मेळघाट

मेळघाटातील पक्षी

Submitted by हर्पेन on 27 November, 2012 - 11:50

मेळघाटातल्या चिलाटी गावात, १०० दिवसांच्या शाळेच्या निमित्त्ताने, मागच्या वर्षी घालवलेल्या, त्या ८-१० दिवसांच्या आठवणी माझ्या मनात आजही अगदी ताज्या आहेत.

माझ्या तिथल्या सोन्यासारख्या वास्तव्याला सुगंध देण्याचे काम, तिथल्या अंगण-वावरात दिसलेल्या, अगदी सहज व विनासायास दिसलेल्या पक्षांनी केले.

त्यांची काही प्रकाशचित्रे आज इथे टाकत आहे.

शुभशकूनी भारद्वाज

Bharadwaj.jpg

बुलबुल एकटा

bulbul.JPG

अन् जोडीने

विषय: 

मेळघाट - १०० दिवसांची शाळा डिसेंबर २०११ ते मार्च २०१२

Submitted by हर्पेन on 23 November, 2012 - 05:52

मागील वर्षी पुण्याच्या 'मैत्री' संस्थेने मेळघाटात भरवलेल्या १०० दिवसांच्या निवासी शाळेचा हा सचित्र वृतांत. ३१ मुली व ११ मुले अशी एकूण ४२ मुले होती. चार गट पाडले होते. आम्ही ४ स्वयंसेवक ४ गटांसाठी अशी योजना होती. प्रत्येकजण ८ दिवस तिकडे राहिलो आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी सोबत घेऊन आलो.

मेळघाटातील 'कोरकू' या आदीवासी समाजातील, रानपाखरांगत मनमौजी मुलांना शाळेबद्दल आकर्षण व प्रेम निर्माण करण्यात यशस्वी व्हायचे म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे.

त्यामुळे मुद्दामच असे 'वेळापत्रक' आखले होते, ज्यात अभ्यासाखेरीज इतरही उद्योग असतील...:)

निवेदन - १०० दिवसांची शाळा - मेळघाटात स्वयंसेवक हवेत.

Submitted by हर्पेन on 22 November, 2012 - 06:45

'मैत्री शाळा १०० दिवसांची - मुलांच्याच गावी' (मेळघाट २०१२ – २०१३)
स्वयंसेवक हवेत.

नमस्कार!

गेल्या १५ वर्षांपासून पुणेस्थित 'मैत्री' नावाची एक संस्था, प्रामुख्याने, मेळघाटात कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे बालमृत्यु टाळण्यासाठी व इतर भेडसावणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. (अधिक माहितीसाठी भेट द्या - www.maitripune.net) तेथे पावसाळ्यात होणारे बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते, त्याकरता, आखून घेतलेल्या कार्य़क्षेत्रामधे 'शुन्य बालमृत्यु' हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, धडक मोहीमा आखणे व त्याची अंमलबजावणी करणे हे काम करण्यात येत आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मेळघाट