शशक - कालवा अलंकार - अनुप्रास, श्लेष ;रस - सौम्य हास्य /(उपहास)
ते दोघे खरंतर भिन्नरुची आणि भिन्नपथगामी. पण एकाने बेमुर्वतखोरपणे आपल्या शेजाऱ्याला धमकी दिली,तेव्हा दुसर्याने त्याला छळण्यासाठी छद्मपंथ स्वीकारला.मग काय,
एकच कालवा झाला आणि कालवा बंद करण्यात आला..
तोच तो..प्राचीन काळचा असुर मेधा.. सकलसृष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सैरभैर झाली.
कालवाबंदीने जनमनात कालवाकालव सुरू झाली. आता
रोजचे चार घास खाणार कसे..मग चुलीची पुन्हा चलती चालू झाली. आपल्या मुळांकडे परतणे म्हणजे ते हेच म्हणायचे!
माणसांनी चूल चेतवली खरी, पण बापड्या गाड्यांची गैरसोय काही विचारू नका. अनशापोटी अनेकींना आडवाट अवलंबावी लागली. काहीजणी समंजसपणे स्थानबद्ध झाल्या.
कालांतराने काही हुशार लोकांनी हिकमतीने वेगळी वहिवाट धरली. त्यामुळे सध्या तरी जगाला जणु नव'जीवन' मिळाले आहे.
(संत्रं सोलण्याची संधी नको आहे डोमा:)
छान
छान
ते दिवस आठवून कालवा कालव झाली
ते दिवस आठवून कालवा कालव झाली...
(No subject)
मला तरी कळली अनही पण तू
.
जमली आहे.
जमली आहे.
पोहोचली.
पोहोचली.
छान जमली आहे!
छान जमली आहे!
जमली आहे
जमली आहे
समजली आहे
समजली आहे
समजली, छान जमली आहे.
समजली, छान जमली आहे.