अक्कलशुन्य माणसं

Submitted by आगबबूला on 2 May, 2020 - 12:12

आज संध्याकाळी बायकोच्या मैत्रिणी घरी आल्या. खरं तर बायको आणि बायकोच्या मैत्रिणी पण मेडिकल फिल्ड मधल्या असल्याने त्यांना सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य असेल असा माझा समज साफ खोटा ठरला. आल्या आल्या स्वयंपाक घरात गेल्या आणि आणि तिथे बायकोसोबत गप्पा मारत बसल्या. अर्धा तास गप्पा मारल्यावर मस्त चहा नाष्टा केला आणि त्यात अजून म्हणजे माझ्या लहान मुलीला त्यांच्याकडे घ्यायला बघत होत्या. नन्तर त्यातल्या एका मैत्रीणीला फोन आला तर फोनवर बोलते थांब थोड्या वेळात येते. बायकोने विचारलं कोणाचा फोन होता तर बोलली इथून ज्या मैत्रिणीकडे जाणार आहे तिचा फोन होता. नंतर कोणत्या मैत्रिणीकडे जाऊन आल्या त्याची लिस्ट बायकोला सांगितली. त्या जवळ जवळ पाच सहा जणांच्या घरी जाऊन आमच्या घरी आल्या होत्या. इथून पुढे किती जणांच्या घरी जाणार होत्या देव जाणे. आणि लोकांच्या घरी जाण्याचं कारण काय तर यांना स्वतःच्या घरी बसून कंटाळा येतो म्हणून. त्यांना तिथेच दोन शब्द ऐकवायचं मन करत होतं. पण ओळखीचे असल्याने काही बोलू शकत न्हवतो. ही असली पढतमूर्ख अक्कलशुन्य माणसं आहेत म्हणूनच कोरोना एव्हडा फोफावत चाललाय. पुढच्या वेळी आल्या तर नक्कीच दोन शब्द ऐकवणार आहे. कोरोना होऊन संबंध बिघडण्यापेक्षा आधीच बिघडलेले बरे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बरोबर आहे तुमचे!

काल दूध, केमिस्ट आणि किराणा मालवाला अशा तीन दुकानांपुढे रांगेत असताना माझ्यामागून येऊन पुढे जाऊन थेट काउंटर वर जाऊन दुकानदाराशी बोलणाऱयांना झापले.

तिघेही सुशिक्षित होते.

बट्ट्याबोळ करतात lock down चा!

ही असली पढतमूर्ख अक्कलशुन्य माणसं आहेत म्हणूनच कोरोना एव्हडा फोफावत चाललाय
>>>>>>>>>>
अगदी खरंय. वर आणखी विचारतात की हे lockdown आणखी किती दिवस चालणार आहे. ते आपल्या वागण्यावर ठरणार आहे हे लक्षातच येत नाही यांच्या.

पुढच्या वेळी आल्या तर नक्कीच दोन शब्द ऐकवणार आहे. कोरोना होऊन संबंध बिघडण्यापेक्षा आधीच बिघडलेले बरे >>> फक्त आगबबूला होण्यापेक्षा तुमच्या भुतांना सांगून त्या मैत्रिणींचा चांगला बंदोबस्त करा.

ते दिवे लावा.... आणि थाळ्या बडवा नंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी हजारो लोकांनी जल्लोषात फटाके फोडले होते, नाच गाण्यात ४० वा वाढदिवस साजरा केला... असले अघोरी निर्णय घेणार्‍यांना अक्कल शून्य म्हणायचे का ?

दिवे लावा उपक्रमाला तर तब्बल ४८ तासांची पुर्वसुचना दिली होती.

बायकोच्या मैत्रीणींच्या नजरेत नाही व्हिलन बनता येत.. त्यांनी ठरवले तर काड्या करून संसार उद्ध्वस्त करतील आपला हि भिती असतेच

सेल्फी वगैरे काढले असतील तर सोशल मिडीयावर अपलोड करा..
फन टाईम स्पेनड वुईथ वाईफस बेस्ट फ्रेण्डस ईन लॉकडाऊन असे टायटल देऊन... आणि त्यांना टॅग करून.. मग तुम्ही जे खडसावयला संकोचलात ते काम ईतर करतील.

फन टाईम स्पेनड वुईथ वाईफस बेस्ट फ्रेण्डस ईन लॉकडाऊन असे टायटल देऊन... आणि त्यांना टॅग करून.. मग तुम्ही जे खडसावयला संकोचलात ते काम ईतर करतील

<<<

Perfect

हे खरोखरच चिंताजनक वर्तन आहे. एकदा आपल्या बायकोशी सर्व स्पष्ट बोलून घ्या. तुम्हाला वाटणारी काळजी स्वाभाविक आहे. मात्र आलेल्या मुली तुमच्या बायकोच्या सहकारी असल्याने तिच्याशी बोलल्याखेरीज काही कृती करू नका. सध्याच्या काळात तिला आपल्या सहकारी मुलींबरोबर संबंध बिघडवून चालणार नाही. आधीच भरपूर ताण असणार आहे या सगळ्याचा. तेव्हा युक्तीनेच हे पुन्हा घडणार नाही असे काही जमवलेत तर सर्वोत्तम.
पण हा हलगर्जीपणा फारच संतापजनक आहे!

हाच लेख watsapp वरुन त्यांच्यापर्यंत पोहोचावा. शहाण्या असतील तर समजून जातील.

फन टाईम स्पेनड वुईथ वाईफस बेस्ट फ्रेण्डस ईन लॉकडाऊन असे टायटल देऊन... आणि त्यांना टॅग करून..
>>>>
असा उद्योग कृपया करू नका.
त्यांना खडसावण्याऐवजी लोक तुम्हालाच खडसावतील, की हा बायकोच्या मैत्रिणी गोळा करून घरी बसला होता. Lol
सेकंडली, एखाद्या कर्तव्यदक्ष पोलिसाने बघितलं ना, तर वारी पक्की. Happy

अज्ञातवासी + 393

मी तर म्हणतो बायकोच्या अकाउंट ने पोस्ट करा - बायकोलाही फटके पडू द्या पोलिसांचे... तुम्हीदेखील आनंदी... अमानवीय धागा पण आनंदी होईल... Happy

या असल्या व्यक्तींवर कडक पोलीस कारवाई व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना भर चौकात कान पकडून 100 उठाबशा काढायला लावायला पाहिजे. म्हणजे हे प्रकार कमी होतील.

लोक तुम्हालाच खडसावतील, की हा बायकोच्या मैत्रिणी गोळा करून घरी बसला होता. Lol
>>>>>

त्याला खडसावणे नाही मत्सराने जळणे वोलतात. निघू द्या धूर. आणखी मजा येईल Proud

रच्याकने त्या मैत्रिणींचे नवरे / बॉफ्रे अगोदर गाठतील पोलिसांआधी.
>>>>

त्यांचाही विडिओ काढायचा.. लॉकडाऊनमश्ये राडा करायला आले.

बाकी एखाद्यासोबत ग्रूप सेल्फी बघून बायको वा गर्लफ्रेंडवर संशय घेणारया पुरुषांना झापलेच पाहिजे.

१. आमच्याकडे क्रिकेट सुरु झालंय.म्हणजे एक बॅट आणिएकच बॉल अनेकजण हाताळणार...
२.एक दर्दी बाईक घेऊन पोलीसांना यशस्वी (?) झुकांडी देऊन दूरवर जाऊन बारीक्सारीक मासे आणतो. माशांशिवाय घशाखाली घास उतरत नाही. माशांबरोबर करोना आणण्याचीही शक्यता.
३. एकाचा मुलगा आईबापांना न ऐकता मित्रांकडेच पडीक असतो. कुठून इन्फेक्शन आणेल सांगता येत नाही.
४. एक आई आणि मुलगी दोघींना दिवसभर तंबाखुची मशेरी लावण्याचे व्यसन आहे. काही अंतरावर झोपडपट्टी आहे. त्यात कुठेकुठे करोनाचा प्रभाव आहे असं ऐकलंय. तेथे जाऊन ती मिळवायला धडपडतात.
अशा परिस्थितीत आपण अजूनही वाचलो आहोत हा मला मोठाच योगायोग वाटतो.

जिज्ञासा >>+1
आगबबूला, तुम्ही बायकोशी बोला आणि दोघे मिळून ठरवा की पुढच्या वेळी काहीतरी युक्ती करून किंवा कारण सांगून मैत्रिणींचे घरी येणे टाळायचे. सध्या एवढा एकच उपाय दिसतोय.
किंवा अगदीच नाईलाज झाला तर बायकोने थोडा वाईटपणा घेऊन मैत्रिणींना समजवावे की सध्याच्या अवघड परिस्थितीत एकमेकांच्या घरी येणेजाणे माझ्या कुटुंबियांना बरोबर वाटत नाही. मैत्रिणी समंजस असतील तर समजतील अन्यथा तुम्ही त्यांचा विचार सोडून द्या.

बायकोच्या एका मैत्रिणींला फोन करून सांगा
माझ्या बायकोला कणकण वाटते आहे आणि घसा पण खवखवतोय उद्या आम्ही "टेस्ट"करून पाहणार आहोत.
यानंतर मजा पहा

सॉरी टू से, पण बायको वैद्यकीय शाखेतील असून सुद्धा, नकार का दिला नाही घरी येण्यास?
तिनेच आधी विरोध करायला हवा होता. सकारत्म्क विरोध दाखवू शकतो आणि जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी होती.
निव्वळ बेजबाबदारीचे वागणे दडपणाखाली, स्विकारणे चूकच आहे. त्यात तुमच्या घरी लहान मूल आहे.

निराशाजनक आहे अश्या बातम्या वाचणे.... ते हि वैद्यकियशाखेतील कर्मचार्‍यांकडून.

इथे लिहिण्यापेक्षा, बायकोशी बोलायचे आधी. बायकोच्या मैत्रीणी येणार ह्याची कल्पना न्हवती का तिला व तुम्हाला?
बायकोने, घारतील लोकांची परवानगी घ्यायला हवी अश्या काळात.

आज व्हॉटसवर एका मुलीचा विडिओ पाहिला. गोवंडी, मुंबई. त्यांच्या वस्तीत एक कोरोनाने मेला. प्रशासनाने शेजारच्यांची टेस्ट केली नाही. सहा जण स्वताहून करायला गेले. त्यातले चार पॉजिटीव्ह निघाले.

आता ती मुलगी सांगत होती की त्यांच्याकडे कॉमन संडास आहेत. आणि ते टाळायचा पर्याय नाही. ईथल्या कोरोनाग्रस्तांना शोधून वेगळे नाही केले वा आमची पर्यायी सोय नाही केली तर सारे मरू...

खरेच यार.. कॉमन संडास असतील तर कसे पाळायचे सोशल डिस्टन्सिंग.. कसा रोखणार कोरोना?

बायकोच्या एका मैत्रिणींला फोन करून सांगा
माझ्या बायकोला कणकण वाटते आहे आणि घसा पण खवखवतोय उद्या आम्ही "टेस्ट"करून पाहणार आहोत.
यानंतर मजा पहा

Submitted by सुबोध खरे on 3 May, 2020 - 12:09
>>>
छान, आणि विनाकामाची सगळी यंत्रणा कामाला लावा..
स्वतः डॉक्टर अशी पदवी लावून असले सल्ले देणाऱ्या महानुभावाना कोपरापासून सलाम! _/\_

स्वतः डॉक्टर असून ...
>>>

हा एक वेगळ्या धाग्याचा विषय आहे. येथील वादविवाद चर्चेत समोरच्या व्यक्तीच्या पेश्यावरून टिप्पणी करणे योग्य की अयोग्य Happy
डॉक्टर, वकील. शिक्षक अश्या पेश्यात असलेल्यांना या टिप्पणीचा सामना वरचेवर करावा लागतो.

त्यांचाही विडिओ काढायचा.. लॉकडाऊनमश्ये राडा करायला आले.
बाकी एखाद्यासोबत ग्रूप सेल्फी बघून बायको वा गर्लफ्रेंडवर संशय घेणारया पुरुषांना झापलेच पाहिजे.
>>>>
व्यक्तिसापेक्ष आहे, प्रत्येकाला आपल्या बायकोच्या सिक्युरिटीची काळजी असते.
काही तुमच्यासारखे आंबटशौकीन निघाले तर?????
Happy
(आता यांनीच हे एका धाग्यावर सांगितलं आहे. मला तर माहितीही नव्हतं)

व्यक्तिसापेक्ष आहे, प्रत्येकाला आपल्या बायकोच्या सिक्युरिटीची काळजी असते.
काही तुमच्यासारखे आंबटशौकीन निघाले तर?????
Happy

>>>>

परपुरुष आंबटशौकीन असेना...
विश्वास आपल्या बायकोवर असला पाहिजे ना नवरयाचा...
ती सुद्धा आंबटशौकीन पुरुषाचे शौक पुरव्त असेल हाच तिच्याबद्दलचा विश्वास असेल तर काय अर्थ उरला त्या नात्यात?

बलात्कार हा शब्द ऐकला असेलच.
आणि काळजी सिक्युरिटीची म्हणालोय मी, कॅरेक्टरची नाही.
असो फारच बिथरलाय काही दिवसांपासून... काळजी घ्या.

एखादा पुरुष आपल्या बायकोचा परपुरुषासोबत फोटो बघून तो आंबट्शौकीन असेल आणि आपल्या बायकोचा बलात्कार करेल या भितीने त्याच्याशी भांडायला जाणे हे तुम्हाला योग्य वाटते..

सिरीअसली?

डॉक खरे आणि रुन्मेष +1111111
रच्याकने हल्ली खरे आणि ऋ या id ने काहीही लिहिलं की काही id मुद्दाम टार्गेट करत आहेत त्यांना,त्यांचा प्रत्येक मुद्दा अगदी चुकीचाच, बेजाबदारच कसा, येडपट type चाच कसा ये दाखवत आहेत,
अर्थात दोघेही उत्तर द्यायला सक्षम आहेतच पण सतत मुद्दाम चालवलेल्या या उंदीर मांजर खेळाचा आता कंटाळा यायला लागला आहे,
Plz जमलं तर बास करा आता,
आशुचाम्प तुमचे सायकलिंग ट्रेकिंग चे अनुभव टाका न,
ते वाचायला निश्चितच खूप खूप जास्त आवडेल

Pages