सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

१३ नोव्हेंबरचा भाग पाहिला. स्पर्धक एक से बढकर एक आहेतच पण महेश काळेचे "हे सुरांनो चंद्र व्हा" ऐकून कान तृप्त झाले. त्याच्या कमेंट्स ऐकायला छान वाटतेय. शाल्मली सुद्धा छान बोलतेय आणि स्वत.ला कॅरी छान करतेय. तेजश्री प्रधान सूत्रसंचालिका म्हणून कशी वाटेल अशी मला शंका होती पण तिचे संयत बोलणे मला पहिल्या भागात तरी आवडलेय. ( मी होसूमीयाघ चा एकही एपिसोड पाहिलेला नव्हता, केवळ महती ऐकली होती Proud ) अवधूत तर लाडका आहेच Happy

निहीरा जोशी आणि प्रसन्नजीत कोसंबी दोघांचे पर्फॉर्मन्सेस आवडले.

पहिले २ भाग अत्यंत आवडले..
झी सा रे ग म प मधले बरेच जुने आणि जिंकलेले गायक यात स्पर्धक म्हणुन आलेत...निहिरा जोशी, ज्ञानेश्वर मेश्राम, शरयु दाते, शमिका भिडे,जुईली जोगळेकर्,वैशाली माडे, पद्मनाभ गायकवाड अजुन बरेच..नावे नाही लक्षात आता
लिटील चॅम्प्स म्हणुन गायलेले स्पर्धक आता मोठे झालेत आणि छान गात आहेत खरच...
महेश काळे च्या कमेंट्स अतिशय विचार करुन दिलेल्या वाटल्या...छान बोलतोय तो...
शाल्मली पण छान....जरा मराठी मद्धे कमेंट्स देताना चाचपडते आहे असं वाटतय...पण तरी आवडली.
अवधुत चा तर नादच खुळा..मला आधीपासुनच आवडतो तो...तो असला की मस्त हलकं फुलकं असतं वातावरण...
पुष्कराज काल दिसला नाही...(मी रुद्रम संपल्यावर पाहिलं तेव्हा तरी नव्हता ..आधी येउन गेला असेल तर माहिती नाही....)
तेजश्री चा आवाज खुप किंचाळल्यासारखा वाटतो मला..हाय पिच का काय म्हणतात तसं......आणी तिचं अजुन जान्हवी स्टाईल हसणं नकोच वाटत....असो...जरा सूथींग आवाजाचं कोणीतरी हवं होतं तिथे असं मला वाटलं...

तेजश्री प्रधान सूत्रसंचालिका म्हणून कशी वाटेल अशी मला शंका होती पण तिचे संयत बोलणे मला पहिल्या भागात तरी आवडलेय>> तिला थोडे कमीच डायलॉग दिले तर बरं होईल...सुसह्य होईल...

अनिरुद्ध जोशी ( हे सुरानो चंद्र गाणारा ) सारेगामाचा विनर होता, ज्यात त्याला राहुल सक्सेना स्पर्धक म्हणून होता. राहुल तुफान गायला होता, त्यामुळे अनिरुद्धच्या जिंकण्यावर त्या वेळी प्रश्न उपस्थित झाले होते.

<अनिरुद्ध जोशी ( हे सुरानो चंद्र गाणारा ) सारेगामाचा विनर होता, ज्यात त्याला राहुल सक्सेना स्पर्धक म्हणून होता. राहुल तुफान गायला होता, त्यामुळे अनिरुद्धच्या जिंकण्यावर त्या वेळी प्रश्न उपस्थित झाले होते.>
हे कधी झाले होते बुवा? अनिरूद्ध जोशीच्या विरूद्ध तर वैशाली माडे- सायली पानसे होते ना? आणि राहूलच्या विरूद्ध अभिलाषा- उर्मिला धनगर होते असे आठवतेय. तुम्ही म्हणताय ते वगळे पर्व होते का?

पण महेश काळेंच्या स्वरांनी मन चिंब भिजले. हे सुरांनो माझे खूप आवडते गाणे आहे. दर्जेदार स्पर्धक आलेले पाहुन कानाला बरे वाटले.

कालचा कार्यक्रम संपता संपता महेश काळे स्टेजवर गाताना दाखवला. पुढच्या आठवड्यात कदाचित सुरवात त्याच्या गाण्याने असेल.

खूप छान आहे कलर्स चा कार्यक्रम
झी सारेगामा पेक्षा खूपच उजवा वाटला
महेश काळे साठी तरी नक्की बघणार

बापरे! महेश काळेचे एव्हढे फॅन्स!
मी कार्यक्रम न बघण्यामागे उलट महेश काळे खूप पकवतो हे कारण आहे. त्यात अवधूत पण आहे म्हणजे झालंच.
शाल्मली खोब्रागडे हिंदीमध्ये काही हिट गाण्यांची गायिका आहे मान्य पण मराठीत थेट जज होण्याइतकं कतृत्व आहे का?
बाकी वैशाली माडे पुढे हिंदी सारेगमप पण जिंकली होती आणि काही चांगली गाणीही आली होती. आता पुन्हा तिला younger lot बरोबर compete करायला लावणं नाही बरोबर वाटलं. तिला जज करायचं होतं.

पाहिले २ एपिसोड्स पण मराठीचा प्रॉब्लेम हा आहे कि गाण्याच्या चॉइसमधे सगळे फार मार खातात .
एक तर तिच ती उगाळलेली गाणी नाही तर अगदीच विचित्रं काहीतरी नवी गाणी, हिंदी सारखा वाइड चॉइस नाही.
एवढे एस्टॅब्लिश्ड गायक असून त्यातले अर्ध्याहून अधिक नवखे वाटत होते.
वैशाली माडे, निहिरा आणि प्रसन्नजीत कोसंबी प्रॉमिसिंग आहेत , बाकी गायक नॉट इंप्रेसिव्ह .

वैशाली माडे पुढे हिंदी सारेगमप पण जिंकली होती आणि काही चांगली गाणीही आली होती. आता पुन्हा तिला younger lot बरोबर compete करायला लावणं नाही बरोबर वाटलं.>>> सहमत. शिवाय ती शाल्मलीला सिनियर असेल इंडस्ट्रीत. शाल्मलीने तिला जज करणं पटलं नाही.

तेजश्री प्रधान ओढून ताणून हसू आणतेय चेहऱ्यावर. बोलणंही कृत्रिम. टेली प्रोम्प्टरवर वाचते ते लगेच कळतं..

मी कार्यक्रम न बघण्यामागे उलट महेश काळे खूप पकवतो हे कारण आहे. त्यात अवधूत पण आहे म्हणजे झालंच.
शाल्मली खोब्रागडे हिंदीमध्ये काही हिट गाण्यांची गायिका आहे मान्य पण मराठीत थेट जज होण्याइतकं कतृत्व आहे का? >>> तिघांचहि नाहि. पण तसेहि आजकाल चांगले लोक येतात कोठे जज म्हणुन ? एकदाच ह्रदयनाथ मंगेशकर आले होते पण त्यानंतर त्यांनी साप्तहिक सकाळ मध्ये मोठा लेख लिहुन टिका केली होती. हरिप्रसाद, शिवकुमार, आशा भोसले हे फार पुर्वी झी हिंदि सारेगामात आले होते. पन गेल्या ८-१० वर्षात कोणालाहि बोलावले जातेय.

अभिनंदन पूनम आणि वैभव!
व्हूट वर यायला हवे खरंतर याचे सगळे भाग. म्हणजे मग ऑनलाईन स्ट्रिमींग पाहाता येईल...

शाल्मली खोलगडे आहे ना? मध्येच खोब्रागडे कुठून आलं? (मला दोन्ही आडनावांनी माहीत नव्हती. हा धागा वाचल्यावर पहिल्यांदाच कळलं. हिंदी चित्रपटसंगीताच्या जगात मी अजूनही विसाव्या शतकातच आहे. शाल्मलीच्या नावावर एका गाण्यासाठी २००४ सालचे ४-५ अवॉर्डस (फिल्मफेअरसकट) दिसताहेत.( म्हणजे आतापर्यंत ती रिटायर झाली असेल Wink )

कालचा भाग ओझरता पाहिला. स्पर्धक बोलत होते. (या भागाचं उपशीर्षक 'आणि बरंच काही' का असंच काहीसं होतं . इथे पुष्कराज दिसला.
एका गायिकेचं मराठी खूप छान होतं. आठ वर्षांची तला अनुस्वार म्हटला तिने.
दुसरीने आपल्या घराण्याची सांगीतिक परंपरा सांगताना आपण शैला दातार यांची सून असल्याचं सांगितलं. तिला भास्करबुवा बखल्यांचे नाव आठवले नाही.
आणखी एकीने आमच्याकडे संगीताचे इतके वेड आहे की सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत रेडियोवर संगीत वाजत असतं असं सांगितलं.

कार्यक्रमाचं नाव सूर नवा असला तरी गायक जुनेच आहेत. व्हूटवर पहिला भाग दिसला आणि सेल्रिब्रिटी सिंगर्सचा पहिला रिअलिटी शो म्हटलंय तेही खरं नाही. असे किमान दोन शो झी मराठीवरच झालेत. हिंदीतही असतील.

पूर्वी पाहिलेले उगवते गायक आता कसे गातात याबद्दल उत्सुकता म्हणून पाहीन.
रेकॉर्ड करून पाहायची सोय असल्याने परीक्षकांना फाफॉ करेन.

महेश काळे फार छान बोलतोय.
"गात्रवीणा"..... सही Happy
शाल्मली खोलगडे पण आवडेश !
पण वैशाली माडेचं येणं मला पण खटकलं. आता तिनं जज म्हणून यायला हवं.
खोटी खोटी तारीफ मात्र टाळायला हवी... खरं खरं का बोलत नाहीत हे लोक ?
तेजश्री प्रधान आवडतंच नाही. आता तिनं आपल्या वैभव आणि पूनम नी लिहिलेल्या सुरेख डायलॉग्सची माती केली नाही म्हणजे मिळवली Wink

तेजश्री प्रधानच्या आवाजाला धीर गंभीरता वा कुठले चढ- उतार नाहीत. फक्त हाय पीच मधे ओरडणं आहे आणि डोळे गरागरा फिरवणे. हसण म्हणजे किंकाळण्ण आणि महानाटकी.

शमिका भिडे पण आहे का? अरे वा!
सारेगमपमधे तिच्यावर खूपच अन्याय झाला होता. पण अवधूत ह्या सगळ्यांच्या संपर्कात राहतो असं दिसतंय एकूणात.
मी पहिला भाग चॅनेल बदलत बदलत पाहिला होता, त्यामुळे बरेचसे गायक कळले नव्हते. ओळखलेही नाहीत ते मोठे झाल्यामुळे Wink

खरंच वैशाली भैसने माडेचं स्पर्धक म्हणून येणं पटलं नाही. पण झीचं रेटिंग कलर्सकडे खेचण्यासाठी केलेली युक्ती असावी ही.

अरे हो, खोलगडे आहे ते, पण आता मला एडिट करता येत नाहीये. २००४ शक्य नाही ती २०१० नन्तर आली. मला आवडणारी तीची गाणी म्हणजे दारू देसी, बेबी को बेस पसंदहै आणि बलम पिचकारी. भारी गाते यात प्रश्नच नाही.
पण ती वैशाली माडेला जज करत आहे हे एक वैशाली फॅन म्हणून मला झेपत नाहीये.

हो बरोबर आहे. विकीवर तिने २००४ पासून गायला सुरुवात केली म्हटलं म्हणून तेच डोक्यात बसलं.२०१२ चा बॉलीवुड डेब्यु आणि अवॉर्ड्स.

दुसरीने आपल्या घराण्याची सांगीतिक परंपरा सांगताना आपण शैला दातार यांची सून असल्याचं सांगितलं. तिला भास्करबुवा बखल्यांचे नाव आठवले नाही >>> अरेरे हे अतीच कारण शैला दातार यांनी आपल्या आजेसासरे भास्करबुवा बाखले यांच्याबद्दल खूप लेख लिहिलेत. म टा मध्ये यायचे बहुतेक. खूप वर्ष झाली, वाचल्याचं आठवतंय.

परवाच्या भागाचा रिपीट काल पाहिला. बुधवार त्या पुष्कराजला दिलाय म्हणे. प्रचंड बोअर केलं त्याने. फाफॉ होतं म्हणून बरं. मला वरची नावं वाचून वाटलेलं की सगळेच स्पर्धक आधीच्या स्पर्धांमधलेच आहेत की काय. पण तसं नाहीए. कोणी कोणी मालिकांची शीर्षक गीतं गायलेले, तर कोणी पार्श्वगायन केलेले आहेत.

वैशाली माडे, अनिरुध्द जोशी, निहीरा जोशी इ आणि तो व्यंकटेश, दाते, भिडे इ. या सगळ्यांना एकाच फ्रेम मधे बसवण्याच कारण नाही कळल. काही एकदम सिनीअर तर काही अगदीच बालवाडीतले वाटतात Uhoh

सगळेच स्पर्धक आधीच्या स्पर्धांमधलेच आहेत की काय. पण तसं नाहीए. कोणी कोणी मालिकांची शीर्षक गीतं गायलेले, तर कोणी पार्श्वगायन केलेले आहेत.>>> आधीच्या स्पर्धांनंतरच त्यांना संधी मिळाली पार्श्वगायनाची.. उदा. निहिरा जोशी, वैशाली माडे, जुईली जोगळेकर, श्रीरंग भावे इ.

Pages