लॉकडाऊन मध्ये मगरीचा बड्डे साजरा कसा करावा?

Submitted by अज्ञातवासी on 25 April, 2020 - 09:42

लॉकडाऊन मध्ये मगरीचा बड्डे साजरा कसा करावा?

Submitted by तुमचा मेंढा on 25 April, 2020 - 21:00

तर गेल्या महिन्याभरात बरेच जणांच्या कुटुंबात कोणाचा ना कोणाचा तरी वाढदिवस या लॉकडाऊन काळात आला असेल. ईतरवेळी घरच्यांसोबत राणीच्या बागेत जाणे, वडापाव - भेळ खाणे, लोकलला उलटे लटकणे, अगदी आदल्या रात्री बारा वाजता कंबरेला फक्त फटाक्यांची माळ लावून नाच करणे अश्या प्रकारे आम्ही हा दिवस साजरा करतो. सध्या यातले काहीही करता येणे शक्य नाही. गेला बाजार मटण कापायचे म्हटले तरी बोकड कापू देईल याची खात्री नाही. अश्यात घरातल्या मगरीला रिबिनी बांधून तिला स्टार अट्रक्शन म्हणून खपवणे हाच पर्याय शिल्लक राहतो. पण जर बड्डे दस्तुरखुद्द मगरडार्लिंगचाच असेल तर...

येस्स! तर ईथेही तीच गोची झाली आहे.

यात एक चांगले आहे की हा मगरीचा मोस्ट शाकाहारी बड्डे एव्हर ठरण्याची दाट शक्यता आहे. पण मटणाबाबत जरी मगर नेहमीसारखी सळसळ न करता तडजोड करायला तयार झाली तरी आपल्या मालक कम पार्टनरने एफर्टस घ्यावेत अशी तरी तिची नक्कीच अपेक्षा असणार. मायबोलीकरांना हे वेगळे सांगायला नको कारण येथली अर्ध्या जनतेने काहीतरी पाळलं असेल, तर अर्ध्या जनतेला कुणीतरी पाळलं असेल.

तर प्लीज प्लीज प्लीज या काळात आपण सेलिब्रेट केले असल्यास ते अनुभव आणि केले नसल्यास आयडीया जरूर शेअर करा. धाग्याचा फायदा मलाच....

मी मदारी काळू वाटायला नको म्हणून आधी माझ्या डोक्यातील आयड्या लिहितो. (वाटाणाप्पा, आपले सरकार, महादेवाचा अभिषेक, शशीभूषण...अरे माझ्याच आयड्या मला आठवत नाहीये. ब्रेक, ब्रेक.)

१) गिफ्ट - आमच्याकडे आदल्य रात्री बाराचा बड्डे करायचे फार फॅड आहे. मगरीची बहीण शेजारीच दिली असल्याने तीही व्हिजिट देते, आणि मग मी कंबरेला फटाक्यांची माळ बांधून डान्स करतो.
मग आता काय करायचे विचार करता लक्षात आले की मटणाचे तुकडे लपवून ते बारा वाजता तिला शोधायला लावायचे, हा चांगला प्लॅन ठरू शकतो. पण नाही मिळालं तर चवताळून मलाच चावायची.

२) डेकोरेशन - बड्डे सेलिब्रेशन म्हटले की हे आलेच. अन्यथा ईतर पार्टी आणि बड्डे पार्टीमध्ये फरक तो काय?
मेल मगराचे फोटो सगळीकडे लावणे, घरभर पाणी पाणी करून त्यात लोळणे (होमली फिलिंगसाठी) असा उपाय आहे. तिच्या मानेला, कानाला (मगरीला कान असतात? धागा काढा.) रिबिनी लावणे हा प्रकार करता येईल.-

३) मटण - मटणवाल्याला ती चावल्याने हा पर्याय बाद. घरातले झुरळ पकडून तिच्या तोंडात टाकणे हाच पर्याय, कधीकधी पॉपकॉर्न म्हणून काही माझ्याही तोंडात येतात. तसही मी माणूस सोडून काहीही खाऊ शकतो. तरीही नेहमीपेक्षा वेगळी स्पेशल डिश असे काही असेल तर सांगा. झुरळ, ढेकूण, पाली आणि काही तुफानी करायचं असेलच तर रस्त्यावर फिरणारे वरआह असा मुद्देमाल आहे.

४) मी खूपSSSSS रोमँटिक आहे. किंग सारखा. किंग कोण? ते विचारू नका. तिच्यासाठी एक कविता लिहिलीये. नवीन धागा काढतो. तिच्याबरोबर 'हाय गर्मी' करत फ़रशी पुसण्याचा (डान्स करण्याचा) मानस आहे.

हुश्श, एका धाग्यात एवढंच बस. दुसऱ्या धाग्यासाठी काही मटेरियल ठेवतो. प्लिज आयड्या (वाटाणाप्पा, आपले सरकार, महादेवाचा अभिषेक, शशीभूषण...अरे माझ्याच आयड्या मला आठवत नाहीये. ब्रेक, ब्रेक.)
हं, आयडिया सुचवा.

धन्यवाद,
तुमचा मेंढा 

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदीच चेकाळलंय ते प्रकरण.
आणि किंगचे नसतील इतके निष्ठावंत फॅन आहेतच वारा घालायला.
वाटशोधे आणि आशीर्वाद नावाचे.

मगर ये क्यूं करना है सेलीब्रेट, असं मगरीला चुकूनही विचारू नका. खूप चावेल.

आणखी एक धागा कुठे मिळत नाहीय... लिंक आहे का?

"लॉकडाऊन मध्ये मगरीचा बड्डे साजरा करावा का?"

शेवटचे दोन शब्द एकमेकांच्या जागी ठेवून आणखी पाचवा धागाही काढता येईल.

खराय भरत, बरोबर आहे तुमचे
मी तर हे समाजकार्य म्हणून करतोय
असेही लॉक डाऊन मुळे वेळ आहे आणि आजारी व्यक्तीला मदत होत असेल तर का करू नये?
आपली काही हरकत तर नाही ना?

खरं तर आख्या वेबसाईटला सतत शिंगावर घ्यायची एबिलिटी बघता प्रकरण प्रचंड बुद्धिमान आहे ह्यात काही वाद नाही. फक्त बुद्धिमत्तेचा वापर नको तिथे होतोय.

सुरुवात छान झाली. पण पुढे फार मजा नाही आली. माझ्याच लेखाचे विडंबन नसते तर अर्धवटच सोडले असते. जनरली मला माझ्या लेखांचे विडंबन वा मला केंद्रभागी ठेऊन लिहिलेले विनोदी लेख वाचायला मजा येते. त्यामुळे हा तितका जमला नाही असे वाटले.

याला कारण कदाचित मूळ लेखातच मालमसाल्याचा अभाव हे सुद्धा असू शकते. ती जबाबदारी मी घेतो.

पण त्याचवेळी माझ्या लेखांमुळे मराठी आंतरजालावरील विडंबनलेखांची लोप पावणारी परंपरा काही प्रमाणात टिकलीय त्याचे श्रेयही मी घेतो.

बाई दवे,

४) मी खूपSSSSS रोमँटिक आहे. किंग सारखा. किंग कोण? ते विचारू नका.
>>>>

हे ईथे कोणीही विचारणार नाही.
कारण किंग ऑफ रोमान्स म्हटले की तो शाहरूख खान हे माहीत न्सलेल्या व्यक्तीचा मायबोलीवर आयडीही नसेल Happy

अहो तो जेव्हा अभिषेक नावाने लिहीत होता तेव्हा अतिशय सुंदर लिहायचा, मी फॅन होतो त्याचा
तुम्ही तुमचा अभिषेक नावाने सर्च करून पहा
नंतर त्याला काय अवदसा सुचली माहिती नाही
आचरटपणा करण्यात मास्टरी केली की आपल्याला जास्त भाव मिळतो असा त्याचा समज झाला
सुरुवातीला मिळणारे प्रतिसाद तसेच होते मग नंतर बहुदा ते व्यसनात रूपांतर झाले असावे
असा माझा कयास आहे
खाखोडेजा

अहो तो जेव्हा अभिषेक नावाने लिहीत होता तेव्हा अतिशय सुंदर लिहायचा, मी फॅन होतो त्याचा
>>>

धन्यवाद
आपल्याला काहीतरी लिहित येते आणि चार लोकांना ते आवडूही शकते याचे मलाही दोनेक वर्षे कौतुक होते. पण नंतर समजले की छंद वगैरे म्हणून लिखाण ठिक आहे पण लिखाण हा काही आपला प्रांत नाही.
गंमत अशी आहे.की मायबोलीवरचा तुमचा अभिषेक हा फेक आहे. आणि ऋन्मेष ओरिजिनल आहे.
कधीतरी स्वतंत्र धाग्यात लिहेनच हे... बाकी आहे तो धागा Happy

धागा यायला पाहिजेच
साध्य असेही वेग कमी झालाय
रोज किमान दोन धागे यायला पाहिजेत
लॉक डाऊन चा काळ कसा काढावा नैतर लोकांनी
जास्तीत जास्त किती धागे काढावेत यावरही एक धागा येऊ देत

मी गैरसमज दूर करत बसणार नाही.
फक्त माझी बाजू सांगतो. मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायचे नाही.

मी कोणी भक्त नाहीये, एके काळी मी स्वतः तुटून पडायचो त्याच्या धाग्यांवर. नंतर लक्षात आले की श्वानपुच्छ आणी कार्ले आपला स्वभाव गुण सोडत नाही, किंवा चिखलातली वराहा बरोबरच्या मस्तीचा आनंद वराहलाच अधिक होतो, मग का आपले रक्त आटवायचे? जिथे आपल्याला स्वानंद होतो तो घ्या आणि पुढे चला.

इथे त्याच्या धाग्यांवर शड्डू ठोकून प्रतिवाद घालण्यापेक्षा करा ना इग्नोर?

अगदी या धाग्याचे नावच घ्यायचे तर सुसर बाई तुझी पाठ मऊ म्हणा आणी पकडा आपापला वेगळा रस्ता.

ऋन्म्या, पेढे वाट. "यु कॅन हेट हिम, ..., बट यु कॅनॉट इग्नोर हिम" पदाकडे तुझी वाटचाल सुरु झालेली आहे... Lol

रोज किमान दोन धागे यायला पाहिजेत
लॉक डाऊन चा काळ कसा काढावा नैतर लोकांनी
>>>

धन्यवाद आशुचॅंप
योगदान उच्लायचा
प्रयत्न राहील

ऋन्म्या, पेढे वाट. "यु कॅन हेट हिम, ..., बट यु कॅनॉट इग्नोर हिम" पदाकडे तुझी वाटचाल सुरु झालेली आहे... Lol
Submitted by राज on 25 April, 2020 - 22:30
>>>

धन्यवाद राज. प्रयत्न तोच असतो. पण छोट्या यशाने / छोट्याश्या कौतुकाने // छोट्याश्या टिकेने मी हुरळून जात नाही.

मग खोदादाद सर्कलला तुझं होर्डिंग लावु?..
>>>>
चालेल
पण खरी मजा तर त्या होर्डींगला काही समाजकंटकांनी फाडल्यावर आहे Happy

त्याचीही व्यवस्था करू
त्यात काय
मी तर आनंदाने दगड मारेन पोस्टर वर
अजून दगड स्पॉन्सर करणार असाल तर लगे हातो शाखा चे पण पोस्टर फाडेन
एका दगडात दोन पक्षी मारता आले तर उत्तम
मग त्यासाठी शाखा च्या पोस्टर वर याचे पोस्टर लावावे लागेल

मूळ धाग्यात अंडा भुर्जीची रेसिपी दिलीये. त्याच रेसिपीमध्ये अंड्याला मटनाने रिप्लेस करा, झकास पैकी एखादी स्कॉच उघडा, मागरीच्या डोळ्यात बघून चिअर्स म्हणा.. फुल रोमँटिक माहोल!

रोमँटिक मूड कोणाचा
आपला का मगरीचा?

मगरीला आपली पाठ मऊच वाटेल हो, पण तिला मूड मध्ये आणायला तिची पाठ मऊ म्हणालो तर महागात पडेल

मी कोणी भक्त नाहीये, एके काळी मी स्वतः तुटून पडायचो त्याच्या धाग्यांवर. नंतर लक्षात आले की श्वानपुच्छ आणी कार्ले आपला स्वभाव गुण सोडत नाही, किंवा चिखलातली वराहा बरोबरच्या मस्तीचा आनंद वराहलाच अधिक होतो, मग का आपले रक्त आटवायचे?
>>> पाथफाईन्डर तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती... लिहिताना समोरच्याला काय वाटेल इतका तरी विचार करून कमेंट करा...

Pages