लेख

एका सत्कार्याची हाक

Submitted by झुलेलाल on 24 April, 2012 - 07:15

कणकवलीचे आमदार प्रमोद जठार यांचे एक खुले पत्र...
नमस्कार!
आज एका वेगळ्याच विषय संदर्भात आपणाशी संपर्क साधत आहे. विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा !

गुलमोहर: 

पाकिस्तानमधील परिवर्तनासाठी त्यांच्या लष्करात आधी परिवर्तन व्हायला हवे!

Submitted by sudhirkale42 on 23 April, 2012 - 13:15

अनुवादः सुधीर काळे, जकार्ता
पाकिस्तानी लष्कराने आणि लष्करशहांच्या डावपेचातील दुस्साहसामुळे पाकिस्तान आजच्या स्थितीला पोचला आहे. आज त्याला भेडसवणार्‍या आतंकवादाच्या पाउलखुणांचा उगम शोधू गेल्यास या पाउलखुणा अफगाणिस्तानच्या पहिल्या ’जिहाद’ युद्धापर्यंत गेलेल्या दिसतील. हे जिहादी युद्ध एक लष्कराच्या प्रेरणेने घडविले गेलेले युद्ध असून या युद्धाने पाकिस्तानला बुद्धिभ्रष्टतेच्या सीमेवर आणून उभे केलेले आहे. या राखेतून कुठलाच फिनिक्स पक्षी जिवंत होणार नसून लष्कराने आपली स्वत:ची विचारसरणी, मानसिकता, स्वत:चा दृष्टिकोन बदलल्याशिवाय पाकिस्तानमध्ये समजूतदारपणाचे पुनरागमन होणे शक्य नाहीं.

गुलमोहर: 

'अग्नी-५'च्या निमित्ताने

Submitted by श्रीकांत काशीकर on 23 April, 2012 - 09:38

आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी "भारत २०२०" हे स्वप्न पाहिलं. आपला देश महासत्ता होईल असा विश्वास आपल्या देशबांधवांना दिला. साऱ्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्या. हे सारे खरे आहे. पण खरंच हे घडेल का?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"खासबाग" - शंभर वर्षांच्या कुस्तीची परंपरा

Submitted by अशोक. on 23 April, 2012 - 07:04

काल रविवारी सायंकाळी करवीर नगरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रिडा क्षेत्रातील एका शानदार सोहळ्याचा परंपरेच्या अभिमानाचा सोहळा संपन्न झाला. प्रतिवर्षी देशात विविध ठिकाणी 'हिंदकेसरी' पदासाठी कुस्तीगिरांच्या अटीतटीच्या लढती झडत असतात. पण २०१२ या सालातील या पदाच्या गदेसाठी 'मैदान' एकमुखाने निश्चित झाले होते कोल्हापूरचे 'शाहू खासबाग मैदान' ! कारण हे मैदान चालुवर्षी आपल्या स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करणारे होते.

गुलमोहर: 

अरुणाचलप्रदेश १......."ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग"

Submitted by Prasad Chikshe on 22 April, 2012 - 05:10

अरुणाचल ......उगवत्या सूर्याचा प्रदेश. भारताच्या ईशान्येकडील अचंबित करणारे देखणे सौंदर्य. दर दहा कोसाला भाषा बदलते हे जर आजच्या जगात अनुभवायचे असेल तर नक्कीच अरुणाचलला गेले पाहिजे. भाषा, वेशभूषा, परम्परा, रीति यांमध्ये प्रचंड वैविध्य आपल्याला आजच्या युनिकोडच्या जगात पाहायला मिळते. उंच हिमालयाच्या कुशीत,घनदाट जंगलाचे पांघरून घेऊन सर्वदूर असलेल्या शांततेत मधुर संगीत निर्माण करत वाहणाऱ्या सरिता, जंगलातील जैविक संपत्तीबरोबर भूगर्भात दडलेले अपार भांडार, जलस्त्रोतांपासून हजारो मेगावॅट विद्युत निर्माण करण्याची क्षमता, इथल्या उंच पर्वतांमुळे संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाचा हा प्रदेश. एकूणच

गुलमोहर: 

पोस्टमार्टम .........सत्याचा शोध

Submitted by Prasad Chikshe on 21 April, 2012 - 01:21

आज सकाळी पाच वाजताच उठलो. आंघोळ केली. गेल्या महिनाभर तळपायाचे हाड मोडल्याने सकाळचे अग्निहोत्र माझ्या कडून होत नसे. आजचा सूर्योदय ६ वाजून १६ मिनिटांचा. घरात डासांनी बरेच थैमान घातले असल्याने थोडं लवकरच अग्नि प्रदीप्त केला. आज गोवऱ्या थोडया चोपुनच रचल्या होत्या. थोडा जास्त धूर होण्यासाठी. घरभर धूर झाला. बरोबर दोन मिनिटे आधी फुंकर मारून परत अग्नीला जागविले.

सूर्याय स्वाहा.....सूर्याय इदं न मम.
प्रजापतये स्वाहा ... प्रजापतये इदं न मम

गुलमोहर: 

हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉकिंग सेंट’

Submitted by Prasad Chikshe on 20 April, 2012 - 00:36

हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉल्किंग सेंट’
१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत.
गीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया – यज्ञ, दान व तप – सांगितल्या.
१. यज्ञ – सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक खगोलशास्त्रीय दुर्मिळ घटना!

Submitted by चिमण on 19 April, 2012 - 05:25

(टीप - या लेखाचा सहलेखक मायबोली वरील खगोलशास्त्रज्ञ आशिष (आश्चिग) आहे. त्यामुळे काही प्रश्न असल्यास त्याला विचारा. Proud )

गुलमोहर: 

पसारा

Submitted by वैशाली अ वर्तक on 17 April, 2012 - 11:55

मी कामानिमित्य बाहेर गेले होते. बाहेरून आले.घरात पाऊल टाकले पहावे तर घर म्हणजे इतस्थत: पसरलेले.ज्याला जी गोष्ट वाटली ती घेऊन पुन्हा जागी न ठेवता तिथेच टाकलेली .पहावे तिथे

पसरलेला पसारा .वाटले पुन्हा घराबाहेरच जावे .घरात जाऊच नये . म्हणजे दृष्टी आड सृष्टी .तो पसरलेला

पसारा पहाणे नको व पसारा आवरणे नको .पण छे! बाहेर तरी किती वेळ रहाणार .एक तास ,दोन तास .

मग घरी येऊन तरी पसारा पहाणे व आवरणे आलेच ना? आणि आपल्या शिवाय कोण आवरणार ?

मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही .तेह्वा मरण आलेच म्हणजे ओघाने आवरणे आलेच .तेह्वा मी मुलांना

गुलमोहर: 

भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

Submitted by sudhirkale42 on 16 April, 2012 - 16:48

भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा "खासगी" भारत दौरा नुकताच आटोपला. ते सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या अजमेर येथील दर्ग्यावर प्रार्थना करायला आले होते. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांसाठी प्रेक्षकांकडून उच्चतम मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची ही एक सुवर्णसंधीच होती. मग ते ती कशी सोडतील?

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख