पांढ-या डागांवर (कोड) पुण्यात आयुर्वेदीक उपचार कुठे होतात ?

Submitted by टकाटक on 4 October, 2012 - 07:29

पांढ-या डागांवर (कोड) पुण्यात आयुर्वेदीक उपचार कुठे होतात ? माझ्या एका नातेवाईकांच्या मुलीला झाले आहेत. पुर्णपणे बरे झाल्याचा कुणाला वैयक्तिक अनुभव आहे का? मी खुप वर्षाआधी ऐकले होते की पुण्यात एके ठिकाणी उपचार होतात व कोड पुर्णपणे नाहीसे होते पण पत्ता आठवत नाहीये , कुणी मदत करु शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कॉलेजमधे असताना एका लायब्ररीमधल्या स्टाफला गळ्यावर पांढरे डाग आले होते. त्यांचं कॉम्प्लेक्शन अगदीच डार्क असल्यामुळे ते फार पटकन दिसायचे, म्हणुन नोट केलं गेलं होतं. मात्र माझं कॉलेज संपेपर्यंत ३-४ वर्षात ते डाग पुर्ण जावुन गळा अगदी बाकी स्कीनसारखाच झाला होता. त्यांना एकदा एका कॉलेजमधल्या मुलीला सांगताना ऐकलं कि त्यांनी खडीवाले वैद्यांकडे ट्रीटमेंट घेतली.

( हे पुस्तकं बदलताना ऐकलेलं संभाषण असल्यामुळे फार डिटेल्स माहित नाहीत, पण रिझल्ट्स मात्र प्रत्यक्ष पाहिले आहेत. माझी पोस्ट फक्त माहिती म्हणुन घेतली तरी चालेल. दुसर्‍याचा ऐकीव अनुभव असल्यामुळे मी रेकमेंड करत नाहीए. फक्त हा धागा वाचल्यावर तो प्रसंग लगेच आठवला म्हणुन शेअर केला एवढंच. )

Aa.raa.raa.
7 January, 2020 - 23.13

Manpurvak dhanyavad!