लगोरी - मराठी मालिका

Submitted by परीस on 20 May, 2014 - 07:38

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.
`लगोरी’मध्ये ज्ञानदा चेंबुरकर धनश्रीची मुख्य भूमिका साकारत आहे. याखेरीज अनुजा साठे, अभिज्ञा भावे, दिप्ती लेले, रेश्मा शिंदे, अशोक शिंदे, पल्लवी प्रधान, चैत्राली गुप्ते, मिलिंद शिंत्रे इत्यादी कलाकारांच्या विविध भूमिका आहेत.

तर लगोरी विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.:स्मित:

lagori.jpg

(प्रचि: आंतरजलावरुन साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

चला वेगळ्या, झी सोडून मालिकेचा धागा काढला, धन्यवाद. मी ही नाही बघत पण मला वाचायला आवडेल.

अभिज्ञा भावे हे नाव बरोबर आहे अबीज्ञा नाही.

किती भाग झाले अत्तापर्यत???>>>>> एक लीप पण घेऊन झाला... अत्ता पहिल्या भागानंतर ५ की ७ वर्षांनंतर चा track चालुए... मालिका बघत नाही पण प्रोमो पाहिला होता एक...त्यावरुन समजलं

सध्या climax part चालू आहे असे वाटते ... तशीही मालिका अजून्तरी मला happening वाटत आहे ... दळण लावले नाही आहे ...

@ प्राची.
हो खरच मालिका happening वाटत आहे.
मुख्य म्हणजे फालतु कारस्थाने नाहीत.
शनिवारच्या भागात काय झाले?

Watch Star Pravah TV Serials Online | Online TV Shows |… प्लीज हि लिंक फॉलो करा.

ए पण पहिल्या भागात तर असे दाखविले होते ना .... त्या सगळ्या खूप वर्षांनी भे ट्ल्या आहेत हॉस्पिटल मध्ये ... मला तसेच आठवत आहे ... ती मुक्ता सांगते कि मी चाळीत राहाते मग सगळ्या जणी ना आश्चर्य वाटते....

आताचे एपिसोड बघता , त्यांना एक्मेकिंचे सगळे माहित आहे असे दिसते

मलिका एकदम फास्ट चालू आहे, तो विक्रम आणि मुक्ता भेटायला झी च्या मलिकेत निदान ४ महिने लागले अस्ते,
इथे एका आठवड्यात झालं Happy

आता मुक्ता-विक्रम एकत्र येतात का ह्या दोघींमुळे ग्रुप्मधे २ गट पडतात ते बघायचं.

तेच ना ... तेच तेच दळण दळत बसले असते.... मला वाटत २ गट पडतील ...

आणी मग पहिला भाग होता तिथे येइल मालिका .... आत्ताचे सगळेच flashback मध्ये आहे ना...

ओह फ्लॅशबॅक आहे का, मी ही मालिका बघायला सुरू केली तेव्हा तो पुण्याचा इव्हेंट होता, पहील्या भागात काय दाखवलं होतं ?

धन्नो होस्पिटल मध्ये ICU मध्ये आहे , आणी समीर ने सगळ्याना फोन करुन बोलावले आहे तिथे ... तेव्हा त्या तिथे येतात खूप दिवसान .... तेव्हाही थोडे मतभेद दाखवले आहेत ... पण मग bedridden धन्नो कडे बघून एक्मेकिंचा हात धरतात ... आणी मग flashback ला सुरुवात ... धन्नो चे लग्न ठरवत असते तिची आइ... लग्न होते आणी मग ती पुण्यात येते ... तिला भेटण्यासाठी आणी मदत करण्यासाठी त्या पुण्यात event करायचे ठरवतात ... कारण तेव्हा त्याना कळालेले असते कि समीर ची नोकरी गेलेली आहे US मधली...
I hope तुला टोटल लागळी असेल Happy

ओह ओके, धन्नोचं वय काय दाखवलं आहे मग तेव्हा ? म्हणजे अजून स्टोरी ताणतील का काय ते कळेल Wink

दिल चाहता है मधे पण असचं काहीसं होतं का - सैफ आणि आमिर अक्षयला भेटायला येतात असं काही ?

नाही तसे फार नाही ग ... साधारण असेच होते ... below 40 ... म्हणजे अता त्य २९-३० आहेत ना ... college + 8 years mhanaje ....

म्हणूनच वाटते आहे मला कि हे परत एकदा भांडण होइल ... मग समीर येइल आणी पहिला भाग ला येइल story ...हा माझा अंदाज

ओके, म्हणून हे सगळं पटापट दाखवलं आहे तर, खरी स्टोरी तर पुढे आहे असं दिसतयं

अजून एक अंदाज -

पीडीचं बाहेर अफेअर असणार

पण मग त्याने तिच्याशी लग्न का केले असेल ... मला वाटते त्यना तो फक्त workoholic दाखवाय्चा आहे ... म्हणजे ती आपोआप संसारात सुखी नसेल्च ना ... सारखे पैसा पैसा केल्यावर ...

मी सध्या हि एक्मेव सिरीयल बघत आहे ... अजुन तरी बोअर नाही झाले :)..

अगं आता आता झालं असेल अफेअर, असा आपला एक अंदाज ( इतकी वर्षं मालिका बघून आलेल्या अनुभवातून Wink )

काल एक तासाचा भाग होता ना ? नवीन होता का जुनचं परत दाखवलं ?

काल मी लावला ८:३० ला तेव्हा मागचे म्हणजे अगदी सोमवारचे काही सीन्स दिसले मग नाही पाहीलं पुढे - मॅच बघायची होती नवर्‍याला Wink

कालच्या भागात अपेक्षेप्रमाणे दोन गट पडलेले दाखवले, पूर्वा आणि रुजु एका गटात.
आणि विक्रमची आई मुक्ता आणि विक्रम ला एकत्र आणण्यासाठी मदत करणार आहे.

विक्रमची आई नक्की पूर्वा वर अन्याय नको म्हणून राहील्ये का विकी काही करत नाही तर राहणार कुठे म्हणून Wink

कोणाला "कोई अपना सा" आठवत्ये मालिका ? त्यात ३ मैत्रिणी असतात आणि त्यांची एकाचं घरात लग्नं होतात, मग एकी विरुद्ध दोघी असं होतं, झी वर होती मला वाटतं.

आत्ता बघायला सुरुवात केलिये. आत्ताशी २५ फेब पर्यंत पोचलेय पण छान वाटतीये. धनाच लग्न लागतय आत्ता. नेहमीची घिसिपिटी सासू सून गोष्ट नाहिये.

Pages