आयुर्वेद

पांढ-या डागांवर (कोड) पुण्यात आयुर्वेदीक उपचार कुठे होतात ?

Submitted by टकाटक on 4 October, 2012 - 07:29

पांढ-या डागांवर (कोड) पुण्यात आयुर्वेदीक उपचार कुठे होतात ? माझ्या एका नातेवाईकांच्या मुलीला झाले आहेत. पुर्णपणे बरे झाल्याचा कुणाला वैयक्तिक अनुभव आहे का? मी खुप वर्षाआधी ऐकले होते की पुण्यात एके ठिकाणी उपचार होतात व कोड पुर्णपणे नाहीसे होते पण पत्ता आठवत नाहीये , कुणी मदत करु शकेल का?

त्वचाविकार Eczema Atopic dermatitis

Submitted by टिकोजी on 1 August, 2012 - 13:21

कोणाला खात्रीशीर Eczema Atopic dermatitis या विकारावरील औषधांविषयी व घरगुती उपचारांविषयी माहिती आहे का ?

माझा ४ वर्षाच्या मुलाला लहानपणापासून हा विकार आहे. Eczema चा उद्रेक बर्याच कारणांनी होऊ शकतो. Allergy युक्त खाद्य पदार्थ हे एक कारण आहे, पण Eczema चा उद्रेक तापमानात बदल इ यांनीही होऊ शकतो. माझे लिहिण्याचे प्रमुख कारण फक्त Eczema ची माहिती देणे नाही तर त्यावरील घरगुती औषधांबद्दल माहिती गोळा करणे आहे. या विकारावर त्वचेवरून लावायची मलमे (Steroidal व इतर) मिळतात पण या औषधांचे खूप दुष्परिणाम आहेत (अंतर्जालावर अशी औषधे व दुष्परिणाम याची जंत्रीच आहे).

शब्दखुणा: 

कर्क रोग - एक आयुर्वेद द्रुष्टीकोन

Submitted by आयुष्यमान on 27 February, 2012 - 10:35

आज आपण पहात आहोत कि कर्क रोग सर्वदुर फोफावत आहे. सर्व मनुष्यजातीला या कर्क रोगाने अजगरा प्रमाणे विळखा
घातला आहे आणि हळु हळु हा विळखा आवऴला जाऊ लागला आहे. लहान मुल ,तरुण ,व्रुध्द सर्व वयोगटातील व्यक्ति
कर्क रोगाच्या विळख्यात अडकत चालले आहेत.याला कारणे सुद्दा तशिच घडत आहेत. कर्क रोग का होतो , त्याची कारणे काय आहेत याचा विचार आपण येथे सर्वप्रथम करणार आहोत. आधुनीक वैद्यक शास्त्राने कर्क रोगाच्या
कारणंचा खुप खोलात विचार केलेला नाहि असे दिसते. तंबाखु, मद्यपान, गुटखा, या प्रमुख कारणांचा विचार

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

Submitted by जागोमोहनप्यारे on 10 January, 2012 - 11:16

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

आमच्या गावात एका डॉक्टरांकडे बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी आहे.

१. काश्यपसंहिता, भैषज्यरत्नावली यांचा आधार
२. सुवर्णभस्मयुक्त गाईचे तूप, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, अश्वगंधा, पिप्पली व इतर औषधींचा वापर
३. हे औषध कोणत्याही महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी सुरु करावे.
४. वयोगट : जन्मजात बालक ते १२ वर्षे

कुणाला याबाबत माहिती आहे का? या औषधाचे नेमके फायदे काय आहेत?

भावनिक बुध्दयांक

Submitted by बाटेल बामन on 10 February, 2011 - 13:06

भावनिक बुध्दयांक......
कुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.
.
.
माबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अ‍ॅकेड्मीक हुशारीपेक्षाही EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही.

अ‍ॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.
आणि मग रिजेक्शन.....

बी ए एम एस नंतर अमेरिकेतील संधी ?

Submitted by एजे on 30 March, 2010 - 12:50

बी ए एम एस नंतर अमेरिकेतील संधी काय असेल यासंदर्भात माहीती हवी आहे.
बी ए एम एस च्या बेसिस वर कुठला कोर्स वा काही स्पेशलाय्झेशन करता येइल का. जेनेकरुन त्या क्षेत्रात काम करता येईल.
जाणकारानी कृपया मार्गदर्शन करावे.

अतिरिक्त चरबीची गाठ

Submitted by योडी on 18 December, 2009 - 00:42

माझ्या आईला पाठीवर एक गाठ आलीय. जे.जे. ला चेक केलं. डॉक्टरने सांगितलं की ती चरबीची गाठ आहे. ऑपरेट करायची गरज नाहीय. चाळीशीनंतर येतात अश्या गाठी. काही उपाय माहीती आहेत का कोणाला ती गाठ जाण्यासाठी? शेकवलं की तात्पुरती जाते आणि नंतर परत दिसते ती.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: लेखांक एकूण ४ पैकी १ ला

Submitted by नरेंद्र गोळे on 26 November, 2009 - 04:03

पतंजली ऋषींनी मनोकायिक मनुष्यव्यवहारांचा सखोल अभ्यास करून, सर्वप्राणीमात्रांच्या हितास पोषक मानवी व्यवहार कोणता (मनुष्याने कसे वागावे) हे सूत्रबद्ध रीतीने वर्णन केलेले आहे. तीच १९५ सूत्रे पातंजल योगसूत्रे म्हणून ओळखली जातात. ती चार भागांत विभागलेली आहेत. (पाद: म्हणजे पाव हिस्सा. प्राण्यास चार पाय अथवा पाद असतात. त्यापैकी एक म्हणजे पाद. पाव हिस्सा. अशाचप्रकारे शफ म्हणजे आठवा हिस्सा असतो.) समाधीपाद(५१), साधनपाद(५५), विभुतीपाद(५५) आणि कैवल्यपाद(३४). ज्या काळात हे घडून आले, तेव्हा ज्ञानसंकलन आणि प्रसाराचे काम पारंपारिक मौखिक पाठांतराद्वारेच होत असे.

Pages

Subscribe to RSS - आयुर्वेद