लेख

[१] सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! : राष्ट्रपतींचा खास अधिकार

Submitted by दामोदरसुत on 1 June, 2012 - 04:23

[१] सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! : राष्ट्रपतींचा खास अधिकार

लोकसत्ता: १ जून १२ : पान ९ वरील वार्ता :

राष्ट्रपतिंनी आपल्या अधिकारात दया दाखवून ज्यांची फाशी जन्मठेपेत रुपांतरीत केली त्या सत्पुरुषांची [?] बघा ही सत्कृत्ये :

पहिला: पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून नंतर तिला ठार मारणारा!

दुसरा व तिसरा: एकाच कुटुंबातील पाच जणांना सद्गति देणारे दोन सत्पुरुष.

चवथा : निवृत्त ब्रिगेडियरची व त्याच्या कुटुंबियांची हत्त्या करणारा त्यांचाच नोकर !

गुलमोहर: 

महाराष्ट्राची लोकधारा

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 May, 2012 - 11:34

काही दिवसांपूर्वी धाकट्या बहिणीच्या पिल्लांना घेवून गणेश कला क्रिडा मंचावर भरलेल्या बालजत्रेला जायचा योग आला. लहान मुलांना भुलावून घेतील, मोहवतील अशा अनेक गोष्ट होती. आमच्या सौ., बहिण, तिची पिल्लं मस्त रमली तिथे. पण माझ्या मनात भरलं एक छोटंसं शिल्पकलेचं प्रदर्शन. बहुदा शाडु किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या काही मोजक्याच सुबक मुर्ती. पण केवळ शिल्पकला एवढीच त्या प्रदर्शनाची ओळख नव्हती. त्याचं वैशिष्ठ्य होतं त्यातल्या महाराष्ट्राच्या लोकधारेतील काही महत्त्वाच्या आणि आजकाल अस्तंगत होत चाललेल्या घटकांचं, परंपरांचं चित्रण !

गुलमोहर: 

इस्लामी जगाची चित्रे :

Submitted by अनिल सांबरे on 29 May, 2012 - 06:08

जोगळेकर यांचा अभ्यासपूर्ण माहितीपर ग्रंथ
सुप्रसिद्ध लेखक श्री. ज. द. जोगळेकर यांच्या परिश्रमातून साकारलेले नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले इस्लामी जगाची चित्रे हे पुस्तक म्हणजे सर्व सामान्य वाचक आणि इस्लाम व इस्लामी राजकारणाचे अभ्यासक यांच्यासाठी एक माहितीचा अभ्यासपूर्ण खजिनाच आहे.

गुलमोहर: 

'' यु.आर. एल. फाउंडेशनचा तपसाधना कृतज्ञता दिवस ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 29 May, 2012 - 00:57

dn.jpgdn1_0.jpg

गुलमोहर: 

सावरकर संशोधन प्रकल्प by डॉ.श्रीरंग गोडबोले

Submitted by अक्षय जोग on 28 May, 2012 - 05:11

सावरकर संशोधन प्रकल्प by डॉ.श्रीरंग गोडबोले

http://epaper.esakal.com/Sakal/28May2012/Enlarge/PuneCity/Pune1Today/pag...

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228989:...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जांभुळ पिकल्या झाडाखाली (फोटो सहीत)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 May, 2012 - 03:07

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे रानमेव्याचे दिवस. दर्‍या, डोंगरांवर, जंगलात रानमेवा तयार होत असतो. त्यातलाच एक रानमेवा म्हणजे जांभुळ.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

झुंजार, अंध आणि बंडखोर विरोधक चेंग यांचे अमेरिकेत आगमन ही अमेरिका-चीन यांच्यातील संबंधांच्या प्रगल्भतेची निशाणी?

Submitted by sudhirkale42 on 27 May, 2012 - 21:58

लेखक: सुधीर काळे जकार्ता
चीनमध्ये आर्थिक निर्बंधांचे आणि नियमांचे जरी शिथिलीकरण झाले असले आणि व्यापारधंद्याचे जरी जागतिकीकरण झाले असले तरी राजकीय दृष्ट्या तो देश अद्यापही त्यांच्या साम्यवादी पक्षाच्या हुकुमशाहीखालीच भरडला जात आहे. तिथे सरकारची आज्ञा मुकाट्याने पाळावी लागते. चिनी जनतेला ही हुकुमशाही नको आहे व त्यामुळे स्वातंत्र्यासाठी ती उठाव सातत्याने करतच असते. पण ते कांहीं काळच टिकतात कारण चिनी हुकुमशाही पोलीसबळाचा आणि सैनिकबळाचा निर्घृणपणे उपयोग करून अशी बंडाळी सहजपणे चिरडून टाकते.

गुलमोहर: 

युवा

Submitted by निवांत पाटील on 27 May, 2012 - 12:55

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=275498&boxid=14158515&pgno=3&u...

काल बर्याच ट्रॅड्च्या शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर होता (इंजिनीयरींग). पेपर झाल्यावर कॉलेजच्या बाहेर जो काही प्रकार बघितला तो अतिशय ओंगळवाणा होता. कॉलेजच्या दारात जनरेटर, डॉल्बी, गुलाल, दारु आणि मुलांचा हिडीस नाच, बेधुंद. कॉलेज एका बर्यापैकी रहदारीच्या रस्त्यावर. बाहेर पडतानाच लक्षात आले कि यातील कोणितरी तर्र झालेला कळत नकळत (थोडक्यात झुलत) रस्त्यावर येणार, आणि जबर्दस्त अपघात होणार.

गुलमोहर: 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज [२८ मे ] जन्मदिन ! त्या तेजाला विनम्र अभिवादन!

Submitted by दामोदरसुत on 25 May, 2012 - 00:37

" आणि म्हणून हिंदी राष्ट्राचा मूळ पाया , आधारस्तंभ , निर्वाणीचे त्राते असे हिंदू [सावरकरी व्याख्या] लोकच आहेत. एवढ्याकरिता हिंदी राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने देखील, हे हिंदूंनो ! तुम्ही हिंदु राष्ट्रीयत्वाला दृढमूल आणि समर्थ बनवा. हिंदुस्थानातील आपल्या कोणत्याही अहिंदू बंधूला, वास्तविक म्हटले म्हणजे जगातील कोणालाही, उगाच अपमान करून दुखवू नका.

गुलमोहर: 

अरुणाचलप्रदेश ४ :-"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत."

Submitted by Prasad Chikshe on 24 May, 2012 - 10:08

आपल्याला विनंती आहे की ह्या लेखाच्या आधीचे अरुणाचलप्रदेश वरील तीन लेख वाचा ..सोबतच्या लिंकवर क्लिक करून ते आपल्याला वाचता येतील

http://prasadchikshe.blogspot.in/2012/05/blog-post_24.html

कर्नल संभाजी पाटील आपल्या निवृत्ती नंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख