आमच्या धावा
शतकावरती शतकं झाली
हजारंही झाले असतील
धावता-धावता आयुष्यातील
कित्तेक पैलु गेले असतील
धावुन धावुन ना थकून जातोय
शेतकरी राजा अन् राणी
धावा मोजण्या सवड नाही
पण धावत राहतोय अनवाणी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
योजनांतली बेगडेबाजी
योजनांचा लाभ घेता-घेता
कित्तेक मनं करपु लागतात
लाभार्थ्यांकडे येण्याआधीच
योजना मात्र झिरपु लागतात
कित्तेक सरकारी योजना या
कागदोपत्री तगड्या असतात
मात्र वास्तवी फिरून पाहिल्यास
कित्तेक योजना बेगड्या असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पैशांमुळे
पैशापुढे झूकतात लोक
पैशांमुळे ठकतात लोक
पैशांसाठी तर कधी कधी
माणसांनाही विकतात लोक
पैश्यांचा वापर करूनच
लोक नको तसे वागतात
मात्र पैशांविनाही कित्तेक
इथे मरण यातना भोगतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती...
आमचे गाईड -आमचा न्हावी
पृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.….
पावसामुळे
इकडे आला तिकडे आला
त्याचा बोलबाला झाला
करपलेला-भेगाळलेला
सारा शिवार झाला ओला
फक्त शेतातल्याच भेगा नाही
मनाच्या भेगाही बुजल्या जातील
थेंब-थेंब पडल्या पावसामुळे
उत्कर्षाच्या राशी सजल्या जातील
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
निसर्ग कृपाळला
त्यांनी जे जे केले काल
आज सारे स्मरून आले
पाहणी करण्या आले होते
मात्र पळणी करून गेले
त्यांचे दौरे आले,गेले
मदतीचा मुद्दा ढेपाळला
पथकाने केला काना डोळा
पण निसर्ग मात्र कृपाळला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
दुष्काळी पळणी
दूष्काळ पाहणी करण्यासाठी
केंद्रातुनही पथक येतात
पाहणी सोडून पळणी करतात
तेव्हा आशा निरर्थक जातात
पळत पळत दौरा सारा
दूष्काळ पहायला वेळ नाही
सांगा त्यांना दूष्काळ म्हणजे
तुमच्या मनातला खेळ नाही
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३