दि. १७ सप्टेंबर २०२६
✪ टॅन झिरो- Tan 0
✪ एक्स्पेक्टो पेट्रोनस
✪ मनाली ट्रेक आणि तिलगुण मेडोज
✪ "अरे हा असा कसा डान्स आहे!"
✪ गोल्डन ट्रिओ आणि किंचाळणारी ती
✪ "तू गणित शिकवायला ये ना!"
✪ पिस्तौल जेल में आ चुका है!
✪ नेहमी लक्षात राहील अशी भेट
✪ नवीन मित्र- मैत्रिणी
✪ मॅक्सवेलसारखी थरारक मॅच!
✪ हॉगवर्डसमधली वाक्यं
✪ सायकल दौर्यानंतरचं स्वागत- "Best father"
सणासुदीचं ताट, बेसनाचा थाट!
बेसनपोळी (वर तुपाचा गोळा), अळूच्या वड्या, कढी-पकोडे/बच्चू-कढी, भजी.
(फाउल नको म्हणून सणा-सुदीचे बाकीचे कलाकार फोटो काढून झाल्यावर पानात आले.)
ह्यातील बेसनपोळ्या आणि अळूच्या वड्यांचे लोंढे आदल्या दिवशी तयार करून ठेवता येतात. त्यामुळे पाहुणे येणार असतील तर हा बेत खूप सोयीचा होतो.
सवाल
ती अंघोळीला गेली. नाचत-गात तिचं काम निवांतपणे चाललं . डोक्याला शॅम्पू, अंगाला साबण फासून, शॉवर घेऊन झाला. बाहेर तिची आई वाट पहात होती.
मग ती टॉवेल गुंडाळून बाहेर आली.
‘ किती वेळ ? आम्ही मेलं अजून दोन तांबे ओतून बाहेर निघतोय !’ आई करवादली.
‘आये , हाच प्रॉब्लेम हाये ! ओके ? तुझ्या देहाला दोन तांबे कसे गं पुरतील ? ‘
‘असू देत. हे वाकडं बोलायला जमतंय,अंघोळीला तासभर नाचायला जमतंय आणि अभ्यासाचं काय ? आम्ही एवढाल्या फिया भरायच्या तुमच्या !’
त्यावर पोरगी म्हणाली ,’ ए टॉवेल सोडून आंदोलन करीन ! बोलतीयेस मोठ्ठी ! यावर्षीची फी अजून भरलीये का तरी ?’
शशक - कालवा अलंकार - अनुप्रास, श्लेष ;रस - सौम्य हास्य /(उपहास)
वाड्याच्या दरवाज्यापाशी ती सडासंमार्जन करत होती.
'अन्नदान दे माई. भलं होईल.' तिने दचकून वर बघितलं. लाल आलवणातील एक गलितगात्र म्हातारी पदर पसरून उभी होती. सकाळी सकाळीच विधवेचं दर्शन झाल्याने ती वैतागली पण दारातील याचकाला परत पाठवायचं नसतं.
म्हातारीच्या पदरात तांदूळ रिते करताना ती स्वतःशीच म्हणाली, 'काय भलं होईल? पुत्र एकुलता एवढा ऐतखाऊ, ऐशारामी, ऐदी!'
'पुत्र जवळ आहे ही भली गोष्ट समज!'
तिने चमकून वर पाहिलं पण म्हातारी पुढे निघालीही होती. मागे दाराशी आलेली तिची नणंद कुतूहलाने बाहेर डोकावली.
चमचमीत तुकड्या

मासे...?
नाही.. नाही.. तुम्हाला वाटताहेत तशा ह्या माशांच्या तुकड्या नाहीत.
तर हे आहे सुरणाचे काप!
साहित्य:-
अर्थातच
सुरण – मुख्य घटक.
+ आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, - हिरवं वाटण - मॅरिनेट करायला.
+ लिंबाचा रस (चवीला), हळद, लाल तिखट, मीठ – मॅरिनेट करायला.
+ तेल. – शॅलो फ्राय करायला.
कृती:-
आता कृतीला सुरवात करूया.
देवीचंद्रगुप्तम्
शक राजाच्या प्रस्तावावर रामगुप्तने मागितलेली मुदत मध्यरात्री संपत होती. “युद्ध टाळून राज्य आणि जीव वाचवायचा असेल, तर तुझी पत्नी ध्रुवस्वामिनीला माझ्याकडे पाठव.”
रामगुप्तला तो स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता.
शकाच्या शिबिरात मशाली मंदावल्या होत्या. सुवर्णपालखी तंबूसमोर थांबली. ध्रुवस्वामिनी आत आली.
“अखेर गुप्तांनी गुडघे टेकले!” शक राजा छद्मीपणे हसून म्हणाला.
तिला स्पर्श करण्याच्या हेतूने तो पुढे सरसावला. क्षणात कट्यार चमकली.
"गुप्तकुलाच्या स्त्रीची लालसा ठेवण्याचा परिणाम भोग."
सार भात हे छोट्या ऋन्मेषचे आवडीचे जेवण. त्या दिवशीही तो शाळेतून घरी आला तेव्हा आईने टोमॅटो उकडायला टाकले होते.
’चल बाळ, वाढते तुला.’ ती म्हणाली.
पण लहानग्या ऋन्मेषच्या डोळ्यात काठोकाठ भरलेले पाणी पाहून ती थबकलीच. ’काय झालं राजा? का रडतो आहेस?’
"आई, माझ्या पाठीवर मुलांनी ‘पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध रहा’.. असा कागद चिकटवला वर्गात... मीही त्यांना उद्या तसेच करणार आहे..." तो ओक्साबोक्शी रडू लागला.
रात्रिची झाकपाक झाल्यावर मोठीनं अंथरूण घातलं.
"छोटे.... आत..." मोठीनं आवाज दिला.
उकड्याचं छोटीला अजून थोडावेळ बाहेर बसायचं होतं.
ती मुकाट्याने खाटेवर कुबट मच्छरदाणीमधे गेली.
मोठी खाटेवर लांबलचक दोरी घेऊन बसली होती.
छोटी आल्याबरोबर मोठीने मच्छरदाणीच्या काठांच्या अन् बाजेच्या भोकांतुन दोरी घालून कडेकोट बंदोबस्त करणं सुरू केलं.
छोटीने डोळे मिटले.
"काय गं... ती बह्याड काय म्हंते ... तो हात घालतो म्हनं राती...? " मायनं कुजबुजत इचारल होतं एकदा.
"नाई नाई..." छोटी तंतरली होती मायला.