चित्रपट

सहजीवनाचा अर्थ सांगणारा 'अनुमती'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 April, 2013 - 13:25

सहजीवन म्हणजे नेमकं काय, हे सांगणारा नवा चित्रपट - 'अनुमती'.

तरुण, प्रयोगशील दिग्दर्शक व लेखक श्री. गजेंद्र अहिरे यांचा हा चित्रपट ३ मे, २०१३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ कालावधीनंतर प्रख्यात छायालेखक श्री. गोविंद निहलाणी यांनी मराठी चित्रपटासाठी छायालेखन केलं आहे. यापूर्वी 'शांतता! कोर्ट चालू आहे' आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या 'झाकोळ' या दोन चित्रपटांचं छायालेखन त्यांनी केलं होतं. 'अनुमती' हा श्री. निहलाणी यांचा तिसरा मराठी चित्रपट.

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये 'अनुमती'नं प्रेक्षकांची व समीक्षकांची वाहवा मिळवली आहे.

विषय: 

जेव्हा म्हणतो राजा, "आजचा दिवस माझा" (Aajcha Divas Majha - Movie Review)

Submitted by रसप on 31 March, 2013 - 02:46

आर्थिक वर्षाखेरीचे दिवस आहेत. नक्कीच ऑफिसमध्ये अनेकांच्या फुल्ल नाईट्स, लेट नाईट्स चालू असतील. हे दिवसच असे असतात की 'लोड' घेतल्याशिवाय काम होणारच नसतं. करोडोंचे पुस्तकी आणि प्रत्यक्ष हिशेब जुळवताना गद्धेमजुरी आणि मगजमारी कुठलाही मागचा-पुढचा, 'हे माझे काम आहे की नाही' वगैरेसारखा विचार न करता, करावीच लागते. ती करत असताना डोकं फिरतं, वैताग येतो, संताप येतो, चीडचीड होते पण अचूक ठोकताळा लागल्यावर, मेहनतीचं चीज झाल्यावर मिळणारा आनंदही अपूर्व असतो. तो पराकोटीचा मानसिक आणि शारीरिक थकवा एक वेगळंच समाधान देतो.

विषय: 

ये फुलोंकी राणी

Submitted by राजेंद्र देवी on 26 March, 2013 - 05:26

ये फुलोंकी राणी .. या सुप्रसिद्ध गाण्याचे मी केलेला भाषांतराचा प्रयत्न

तू फुलांची राणी वसंतातील कलिका
तुझे हासणे हे भुलविते मना
न हृदय माझे ताब्यात माझ्या
तुझे पाहणे हे खुलविते मना

तुझे ओठ जणू गुलाबाचे कमळ
प्रत्येक पाकळी हि प्रेमगीत आहे
त्या नाजुक ओठांवर प्रेमाची गाणी
ऐकवून आम्हाला तू भुलविते मना

कधी गाढ आलिंगन तर कधी संकोचणे
कधी बावचळणे तर कधी उसळणे
ह्या नजरेच्या पापण्या अलगद मिटविणे
मिटवून उघडणे भुलविते मना

न का र

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 25 March, 2013 - 03:43

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव्हतं; त्या काळात वर्षभर दूरदर्शन (ज्याला काही लोक कुत्सितपणे दूर्दशा दर्शन असेही म्हणत) नामक राष्ट्रीय प्रक्षेपण वाहिनीवर आठवड्यातून एक या हिशेबाने साधारण पन्नासएक जुने हिंदी चित्रपट पाहिले जात. त्या काळी चित्रपट प्रसारित होण्यापूर्वी निवेदिका थोडक्यात तसे निवेदन करीत असे. या निवेदनात चित्रपटाचे प्रमुख कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आदींची माहिती सांगितली जात असे.

माझ्या नजरेतून - जॉली एल एल बी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 18 March, 2013 - 22:42

काल सकाळी ह्या सिनेमाबद्दल बोलणं झालं आणि सिनेमा बघायचाच असं ठरलं. तसा आज सिनेमा बघूनही झाला. आवडला !!

एक कलाकृती म्ह्णून सिनेमा आवडलाच ! कथानक काही वेगळं नव्हतं खरं तर. नेहेमीचेच गरीबांवरचे अत्याचार आणि कायदा आंधळा असल्याचा फायदा घेणारे धूर्त वकील आणि त्याविरुद्ध लढा देणारा नायक !! सोबत एक छान नायिका, साथ देणारे त्याचे मित्र आणि शेवटी त्याला मिळणारा विजय. अगदी नेहेमीच्याच वळणाने जाणारी स्टोरी. पण तरीही काहीतरी वेगळं होतं !!

विषय: 
शब्दखुणा: 

साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांचं वर्चस्व

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 March, 2013 - 14:40

आज जाहीर झालेल्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपटपुरस्कारांत मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

'अनुमती' या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटासाठी श्री. विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

IMG_7884.JPG

'संहिता' या सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटातील संगीतासाठी श्री. शैलेंद्र बर्वे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

जॉली - एल.एल.बी.- सरळ साधा वॅनिला स्कुप....

Submitted by मोहन की मीरा on 18 March, 2013 - 03:34

काही काही सिनेमा आपल्याला का आवडतात ह्याचा विचार केल्यावर आश्चर्य वाटते. त्या सिनेमांत वेगळं काहीच घडत नाही.. सर धोपट मार्गाने ते चालत रहातात. पुर्वी साधारण ७०-८० च्या दशकात असे अनेक सिनेमा बनले. ज्यात काय होणार आहे हे प्रेक्षक अगदी सहज ओळखायचे. पण त्यातले हिरो आणि हिरवीणींची जबर्दस्त क्रेझ आणि अप्रतिम गाणी ह्या मुळे असे सिनेमा फारसा डोक्याला ताप न करता पहिले जायचे. कारण आपल्या अपेक्षा फार नसायच्या... हळु हळु प्रेक्षकांच्या जाणीवा बदलायला लागल्या. सामान्य प्रेक्षकांनाही उत्तम अभिनय आणि टाकलेल्या पाट्या ह्यातला फरक कळत होताच .. पण त्या कडे जागरुकतेने पाहायला पाहिजे हे समजायला लागले.

विषय: 

Jolly - Lovely, Laudable, Bright (Movie Review - Jolly LLB)

Submitted by रसप on 18 March, 2013 - 03:27

आयुष्य म्हणजे एका सोप्प्या वाटेवरील अवघड प्रवास असावा. इथे प्रत्येक गोष्ट 'मिळवावी' लागते आणि जी सहजगत्या हाताला लागते, ती फसवी तरी असते किंवा क्षणभंगुर. आता, अंबानीच्या पोरांकडे भरमसाट पैसा (व सत्ताही) आपसूक आहे, त्यांना ती मिळविण्यासाठी काही कष्ट करावे लागणार नाहीत; पण तरीही ह्या नाही तर त्या प्रकारे, कुठे तरी 'झिजावं' लागेलच. नथिंग कम्स फॉर फ्री इन लाईफ. प्रेम, पैसा, सत्ता, मान, नाव सगळं काही इथे मिळवावं लागतं. अगदी न्यायसुद्धा ! मी कुणी मोठा व्यक्ती नाही. पण शाळेत असताना लोकमान्य टिळकांची, ते शाळेत असतानाची, एक गोष्ट वाचली होती. ती मनात घर करून राहिली.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट