शशक स्पर्धा - बिपीन सांगळे - नाडी - रस - हास्य /भयानक

Submitted by बिपिनसांगळे on 17 September, 2026 - 01:42

नाडी

त्याला ती खूप आवडली होती. तिला त्याने पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून. त्याच्या मोठ्या बहिणीच्या लग्नात. ती त्याच्या बहिणीची नणंद होती. पण हे बोलणार कसं आणि कोणाला ? त्याला कळत नव्हतं आणि त्याची हिंमतही होत नव्हती.
एका लग्नात सगळी मंडळी जमली होती. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिच्या लग्नाविषयी बोलणी चालू आहेत. ती दुसऱ्या कोणाची तरी होणार,ही कल्पनाच त्याला सहन होईना .
तो आईकडे गेला.त्याने आईला ते सांगितलं.
ती म्हणाली,’ काय तरी- आपल्या ताईला ते किती त्रास देतात, तुला माहिती नाही ?’
पण आईने एक मोठ्ठा पॉझ घेतला.
तिचे डोळे चमकले, 'मी तयार आहे. त्यांची नाडी माझ्या हातात राहील - कायमची !’

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वयात येताना हम आपके है कोन बघितल्यापासून प्रत्येक घरच्या भावाच्या बहिणीच्या लग्नात हेच स्वप्नरंजन असायचे Happy