मनस्वास्थ देखिल बिघडले आहे. नकळत आलेले मानसिक दडपण अस्वस्थता बरेचदा पटकन कळतही नाही, परिणामी चिडचिडपणा, भांडणे, किंवा स्वत:ला कोंडुन घेणे देखिल होते. बर्याच जणांच्या नोकर्या गेल्या, पगार अर्धा झाला या ऊलट घरखर्च, ईतर खर्च जे पुर्वी होते त्यात जास्त फरक पडला नाही पण दुसरे खर्च वाढले जसे सॅनीटायझर, मास्क, काढे, मुलांच्या ऑनलाईन शाळा अन बरेच. त्यात पुर्वी सारखे बाहेर जाता येत नाही, मोकळे राहता येत नाही हे दडपण.
कोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे. सध्या त्याचा लाभ बरेच जण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आरोग्य सर्वेक्षणातही त्याचा चाळणी चाचणीसारखा वापर होत आहे. या उपकरणातून ऑक्सीजन संबंधीचे जे मापन दिसते त्याबद्दल सामान्यांत कुतूहल दिसून आले.
कसं वागायचं आता तरी कळतंय का !!!
बाळ गर्भावस्थेत असल्यापासून ते 5 वर्षे वयाचे होईपर्यंत चा काळ त्याच्या मेंदूच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो . जिथून कुठून मिळेल, तिथून माहिती मिळवून , वाचून मी माझ्या गरोदरपणात या नोट्स काढल्या होत्या . जसजशी नवीन माहिती मिळेल, तशी ती update करत राहिले. त्यातील क्लिष्टता टाळून सोप्या शब्दांत महत्त्वाची माहिती थोडक्यात देण्याचा मी या लेखात प्रयत्न केला आहे.
कोरोनासोबत कसे जगावे !!
प्रथम माझ्याविषयी थोडसं,मी 40 वर्षांचा असून नुकताच कोरोनामुक्त झालो आहे.
यापूर्वी मी मे महिन्यातच "कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ?" असा लेख लिहून मोकळा झालो होतो आणि जुलैमध्ये Unlock च्या पार्श्वभूमीवर "पुनःश्च हरीओम" या नावाचे तीन भाग लिहिले होते. काही कारणाने ते सगळे पोस्ट झाले नाहीत.
सध्या अनेक वेबसाईटवर डोनेशनच्या जाहीराती असतात.कॅन्सर पेशंट,अतिशय गंभिर आजार असलेले लहान मुलं,दुर्धर आजार झालेले म्हातारे लोक यांचे फोटो किंवा त्यांच्या नातेवाईकांचे रडवेले चेहरे हे व्हिडीयो स्क्रोल करताना दिसत राहतात.अत्यंतिक करुण भाव या चलचित्रामध्ये असतात.माझ्यासारख्या संवेदनशील माणासाला बरेचदा हे विचलीत करणारे असते.
व्यसनामुळे नैराश्य येतं कि नैराश्यामुळे माणसे व्यसनाला जवळ करतात हा एक कठीण प्रश्न आहे. पण काहीवेळा या दोन्ही गोष्टींचं सहचर्य आढळतं. दु:ख विसरण्याचं निमित्त म्हणून व्यसन जवळ करणारी काही माणसे आपल्याला आढळतात. अनेकदा माणसांना आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागतो. निरनिराळ्या प्रकारची संकटे येतात. काही आपदा स्वतःच्या चुकीमुळे सहन कराव्या लागतात तर काही त्रास इतरांमुळे भोगावे लागतात. प्रत्येक माणसांची या संकटांना तोंड देण्याची पद्धत आणि क्षमता निरनिराळी असते. काहीजण सकारात्मक दृष्टीकोण वापरुन प्रयत्नाने संकटांवर मात करतात तर काही निराश होऊन व्यसनाला जवळ करतात.