''गझलसम्राट -सुरेश भट यांचा जन्मदिवस'' 15एप्रिल

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 15 April, 2012 - 00:59

bhaT.jpg

१५ एप्रिल - मराठी गझलसम्राट यांचा जन्मदिवस......
मराठी काव्यास सुबोध आणि छंदोबद्ध काव्याकडे वळवून महाराष्ट्रभर गझलेचं वादळ निर्माण करणार्‍या या द्रष्ट्या व मनस्वी कवीस विनम्र अभिवादन...

सुरेश भट

पूर्ण नाव सुरेश श्रीधर भट
टोपणनाव गझलसम्राट
जन्म एप्रिल १५, १९३२
अमरावती, महाराष्ट्र
मृत्यू मार्च १४ ,२००३
नागपूर, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र काव्य, साहित्य, पत्रकारिता
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार कविता,गझल़
प्रसिद्ध साहित्यकृती रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग
वडील डॉ॰ श्रीधर रंगनाथ भट
आई शांता श्रीधर भट
अपत्ये विशाखा, हर्षवर्धन, चित्तरंजन

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतत शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडेए हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना दोन मुले होती. त्यापैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता.
हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचा वयाच्या ७१ व्या वर्षी मृत्यू झाला.

काव्यसंग्रह---

एल्गार
झंझावात
रंग माझा वेगळा
रसवाणीचा मुजरा
रूपगंधा
सप्तरंग

(माहीती वा छायाचित्र आंतरजालावरुन साभार )

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

डॉक्टर, विकीपिडियासाठी लिहावा असा भावनाशून्य मजकूर का बरं लिहिलात?
आंतरजालावरून घेतलेल्या मजकुरापेक्षा, एका गझलकाराचे गझलसम्राटाबद्दलचे मनोगत वाचायला आवडले असते. त्यांच्या कविता/गझलांबद्दल, मराठी गझलेसाठीच्या कार्याबद्दल वाचायला आवडले असते.
हृदयनाथ मंगेशकरांना चोपडे फुटपाथवर सापडले हे नक्की आहे का? की वदंता. त्यांना हे पुस्तक कोणीतरी मुद्दाम दिल्याचे वाचल्याचे आठवते. संदर्भ शोधून पुन्हा लिहायचा प्रयत्न करेन.
एकदा तीन अपत्यांची नावे देऊन पुढे त्यांना दोन मुले होती असेही लिहिले आहेत.

भरतराव, विकिपिडियातूनच कॉपी केला आहे. ३ अपत्ये, त्यातील २ मुले असे त्यांना बहुधा म्हणायचे असावे.

हृदयनाथ मंगेशकरांना चोपडे फुटपाथवर सापडले हे नक्की आहे का? की वदंता

ही वदंताच आहे.असो... मी प्रतिसादात त्यांच्यातील गझलकाराबद्दल लिहायचा प्रयत्न करतो. Happy