आंघोळ कशी करावी?

Submitted by कोब्रा on 22 May, 2020 - 02:43

दिवस कितीही दगदगीचा गेला तरी संध्याकाळी बहुतांश जण आंघोळ करत नाहीत. तशी आपल्याकडे पद्धतही नाही. तसे मनावर बिंबवण्यात आलेले नसते. उन्हाळ्यातील गर्मीचे दिवस सोडता आंघोळ ही एक कंटाळवाणी क्रिया असते.
यानिमित्ताने काही मनात आलेले प्रश्न

१. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आंघोळ करणे गरजेचे आहे का?

२. दिवसातून दोन वेळा आंघोळ केल्याने काही साईड इफेक्ट होतील का?

३. आंघोळीची गोडी कशी निर्माण करावी?

४. गार पाणी चांगले की गरम?

५.साबण/शांम्पू दोन्ही टाईम वापरावे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ऋन्मेष तर नाही ना?
नवीन Submitted by देवकी on 22 May, 2020 - 12:55
>>>>>

नाही
आणि
हे सिद्ध करायला आता मी याच विषयावर एक स्वतंत्र लेख लिहिणार...

पाण्यात गुळ घातल्याशिवाय गोडी कशी येईल?
उन्हाळ्यात गरम पाण्यास पर्याय नाही थंडीत गार. >>> गझलेतला शेर वाटतो.

जवळच्या दुकानातून आंघोळीची गोळी मिळते का पहा>> त्यांना प्रश्न पडतील की गोळी
सकाळी घ्यावी की रात्री,
जेवणाआधी की नंतर,
गोळी गरम/गार पाण्याबरोबर घ्यावी की चघळुन खावी इ..
आणि जवळचे दुकान म्हणजे किराणा दुकान की मेडिकल.

हे पहा अंघोळ हे घाणेरडे लोक स्वच्छ होण्याच्या हेतुने करतात. हेतु चांगला असल्याने फार लक्ष देउ नये Happy

दासबोधात वाचून पाहा. तीर्थात अंघोळ कशी करावी दिलं आहे.
--------------;;
बाकी काही धबधब्यांत कुणी अंगाला एवढा साबण लावतात की ते पाहूनच धबधब्यात जावेसे वाटत नाही.

बाकी काही धबधब्यांत कुणी अंगाला एवढा साबण लावतात की ते पाहूनच धबधब्यात जावेसे वाटत नाही.
>>>>

जे पाहत नाहीत ते यापेक्षा भारी असते.