साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांचं वर्चस्व

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 March, 2013 - 14:40

आज जाहीर झालेल्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपटपुरस्कारांत मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

'अनुमती' या गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटासाठी श्री. विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

IMG_7884.JPG

'संहिता' या सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित चित्रपटातील संगीतासाठी श्री. शैलेंद्र बर्वे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

याच चित्रपटातील 'पलकें न मुंदे' या सुनील सुकथनकर यांनी लिहिलेल्या गीतासाठी आरती अंकलीकर - टिकेकर यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

'इन्व्हेस्टमेण्ट' हा रत्नाकर मतकरी लिखित - दिग्दर्शित चित्रपट मराठीत सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

Poster-Final copy_0.jpg

याशिवाय 'धग' या चित्रपटासाठी शिवाजी लोटन पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा व उषा जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सुधीर पलसाने यांना मिसिंग भाषेतील 'को : याद' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट छायालेखकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगेश हडवळे यांच्या 'देख इंडियन सर्कस' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

विक्रांत जाधव यांच्या 'कातळ' व गौरी पटवर्धन यांच्या 'मोदीखान्यातील दोन गोष्टी' या लघुपटांना सर्वोत्कृष्ट लघुपटांचे पुरस्कार मिळाले आहेत.

या सर्व चित्रपटांशी व लघुपटांशी संबंधित कलाकारांचं व तंत्रज्ञांचं मायबोली.कॉमतर्फे हार्दिक अभिनंदन!!!

मायबोली.कॉम 'संहिता', 'अनुमती' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तिन्ही चित्रपटांची माध्यम प्रायोजक आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन. या सिनेमांची चर्चा/स्पर्धा हे प्रकार इथे झाले होते का? काहीच माहिती नाही मिळाली. Sad
पण राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून हार्दीक अभिनंदन.

सर्व पुरस्कारविजेत्यांचं अभिनंदन Happy

'अनुमती' येत्या दोन महिन्यांत प्रदर्शित होईल. 'संहिता' व 'इन्व्हेस्टमेण्ट' या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत. चित्रपटांचं प्रदर्शन जवळ आल्यावर यासंबंधी मुलाखती, स्पर्धा मायबोलीवर येतीलच.

विजेत्यांचे तसेच चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन! Happy

शैलेंद्र बर्वे माझ्या बहिणीचा वर्गमित्र आहे Happy त्याचे खास अभिनंदन Happy

हार्दिक अभिनंदन!!!!

मायबोली.कॉम 'संहिता', 'अनुमती' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तिन्ही चित्रपटांची माध्यम प्रायोजक आहे.>>>>>अभिनंदन!!!!! Happy Happy

सगळ्या चॅनेल्सवर इरफानचं कौतुक चाललं होतं. फक्त एबीपी माझावर विक्रम गोखले झळकले.

असो... माबोसकट सगळ्यांचं अभिनंदन. Happy

सर्व कलाकार तंत्रज्ञांचे अभिनंदन.

हळू हळू मराठीचे काय होणार अशी बोंब करणार्‍यांचे सर्व मुद्दे रद्दबातल ठरत आहेत ही गोष्ट महत्वाची व चांगली.

इरफानसुद्धा अप्रतिम "पानसिंग तोमर" मधे.

अरे वा! सर्व पुरस्कारविजेत्यांचं अभिनंदन !
लवकरच हे चित्रपट बघायला मिळोत. Happy

जवळपास चाळीस वर्षे मराठी हिंदी चित्रपट तसेच नाट्यसृष्टी गाजविलेल्या एका अभिजात कलाकाराचा.....श्री.विक्रम गोखले.....असा राष्ट्रीय पातळीवरील सन्मान ही प्रत्येक मराठी रसिकासाठी अतिशय आनंदाची घटना होय. [या निमित्ताने कै.चंद्रकांत गोखले यांचीही आठवण झाली आहे.]

"पोल स्टार ऑफ द स्टेज अ‍ॅन्ड सिनेमा....' असा विक्रमजींचा एके ठिकाणी उल्लेख वाचला होता, तो किती सार्थ आहे हे पटते.

राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांने तसेच माध्यम प्रायोजक मायबोलीचे हार्दिक अभिनंदन.

अशोक पाटील

सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन !!

मायबोली.कॉम 'संहिता', 'अनुमती' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तिन्ही चित्रपटांची माध्यम प्रायोजक आहे.>>>> त्याचा आम्हाला अभिमान आहे Happy

Pages