दिपिका पदुकोन जन्माला यावी.... पण शेजारच्या घरात

Submitted by अर्चना सरकार on 29 July, 2017 - 12:25

त्या दिवशी एका मैत्रीणीच्या घरी गेले होते. एकत्र कुटुंब सुखी कुटुंब असे साधारण वातावरण होते. तिचा मोठा भाऊ, त्याची बायको, त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा, त्यांचे आजी-आजोबा असे सारे एकत्र दिवाणखान्यात गप्पा मारत बसलो होतो. समोर टिव्ही चालू होता. टिव्हीवर गाणी लागली होती. बहुधा "लव आज कल" किंवा "कॉकटेल" सिनेमातील गाणे होते. त्यात दिपिका पदुकोन नाचत होती. सोबत त्या मैत्रीणीची साधारण चार-पाच वर्षांची भाची नाचत होती. भाचा तिच्यापेक्षा लहान असल्याने नुसतेच टाळ्या पिटत होता. सारेच कुटुंबीय एंजॉय करत होते. एकंदरीत चांगले वातावरण होते.

ती छोटीशी चिमुरडी खरेच छान नाचत होती. समोरच्या दिपिकाला कॉपी करताना आपल्यातर्फे काही इनोवेशन करत होती. मी मैत्रीणीला म्हटलेही, "छानच नाचते गं, रोजचा टाईमपास आहे तुम्हाला". मैत्रीण म्हणाली, "हो गं, आता पाच वर्षांची झाली की तिला डान्स क्लासला घालणार आहोत". आपल्या मुलीचे कौतुक ऐकून तिच्या आईचाही चेहरा खुलला.

आणखी एखाद दुसरे वाक्य बोललो असू, आणि आम्ही तो नाचाचा विषय जास्त वाढवतो आहे हे पाहून मैत्रीणीचे बाबा, म्हणजे त्या चिमुरडीचे आजोबा मध्येच म्हणाले, "ते नाच वगैरे मुलींच्या जातीला काही नाही. आपल्याकडे नको असलं काही". बोलण्याचा टोन अगदी उत्साहावर क्षणात विरजन टाकावे असाच होता. ते त्या मुलीच्या आईच्या चेहर्‍यावर दिसलेही. मला पटकन माझा स्वभावाला अनुसरून चार शब्द सुनवायची खुमखुमी आली. पण पहिल्यांदाच त्यांच्या घरी जात होते, कोण कसा असेल याची कल्पना नव्हती. आजोबांनी म्हटले म्हणून लगेच तसेच व्हावे असे नसावेही, आपण का उगाच विषय वाढवा असा विचार करून शांत राहिले.

पण मुलीचे बाबा, म्हणजे माझ्या मैत्रीणीचा भाऊ बोलला, "अहो असेच गंमतीने म्हटले. लगेच कोणी डान्स क्लासला टाकणार आहे का. मलाही नाही आवडत असे मुलींनी नाचलेले. त्यापेक्षा कराटेच्या क्लासला घालूया. आजच्या काळात मुलींना स्वत:चे संरक्षण करायला जमले पाहिजे"

मनातल्या मनात म्हणाले, अगदी आदर्श विचार आहेत. मुलींना बाहेरच्या गुंडमवाल्यांपासून आपले संरक्षण करणे जमलेच पाहिजे. पण या घरच्या संस्कृतीरक्षकांपासून त्यांचे संरक्षण कोण करणार?
समोर पडद्यावर दिपिका पदुकोन नाचत होती ते एवढा वेळ सारे एंजॉय करत होते, पण तीच दिपिका पदुकोन आपल्या घरात जन्माला यायला यांना नकोय.
मुलांना हवे ते आवडीचे करीअर करू द्यावेत, त्यांना आपले छंद जोपासू द्यावेत हा विचार हल्ली बळावत आहे. पण मुलींबाबत थोडा आणखी पुढे जाऊन विचार करायची अजूनही गरज आहेच.
पटलं तर विचार करा ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य मुद्दा मांडला आहे... जास्तीत जास्त लोकांपर्यंत लेख पोचला पायजे
>>>>>>>

च्रप्स,
शेअर करा
WHATSAPP
FACEBOOK
TWITTER
GOOGLE+
PINTEREST
EMAIL

दिपिका पदुकोन माझी आवडती नटी आहे, तिच्यावर मागे मी एक धागाही काढलेला.
खाली त्याची लिंक देत आहे.
मला तर आवडेलच माझ्या घरी दिपिका जन्माला आल्यास Happy

खरंय आपला समाज फार हळू बदलतोय. पूर्वी घरंदाज स्त्रिया सिनेमात काम करत नसत. सध्या तेव्हढी वाईट परिस्थिती राहिली नसली तरी येता जाता या लेखात सांगितल्याप्रमाणे अनुभव येत असतात.
सनी लिओनीचे चित्रपट आवडीने बघणारे आपल्या मुलांना तिचं करिअर निवडण्याची मुभा देतील तो सुदिन

सनी लिओनीचे चित्रपट आवडीने बघणारे आपल्या मुलांना तिचं करिअर निवडण्याची मुभा देतील तो सुदिन
>>>>>>>
पण त्यासाठी आधी सनी लिओनीचे चित्रपट एखादे कुटुंब दिवानखान्यात एकत्र एंजॉय करत बघत आहे तो सुदिन(!) उजाडायला लागेल ना?

तेही दिवस नक्कीच येतील. आमेन!
एके काळी निषिद्ध असणारी चुंबनदृष्ये आणि आलिंगने आता दिवाणखान्यात पोहोचली आहेतच. बाकीच्या पायऱ्याही पार केल्या जातील. इट्स ओन्ली मॅटर ऑफ टाइम

नवीन Submitted by श्री on 29 July, 2017 - 23:58
सरकार आल्या , रुन्मेस आला आता कोण येणं बाकी आहे ? ओळखा पाहू

Rofl

अर्चना छान लेख.
यापाठी लैंगिकता आहे हे स्पष्ट आहे.दुर्दैवाने सौंदर्यदृष्टी असणारे या देशात कमी आहेत व आंबटशौकीन जास्त आहेत.मानसिकतेचा दोष दुसरे काय!!

आपल्याकडे नको असलं काही

>> हे असलं काही बोलणारे लोकच फसाद की जड आहेत... हीच ती लोकं असतात जे दुसर्‍यांना नावं ठेवत असतात. "लोक काय म्हणतील?" या जगप्रसिद्ध प्रश्नातले लोक म्हणजे हेच ते लोक. मुलींनी नाचण्यात काही वाईट, चुकीचं आहे हे यांना कसं कळतं... कारण ते यांनीच ठरवलेलं असते. नाचणार्‍या मुली वाईट चालीच्या असतात हे यांनीच ठरवलेलं असतं. समाज समाज म्हणत ज्या अदृश्य लोकांकडे असली लोकं बोट दाखवत असतात, तो समाज म्हणजे हेच लोक. स्त्रियांनी मनसोक्त जगू नये, नाचू बागडू नये, धुंद जगू नये, जे काही करावे ते आपल्या इच्छेच्या परिघात (खरे तर सत्तेच्या) करावे. आपल्यासाठी करावे. हे स्त्रियांवर सत्ता गाजवायला, तिला संपत्ती समजणारे पुरुष आहेत.

हे घाबरतात कशाला तर जसे आपण इतरांच्या मुलीबाळींना दोष देतो, वाईट चालीच्या म्हणतो, आंबट नजरेने बघतो तसेच लोक आपल्या मुलींकडे बघतील म्हणून.....

र्सियांनी नाचावे जरूर पण तिकीट लावुन नाही। त्याला धंदा म्हणतात।
नवीन Submitted by पाटीलबाबा on 30 July, 2017 - 06:44
>>>> मग त्यात काय बिघडले? नृत्यकला ,अभिजात कला वगैरे तुमच्या गावीही नसेलच!
(असल्या दळभद्री विचारांच्या लोकांमुळे जगभरात कीती मने कोमेजली असतील याला काही मर्यादाच नाही)

गाण्याचे शब्द कळत नसताना दीपिका नाचते म्हणून कुठल्याही गाण्यावर हावभाव करत लहान मुलांनी / मुलींनी नाचणे अत्यंत तिडीक जाणारे असते. त्या पोरांचा त्यापेक्षा असल्या आचरटपणा करण्यात त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचा जास्त संताप येतो.
नृत्याचे जरूर शिक्षण घ्यावे क्लासिकलच नव्हे साल्सा पासून काहीही पण त्याला काहीतरी प्रयत्न घ्यावेत.
नटीसारखी हुबेहूब नाचते म्हणून रियालिटी शो मध्ये तिला बघण्याची दळभद्री स्वप्ने बघणारे पालक फटकवून काढले पाहिजेत

आमच्या कॉलेजची गॅदरिंग असतांना, माझ्या एका कलीगची लहान मुलगी, "हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला" म्हणत स्वतः नाचत होती... पर्सनली मला तरी वाईट वाटलं होतं.....

आशुचॅम्प +१

याच कारणामुळे मी लहान मुलांच्या नृत्याचे कोणतेही शो बघत नाही. मागे एकदा सर्फिंग करताना चुकून लावणी का तत्सम गाण्यावर एक चिमुरडी नाच (!)करत होती ते पाहण्यात आलं .एवढ्याश्या त्या मुलीला कळत तरी असेल त्या गाण्यांचा अर्थ हे लक्षात येऊन Angry ही प्रतिक्रिया उमटली .तेव्हापासून हे शोज बघतच नाही

नटसम्राटमध्ये नाना पाटेकर आपल्या नातीला लावणी शिकवतो, त्यामुळे तिची आई चिडते, व नानाला घरातून हाकलवून लावते.
आणि मग नंतर कोणी घर देते का घर करत बसतो Happy

लहान मुले निरागस असतात. त्यांना जसे घडवू तसे ते घडतात. कलेत आणि कलाकृतीत अश्लीलता आपणच आणलीय. कारण पब्लिक डिमांड. आपण स्वतः बघताना ती गाणी एंजॉय करतो, आणि मग आपलेच बघून लहान मुलांनी त्याचे अनुकरण केले तर मात्र चिडतो. लहान मुलांनी अश्या लैला ओ लैला गाण्यांवर नाचणे हे आपल्याला सहज टाळण्यासारखे आहे. ते टाळावे. नृत्यकलेचे पावित्र्य जपावे आणि मुलांना नृत्य शिकवावे. प्रोत्साहित करावे.

पहिली गोष्ट बीभत्स गाणी बघून मनोरंजन करून घ्यावे इतके वाईट दिवस कुणावर येऊ नयेत. जर कुणा पालकांना त्यात मनोरंजन मूल्य दिसत असेल तर त्यांना साष्टांग नमस्कार.
सगळयांनाच उच्च अभिरुची असावी आणि त्यांनी प्रायोगिक सिनेमे पहावेत असे म्हणणे नाही पण किमान काहीतरी स्टॅंडर्ड असावं का नाही?

पहिली गोष्ट बीभत्स गाणी बघून मनोरंजन करून घ्यावे इतके वाईट दिवस कुणावर येऊ नयेत.
>>>>>>
मग ती गाणी बघतात कोण? चालतात कोणामुळे?

लेखात उल्लेखलेले -- "बहुधा "लव आज कल" किंवा "कॉकटेल" सिनेमातील गाणे होते." -- हे बीभत्स अश्लील कॅटेगरीत येते का? हे चेक करायला हवे. धागाकर्तीने नेमके गाणे सांगितले तर सोपे पडेल. कोणाला काही आयडिया त्या पिक्चरमधील दिपिकावर चित्रत झालेले नाचाचे गाणे कोणते असू शकते?

च्रप्स, रुन्मेष, सिंजि, धन्यवाद
नानाकळा आपल्या मताशी सहमत

शेजारच्या घरातही नको....... >>> पद्म, आपल्याला नेमके काय आणि कोणत्या बाजूने म्हणायचे आहे हे समजले नाही.

र्सियांनी नाचावे जरूर पण तिकीट लावुन नाही। त्याला धंदा म्हणतात। >>> मधुबाला ते मीनाकुमारीपासून दिपिका ते माधुरीपर्यंत सर्वांनी हा धंदा यशस्वीपणे करून बरेपैकी मानमरातब आणि पैसा कमावला आहे. गायन या धंद्याबाबत हेच आशा भोसले आणि लतादीदी, ते श्रेया घोषाल यांना लागू.

सनी लिओनीचे चित्रपट आवडीने बघणारे आपल्या मुलांना तिचं करिअर निवडण्याची मुभा देतील तो सुदिन >>>>> व्यत्यय, आपला उपरोध समजतोय. पण ज्या दिवशी कुटुंबासोबत दिवाणखान्यात बसून सनी लिओनचे चित्रपट पाहिले जातील तेव्हाच तुम्ही म्हणता ती चर्चा करण्यात अर्थ आहे. आजच्या तारखेला आपल्या मुलींनाच का, कोणी आपल्या मुलांनाही तुम्ही म्हणता त्या चित्रपटात काम करायला परवानगी देणार नाहीच.
बेसिकली तुमचे म्हणजे असे आहे, एखाद्या मुलीला जीन्स घालायची घरून परवानगी नसेल. तिच्या भावाला असेल. जेव्हा ती ही परवानगी मागेल तेव्हा तुम्ही तिला सुनावणार, आज जीन्स घालायची परवानगी मागशील, उद्या मिनी स्कर्ट घालायची परवानगी मागशील, परवा बिकीनी आणि काय काय.... मी म्हणते हा पुढचा विचार कशाला?
साधा मुद्दा आहे, हृतिक रोशन आपल्या घरात जन्माला आल्यास कोणाला काही हरकत नाही, पण दिपिकाने तेवढे येऊ नये. ईथे काही जणांना हरकत आहे. सर्वांनाच नाही. आपण त्या काही जणांत नसाल तर आपले अभिनंदन आहे.

आशूचॅम्प, आपला मुद्दा अगदी योग्य आहे. पण तो या विषयाशी संबंधित नाही. आपण म्हणता तसे गाण्यात काही बीभत्स असेल तर ती स्वत:ही बघू नयेत आणि मुलांनाही दाखवू नयेत हे अगदी मान्य. पण मुलगी नृत्य शिकली म्हणजे झाले, ती आता अश्या बीभत्स गाण्यांवर नाचणार असे गृहीत धरून कसे चालेल?

लेखात उल्लेखलेले गाणे मी नंतर शोधले. पण मला ते ईथे द्यायची गरज भासली नाही. ते गाणे कुठले आहे याने मुद्दा बदलणार नव्हता. पण चर्चा ते गाणे कोणते असावे याभोवती रेंगाळू नये म्हणून आता लिंक देते - आहुउन आहुन, लव आज कल - https://www.youtube.com/watch?v=GUuJQKUjSf0

Pages