शशक स्पर्धा - स्वानंदी - मोठे मन ( शांत रस, श्लेष अलंकार)

Submitted by स्वानंदी१ on 16 September, 2026 - 09:31

सार भात हे छोट्या ऋन्मेषचे आवडीचे जेवण. त्या दिवशीही तो शाळेतून घरी आला तेव्हा आईने टोमॅटो उकडायला टाकले होते.
’चल बाळ, वाढते तुला.’ ती म्हणाली.
पण लहानग्या ऋन्मेषच्या डोळ्यात काठोकाठ भरलेले पाणी पाहून ती थबकलीच. ’काय झालं राजा? का रडतो आहेस?’

"आई, माझ्या पाठीवर मुलांनी ‘पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध रहा’.. असा कागद चिकटवला वर्गात... मीही त्यांना उद्या तसेच करणार आहे..." तो ओक्साबोक्शी रडू लागला.

आईने शांतपणे त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, ' बेटा, संस्कार फार महत्वाची गोष्ट आहे. सरांना जरूर सांग तू, पण मनात बदल्याची भावना ठेवून वागू नकोस. तुलाच त्रास होईल"

आईने तर मोजक्या शब्दांत जीवनाचे सार सांगितले होते !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा, हे मस्त आहे Proud
माझ्या आईने या सिच्युएशनला असेच सांगितले असते आणि वागतोही तसेच Happy

बाकी ते माझे सारभात लेख आजही मला फेसबुकवर कुठे कुठे दिसतात ते बघून छान वाटते. मग त्याखाली माझे नाव दिलेले असो किंवा नसो.. सारभाताचा प्रसार होणे महत्त्वाचे

छान.
सार म्हटलं की मला ही ऋन्मेश तुमच्या आईंची रेसिपीच आठवते. करतो पण ती बरेचदा. Happy