माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2020 - 18:52

सर्वसाधारणपणे लहान मुले रडत रडत जन्माला येतात, मी नाचत नाचत आलो...
अशी काहीतरी फुशारकी मी मारेन असे कोणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. किंबहुना नाचाचा "न" माझ्या अंगात कुठल्या वयात निपजला हा एक संशोधनाचा विषय ठरेल.

ज्या ज्युनिअर सिनिअर केजीच्या बालवाडी वयात आपण नाचाच्या नावावर काहीssही उड्या मारल्या तरी घरच्यांना काय आपला बाबू नाचतो म्हणून कौतुकच वाटते त्या वयात देखील मी हातपाय फारसे हलवल्याचे आठवत नाही. प्राथमिक शाळेतही शारीरीक शिक्षणाच्या नावाखाली आगे मूड, पीछे मूड म्हणत होणार्‍या कसरती आणि मूड मूड के ना देख, मूड मूड के वर होणारा नाच हे माझ्यासाठी एकसमानच होते.

पौगंडावस्थेत तर विचारू नका, माझे भलतेच गैरसमज होते. म्हणजे मुले नाचत असताना मुली त्यांना निरखून बघतात आणि आपण घाणेरडे नाचलो तर त्या आपल्यावर अन-ईंप्रेसड होतात अश्या अफवांचा मी शिकार होतो. आणि तुम्हाला तर अनुभवाने माहीत असेलच, की पौगंडावस्थेत मुली पटवण्याच्या पलीकडे आयुष्यात दुसरे काही ध्येय नसते. त्यामुळे नाचाला मी नेहमी ‘नाs’च म्हटले.

पुढे कधीतरी साक्षात्कार झाला की मुलींना नाचणारी नाही तर त्यांच्या तालावर नाचणारी मुले आवडतात आणि हळूहळू मी चारचौघांसारखे नाचायला सुरुवात केली. तरीही आपण नाचताना लोकं बघतात हा संकोच मनात असायचाच. त्यामुळे कधी खुलून असा नाच बाहेर आलाच नाही.

कालांतराने ही अवस्थाही गेली आणि मी विचार करू लागलो की आपल्याला काही सोनेनाणे चिकटलेले नाही, ना आपण मदनाचे पुतळे आहोत... (हो, अ‍ॅक्चुअली त्या वयात माझा हा देखील एक गैरसमज होता की आपण अगदीच सामान्य रुपाचे आहोत.) असो.., तर अश्यात आपला नाचही काही भारी नाही, तर आपल्याला कश्याला कोण नाचताना बघतेय. बघणार्‍यांसाठी आजूबाजूला बरेच काही छान छान उपलब्ध आहे. ते आपले डोळे तिथे शेकतील, आपण आपले एक कोपरा पकडून नाचावे हे उत्तम.

आणि बघता बघता चिमित्कार झाला. एवढे दिवस जखडून ठेवलेले अंग अचानक मोकळे झाले. ना कोणाकडे बघून नाचायचो, ना कोणाला दाखवायला नाचायचो, पण माझी स्वत:ची अशी नाचाची शैली लोकांना आवडू लागली. हा काहीतरी भन्नाट नाचतो असे कोणी म्हटले की ते कौतुकाने असायचे की माझी मजा घेण्यासाठी हे आधी कळून यायचे नाही. पण सगळेच का मजा घेतील? मग मला जाणवू लागले की आपण रुढ अर्थाने नर्तक वगैरे नसलो तरी एक मनोरंजक प्रकार नक्की आहोत.

हळूहळू नवरात्रीचे नऊ दिवस माझा नाच बघायला बिल्डींगच्या गॅलर्‍या भरू लागल्या. त्यांच्या वाढत्या अपेक्षा पुर्ण करायला मी उत्स्फुर्तपणे वेगवेगळ्या शैलीत नाचू लागलो. गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला तर ईतके झिंगल्यासारखे अतरंगी नाच नाचायचो की दुसरे दिवशी केवळ माझ्यामुळे सारी पोरं दारू पिऊन नाचत होती म्हणून बदनाम व्हायची. कॉलेजमध्येही वार्षिक स्नेहसंमेलनात डीजे गाजवून सोडायचो. एकदा असेच माझा डान्स बघून मला कॉलेजच्या एका ग्रूपने त्यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करायची ऑफर दिली. आणि तिथेच माझ्या गाठीशी जो काही थोडाफार अहंकार जमा झाला होता तो गळून पडला.

जेव्हा मी त्या पोरांसोबत प्रॅक्टीसला गेलो तेव्हा जाणवले की ते वन-टू-थ्री-फोर फाईव्ह-सिक्स-सेव्हन-एट म्हणत सराईतपणे एका लयीत नाचत होती. माझे अंग मात्र भलतीकडेच अन भलत्याच स्पीडने हलत होते. ना मी त्यांच्या स्टेप्सला स्टेप्स मॅच करू शकत होतो ना त्यांच्या नाचाचा टेंपो पकडू शकत होतो. हे स्टेजवर स्टेप्स बसवून नाचणे आपल्या कपातला चहा नाही हे मी समजून चुकलो. त्यांचा मग फारसा वेळ न खाता मी तिथून कल्टी मारली.

पुढे कॉलेज संपले. जॉब लागला. साधारण वर्षवर्ष भर दोन ठिकाणी जॉब केले. दोन्ही ठिकाणी एकेकदा पार्टी पिकनिकच्या निमित्ताने नाचायचा योग आला, तिथे नेहमीसारखे नाव काढले. पुढे मग सध्या आहे त्या कंपनीत जॉब लागला. कॉलेजचा व्रात्यपणा मागे सोडून आता जरा सिन्सिअर बेअरींग पकडले होते ज्याला साजेशी माझी नृत्यशैली नसल्याने ऑफिसच्या पार्टीत नाचापासून दूरच राहणे पसंद करू लागलो. अगदी सर्वात मोठ्या साहेबांनी जरी माझा हात खेचून मला नाचायला आत ओढले तरी एक हात वर करून गर्दीत शिरायचो, आणि मला नाचता येत नाही म्हणत दुसर्‍या अंगाने बाहेर पडायचो. पुढे माझ्यावर सनी देओलचा शिक्का बसून लोकांनी हात धरून खेचायचेही बंद केले.
घरी मात्र येता जाता, सकाळी ऑफिसची तयारी करताना, घरी आल्यावर कपडे बदलताना, किचनमध्ये लुडबूड करताना, रात्री बेडवर झोपायला जाताना जिथे संधी मिळेल तिथे सारी कामे सवयीने नाचाच्या स्टेप्समध्येच व्हायची. त्यामुळे नाचाशी असलेली नाळ मात्र तुटली नव्हती.

अश्यातच गेले वर्षी ऑफिसने नवीन वर्षाच्या पार्टीत आपल्याच कर्मचार्‍यांचे नाचगाण्याचे कार्यक्रम करायचे ठरवले. आपण कधीकाळी कॉलेजला असताना स्टेजवर नाचायला कच खाल्लेली ही जुनी सल पुन्हा टोचू लागली. म्हटलं बस्स आता. ठरलं. नियतीने पुन्हा दिलेली ही संधी. हिची माती करायची नाही. आता नाचायचंच!

दिवस कमी होते, कामाचा लोड खूप होता, ग्रूप डान्स कसा बसवायचा, कोणी बसवायचा हा प्रश्नच होता. सोलो डान्सला परवानगी नव्हती. एकट्याने पाच मिनिटे स्टेजवर नाचायची हिंमतही नव्हती. अखेर जमवले. कसे जमवले, ते जमवताना काय धमाल केली, काय चुका केल्या, काय शिकलो, हे सारे अनुभव स्वतंत्र लेखाचा विषय होईल, त्यापेक्षा तुम्ही सरळ खालचा नाचच बघा.

मी नाचतो हाच तेव्हा ऑफिसमध्ये सर्वांसाठी धक्का होता. त्यामुळे या कार्यक्रमानंतर ऑफिसच्या कानाकोपरयात माझी किर्ती पसरली. ज्यांच्याशी कधी कामानिमित्त वा कुठल्याही निमित्ताने संबंध आला नव्हता त्यांच्यातही माझ्या नाचाने माझी ओळख बनवली.

....मग यावर्षी पुन्हा नाचायचे होते. गेल्यावेळचे चारातले दोन मित्र जॉब सोडून गेलेले. एक मी आणि माझी एक मैत्रीण. आम्ही दोघांनीच मग पुन्हा हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. गेल्यावेळचे आव्हान वेगळे होते. स्टेज फिअर घालवायचा होता. यावेळी लोकांनी आधीपासूनच धरलेल्या अपेक्षांना जागायचे होते. त्यात यावेळीही प्रॅक्टीसला कमी वेळ म्हणजे फक्त शनिवार रविवारच मिळाले. पण तरीही लोकांच्या अपेक्षांना जागलो. येणारया प्रतिक्रियांवरून तसे वाटले Happy

हा नाचही खालच्याच विडिओत बघा. दोन्ही नाच एकत्रच जोडले आहेत. यूट्यूबवर अपलोड करायला प्रॉब्लेम येत होता म्हणून मायबोलीकरांच्या फर्माईशीनुसार दुसरया एका साईटवर खास माबोकरांसाठीच अपलोड केला आहे. बघितल्यावर प्रतिसाद द्यायला विसरू नका. मिक्स गाण्यांवर सोलो नाच आहेत पण प्रत्येकाच्या नाचात माझा थोडाफार सहभाग राहील आणि माझी नाचाची तसेच चमकोगिरीची भूक भागेल याची काळजी मी घेतली आहे Happy त्यामुळे सारी गाणी, सारे नाच दहा मिनिटे वेळ काढून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुर्णच बघा Happy

____________________________

माझे दोन्ही नाच एकत्र ईथे बघू शकता...

https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup

____________________________

जो देखे उसका भी भला, जो ना देखे उसका भी भला Happy
मनापासून धन्यवाद,
ऋन्मेष !

अरे हो, शीर्षक माझ्या नाचाचा प्रवास असे दिलेय जरी, पण खरे तर नाचाचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे Happy

ओळख टीप -
१) पहिल्या वर्षीच्या डान्स शो मध्ये खलीबली गाण्यावर नाचलेला मी आहे. पुढेही प्रत्येक गाण्यात अध्येमध्ये काळ्या कपड्यात दिसत राहीन.
२) यंदाच्या वर्षी बचना ए हसीनो वर नाचलेला मी आहे. ढगाला लागली कळवर शेवटी पुन्हा एंट्री आहे.

________

कोणाला वरच्या लिंकला प्रॉब्लेम येत असल्यास खालील लिंकवर बघू शकता -

गेल्या वर्षीचा नाच - यूट्यूबवर

https://www.YouTube.com/watch?v=RrY3DLDFRwQ

यंदाचा नाच - फेसबूकवर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1337425706426139&id=10000476...

____________

यंदा मागच्या डिजिटल लाईटसमुळे विडिओत चेहरे दिसणे त्रासदायक झाले. पण प्रत्यक्षात लाईव्ह बघणारयांना ते छान दिसत होते. फोटो व्यव्स्थित आले. तरी नाचणारा मीच होतो हा संशय कोणाला पडलाच तर दूर करायला फोटो टाकायचा चान्स घेतो Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहीला.
छान नाचता आपण. विनंतीला मान देऊन इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
हे क्रमशः असेल तर एखाद्या भागात, (असल्यास) गफ्रेच्या तालावर नाचल्याचे अनुभव पण शेअर करा. Wink

>>छान नाचता आपण. विनंतीला मान देऊन इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. << +१
त्या दुसर्‍या धाग्यावरचे माझे शब्द आता मागे घेतो... Wink

क्लिप पाहिली. डँस लाइक नोबडि इज वॉचिंग, या उक्तिचा प्रत्यय आला... Happy

एमएनसी टाइ दिसतोय ना! ( जोकिंग)
----------

राइजिंग स्टार्स ओफ नवी मुंबई!

छान आहे!

एवढं केलंच आहे तर फाईल साईज 150 MB लिहा लिंक पुढे. किंवा हा विडिओ कम्प्रेस* करून 75/37 एमबी करून टाकल्यास तुमची फ्री स्टोरेजही वाचेल आणि इतरांनाही सोपे पडेल डाउनलोडसाठी.

*- हे एक app video compressor panda by farluner apps & games पाहा.

रच्याकने ते नाचणारे तुम्हीच आहात हे कसे बरं सिध्द कराल?
:विचारात पडलेला बाहूला:>>>>+७८६
त्यासाठी वेगळा धागा काढतो. Lol

रच्याकने ते नाचणारे तुम्हीच आहात हे कसे बरं सिध्द कराल?
:विचारात पडलेला बाहूला:>>>>+७८६
त्यासाठी वेगळा धागा काढतो. 

नवीन Submitted by आनंद. on 5 January, 2020 - 08:05
>>>>>
प्रतिसादासाठी आयडी चुकला ? Uhoh

खटका आणि झटका कमी पडतो आहे. मूळ डान्स कॉपी केला असेल तर तुमची एनर्जी कमी पडती आहे. Your movement is a little too constrained. थोडा rawness आणखीन पाहिजे (मूळ डान्स पेक्षा तुमची कोरिओग्राफी वेगळी असेल तर कोरिओग्राफी बदलुन बघा)

यंदा मागच्या डिजिटल लाईटसमुळे विडिओत चेहरे दिसणे त्रासदायक झाले. पण प्रत्यक्षात लाईव्ह बघणारयांना ते छान दिसत होते. फोटो व्यव्स्थित आले. तरी नाचणारा मीच होतो हा संशय कोणाला पडलाच तर दूर करायला फोटो टाकायचा चान्स घेतो Happy

त्या दुसर्‍या धाग्यावरचे माझे शब्द आता मागे घेतो... Wink
>>>
धन्यवाद राज Happy
एखादी गोष्ट करण्याची मजा तेव्हाच जेव्हा ती अनपेक्षित असते.

सर्व प्रतिसादांचे आभार. सुधारणेच्या टिप्पणीज वेलकम. सविस्तर प्रतिसाद नंतर. सध्या झोप आलीय Happy

व्हिडीओ बघितला पण पूर्ण नाही बघितला.
डान्स तर छान केलंय तुम्ही.
पण एक गोष्ट खटकली
ज्याने व्हिडिओ शूट केला आहे त्याच्या विषयी.
डान्स करताना तुमचे क्लोज अप मध्ये शूटिंग करायला हवे होते.
बाकी फाफट पसारा शूट करायची गरज नव्हती.
डान्स मध्ये चेहर्या वरचे हावभाव सुद्धा महत्वाचे असतात ते बिलकुल व्हिडिओ मध्ये आले नाही .
परत अशी चूक करू नका.
महागुरू
राजेश

_/\_ अ ना
अजि सोनियाचा दिनू

म्हाग्रू असे लिहितात.
आता कुठे थोडे शुद्ध लेखन सुधारत आहे.
परत माझे लेखन
अशुद्ध करू नका.

Shut up and dance Happy
मस्त नाच आहे.

अच्छा हा आहे तर ऋन्मेष या आयडीमागचा व्यक्ती!!
150mb चा व्हिडिओ बघितला नाही. पण फोटो पाहिला.
चांगले आलेत फोटो. लोकांचे नाचतानाचे फोटो शक्यतो चांगले येत नाहीत...

व्हिडीओ पाहिला. ऋन्मेषचा डान्स आवडला. सुधारणेसाठी वाव आहे, पण न शिकता करणं आणि ऑफिस क्राऊड समोर नाचणं या दोन गोष्टी कौतुकास्पद आहेत. डान्स शिकत का नाही? जर न शिकता एवढा चांगला परफॉर्मन्स तर शिकल्यावर बेस्ट डान्सर व्हाल. मी स्वतः बॉलिवूड/हिपहॉप आणि कथक शिकते. (3 +2 दिवस असे आठवड्याचे पाच दिवस). क्लासमध्ये मिळणाऱ्या प्रॅक्टिस आणि टिप्समुळे आपल्या मूव्हमेंट्स मधे fineness येतो.

सॉरी, पण 'कमरिया' सारख गाणं मात्र ताईंनी वाया घालवलं. कोरिओग्राफी बंडल आणि मुलगी बिट्स सोडून नाचते आहे. पण परत एकदा मेहनत आणि कॉर्पोरेट क्राऊड समोर नाचण्याची हिंमत या दोन्ही गोष्टींचं कौतुक आहे.

व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुरुष, स्त्री कोणालाही उद्देशून हा शब्द वापरला तरी वाक्यात तो स्त्रीलिंगीच राहतो.

बॉलीवूड + हिपहॉप + कथक = फुल स्टॅक डान्सर !!! >>>> ऐकण्यात आलं की माधुरी दीक्षित रिटायर होणार आहे, म्हणून मग जोरदार तयारी चालू केली.

जोक्स राहू दे, पण ज्यांना (माझ्यासारखा) जिमिंगचा अत्यन्त कंटाळा असेल त्यांच्यासाठी वजन कन्ट्रोल करण्याचा हा बेस्ट उपाय. कंटाळा येत नाही, नवीन काही शिकलं जातं आणि flexibility वाढते. माझे क्लासेस चालू झाल्यापासून 6 महिन्यात 5 किलो वजन कमी झालं. पिंपल्स गायब कारण चिक्कार घाम येतो. शिवाय पार्टी असू दे, लग्नाचं संगीत असू दे ackward न होता नाचता येतं.

Pages