३२ शिराळा

Submitted by सूनटून्या on 30 July, 2014 - 05:57

न्यायालयाला खूप घाबरतो आपण, म्हणून हा लेख काढून टाकण्यात आलेला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी
मी पण गेलेलो तेंव्हा १०-१२ जातीचे साप होते, ते नंतर घोड्दबंदरला चेना खाडीजवळ नेउन सोडले, अर्थात दर्शनने, मी २ हात नाहीतर चांगला ४ हात लांब होतो. आम्हाला पूर्ण लांबीचा घोणस (russel viper) सुद्धा पाहायला मिळाला.

बाय माझे! कसला सुंदर नाग आहे! (लांबून बघायलाच.....जवळ फूत्कार टाकत आला तर पळता भुई थोडी होईल माझी).

लेख उत्तम Happy

हाय !!! अय्यो तुम्ही माझ्या गावी जावुन आलात की हो!!! आरळा माझे माहेर आणि शित्तुर सासर :). पण तिथली असुनसुद्धा असले काही बघायचेही धाडस माझ्यात नाही

आरळा मध्ये मारवाड्याची फेमस कटिंग चहा आणि नाश्ता करून पोटाला तर शांत केल>>> अहाहा !!! येथील चहाची चव अजुन जिभेवर रेंगाळतेय Happy

बाकी लेखही मस्तच.

आमच्या तालुक्याचे गाव. आठवणींनी भरून आलं.. Happy

अवांतर: स्नेहनील, आरळ्याला ९३-९४ साली स्काऊट कँप भरलेला ना? Happy

छान फोटो.
पण हे साप का पकडतात? काय श्रद्धा आहे? कोणत्या दिशेला जायचं हे कसं ठरवतात? बीळ खोदलं आणि साप नाही मिळाला पण सापाचं ते घर असेल तर सापाला परत बीळ करावं लागतं का? बीळ करणं किती कठीण/ सोपं असतं?
पकडलेल्या सापाला खायला काय देतात? मग उत्सव संपला की त्याला कुठे सोडतात? हे सगळं एवढं कशासाठी करतात? फलश्रुती काय? आणि सर्पमित्र ह्या सोहळ्याकडे कुठल्या दृष्टीकोनातून बघतात?
असे बरेच प्रश्न पडले, साप म्हणून भुई थोपटण्याचा हेतू नाही, काय श्रद्धा आहे आणि त्या गावातली आजची पिढी याकडे कसं बघते हे जाणून घायची खरचं इच्छा आहे.

मला वाटतय यावेळी नाग / साप पकडायला पण न्यायालयाने बंदी घातली आहे. प्रदर्शनावर तर अगोदर पासुनच बंदी आहे.
बर्‍याच वर्षापुर्वी ९८ ९९ ला मी कुतुहल म्हणुन यात्रा बघायला गेलो होतो. कितीही चांगल्या पधतीने हाताळतो म्हटल तरी त्या सापाला त्रास होत नाही हे काही पटत नाही. बर्‍याच सापांच्या अंगावर / डोक्यावर प्रचंड प्रमाणात गुलालाचा चिखल लागलेला होता.

याच वर्षी कोणत्यातरी रविवारच्या पुरवणी मध्ये सर्पमित्राचा लेख वाचला होता, त्याने बरीच वर्षे साप पकडुन त्यांना जीवदान द्यायचे काम केले होते. पण त्या लेखात त्याने त्या सगळ्या चुकाच होत्या असे लिहले होते. साप हाताळताना (सो कॉल्ड सर्पमित्र) कित्येक चुका करतात त्याने साप जखमी होतात आणि मरतात.

गावाकडे साप पकडताना मी पाहिले आहे. साप पकडला रे पकडला कि त्याला झटकायला सुरवात करतात. त्याने त्याच्या पाठीचे मणके ढीले होतात म्हणे, मग तो शांत होतो. मला वाटत नाही कि तो साप जास्त काळ जगत असेल सोडल्यानंतर. Sad

अमित/ निवांत

सर्व सर्पमित्रांनी गावकर्यांना परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण परंपरा आणि रूढीग्रस्त समाजाला पटवणे खूप कठीण आहे. जरी न्यायालयाने बंदी घातलेली असली तरी लपुन-छपून सर्व व्यवहार चालतातच. दर्शनने तिथे जाऊन ते नक्की काय करतात याचा पाठपुरावा केला, कारण पुढे त्याला आणि इतर सर्पमित्रांना गावकर्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी काहीतरी उपाय शोधायचा आहे आणि त्यासाठी त्याच्या मुळात हात घालून माहिती गोळा करणे खूप गरजेच आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-west-maharas...

राजे आपला हेतु स्तुत्य असला तरी लेख काढुन टाकता का ते बघा. नाहितर न्यायालयाचा अपमान या सदराखाली प्रॉब्लेम यायला नको. तुम्ही अगदी फोटोचे पुरावेदेखिल तारखेसकट टाकले आहेत.

ऑन सिरियस नोट.

या हिशोबाने १२ जुलै २०१४ ह्या दिवशी आम्ही सकाळी ७ वाजता वाझार्डे ह्या गावी उपस्थित राहणे गरजेच होत तरच त्यांच्या रू>>>>

या वर्षी म्हणे ३१ शिराळ्याला जिंवत नागांची पुजा न होता प्रतिमांची पुजा होणार आहे म्हणे. खरेच असे घडले तर एक चांगली सुरवात झाली असे म्हणावे लागेल.