मेळघाट - १०० दिवसांची शाळा डिसेंबर २०११ ते मार्च २०१२

Submitted by हर्पेन on 23 November, 2012 - 05:52

मागील वर्षी पुण्याच्या 'मैत्री' संस्थेने मेळघाटात भरवलेल्या १०० दिवसांच्या निवासी शाळेचा हा सचित्र वृतांत. ३१ मुली व ११ मुले अशी एकूण ४२ मुले होती. चार गट पाडले होते. आम्ही ४ स्वयंसेवक ४ गटांसाठी अशी योजना होती. प्रत्येकजण ८ दिवस तिकडे राहिलो आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी सोबत घेऊन आलो.

मेळघाटातील 'कोरकू' या आदीवासी समाजातील, रानपाखरांगत मनमौजी मुलांना शाळेबद्दल आकर्षण व प्रेम निर्माण करण्यात यशस्वी व्हायचे म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे.

त्यामुळे मुद्दामच असे 'वेळापत्रक' आखले होते, ज्यात अभ्यासाखेरीज इतरही उद्योग असतील...:)

Time table.jpg

सकाळी आम्हा स्वयंसेवकांचा दिवस चालू होई तो बंब पेटवण्यापासून, ह्या कामात(देखील) तरबेज असलेले बेडेकर काका आमच्या बॅचला होते म्हणून बरे!

bamb.jpg

नंतरची कामगिरी म्हणजे मुलांना उठवून (खरेतर त्या सगळ्यांना कधीही उठवावे लागले नाही, एकाला जरी जाग आली असली की बाकीच्यांना उठवण्याचे काम तोच करे) त्यांना ब्रशवर पेस्ट देणे. मग पुढील आन्हिके आटपून घेणे.

dat ghastana.jpg

सकाळच्या सत्रातील पहिला कार्यक्रम म्हणजे जवळच असलेल्या मैदानावर (मैदान कसले, शेत्-वावरच होते ते) सगळ्यांना व्यायामासाठी घेऊन जाणे. आधीच मुलं, त्यातून निसर्गाच्या सानिद्ध्यात वाढलेली, त्यांच्या वेगाने तिकडे जायचे म्हणजेच नाकात दम येणे हा वाक्प्रचार जगणे. तिथे जाऊन वेगवेगळे व्यायामप्रकार करायचे व करवून घ्यायचे ते आणिक वेगळेच!

sakalcha vyayam.jpg

इतका व्यायाम झाल्यावर भूक नाही लागणार तर काय होणार. मग पळतच येऊन सकाळचा नाष्टा.
nashta.jpg

असा पोटोबा झाला की मग विठोबा अर्थात सकाळची प्रार्थना....

prarthana.jpg

ह्या मुलांच्या तोंडून 'इतनी शक्ति हमे दे ना दाता' ऐकताना भरून आलेले मन, 'जन गण मन' ऐकताना फुलून यायचे.

prarthana1.jpg

मग सुरु व्ह्यायची शाळा, मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे आपली परिक्षाच...
मग काय, कधी काठावर पास

varga.jpg

तर कधी चक्क नापास...

naapas.jpg
कितीही कंटाळा आलेला असो वा भूक लागलेली असो, कौतुकास्पद बाब म्हणजे जेवणाआधी रांगेने (आपापली विसळून घेतलेली) ताट्-वाटी आणि म्हटलेल्या प्रार्थना...

duparchya jevanaadhi.jpg

ही मराठी प्रार्थना
jevanaadhichi prarthana.jpg

ही कोरकू प्रार्थना

jevanaadhichi prarthana korku.jpg

जेवणानंतरचा काही वेळ मुलांच्या अंघोळी, कपडे धुणे, आराम या साठी राखून ठेवण्यात आला होता.

मग सुरु व्ह्यायची 'सृजनशील कृतींची' वेळ
muanche kam.jpgmitra.jpg

अशा काय काय मस्त वस्तु तयार करून झाले की वेळ व्ह्यायची खेळाच्या तासाची....
शिवाशिवी, लंगडी, क्रिकेट (हो अगदी बरोबर ऐकलत तुम्ही, तेंडूलकर इथेही प्रसिद्ध आहेच.)

sandhyakalacha khel_0.jpg

खेळून परत आल्यावर रीतसर हातपाय धुवून थोडासा पोटाला आधार म्हणून खाऊ खाणे (हा.. पण शिस्तीतच...)
madhalyavelche khane.jpg

नंतरचा वेळ राखीव होता टिव्ही पाहणे (हो डिश अँटेना, सोलर पॅनल यामुळे टिव्ही दिसतो, पण ,मुलांना (सुदैवाने) अजुन त्याची सवय नाहीये) संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर, पाढे-परवच्या नंतर , गोष्टी, गाणी, नकला असा दंगाच असायचा... कोरकू भाषेतील गाण्यांचा खजिनाच खुला व्हायचा...

sayanprarthana.jpg

बघता बघता दिवस संपायचा, (मुलांची झाल्यावर) रात्रीची जेवणे व्हायची. मग आम्ही ४ जण, मारायचो गप्पा, करायचो एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण. आठ दिवसांपुर्वी एकमेकांना 'कवाच नाय' भेटलेले, न ओळखणारे आम्ही 'कार्यकर्ते' बनून गेलो होतो शिकवायला मात्र आलो खूप काही शिकूनच....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धन्यवाद, आंबा३, शोभा१२३ व निंबुडा (अरेच्चा! पुढे काहीच आकडा नाही?) (निंबुडा कृपया दिवा घ्यावा...)

या वर्षीदेखील, पण थोड्या वेगळ्या स्वरुपात '१०० दिवसांची शाळा' भरवली जाणार आहे व त्या करता मदतीची अपेक्षा आहे, अधिक माहीतीकरता खालील दूव्यावर केलेले निवेदन अवश्य वाचावे ही विनंती..

http://www.maayboli.com/node/39286

प्रार्थनेच्या छायाचित्रात मुलांच्या चेहर्‍यावरचं कॉन्सन्ट्रेशन भारी आहे.
दिनक्रमाबरोबर १०० दिवसांच्या कामाविषयी वाचायला आवडेल.

खूपच सुंदर उपक्रम!

मी अकोल्याचा आहे. आपल्याच भागात हा उपक्रम पाहून आनंद झाला. शक्य तेवढी मदत करेन.

शोभा१२३ व shrushti14@gmail.com

संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे यात वादच नाही पण अस्मादिक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे नाहीत. मी आत्तापर्यन्त एकदाच गेलो आहे, यावर्षी जायला जमेलच असेही नाही, बरेच जण वर्षानुवर्ष जात आहेत. आपला खारीचा वाटा (तरी) असावा ह्या हेतूने इथे माबोवर पोस्टलय...:)

भरत मयेकर, अधिक माहीतीसाठी कृपया संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या
www.maitripune.net

दिनेशदा, धन्यवाद!

बी, आपले स्वागतच आहे, वर एक दूवा दिलेला आहे त्यामधे यावर्षीच्या १०० दिवसांच्या शाळेसंदर्भात निवेदन आहे कृपया भेट द्यावी.

छान उपक्रम. फोटोही मस्त.

मुलं अगदी सिन्सिअर दिसत आहेत. सगळ्या गोष्टी आवडीने करत आहेत. त्यांची व्यवस्थाही छन आहे.

छानच ओळख करुन दिलीत आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची!
धन्यवाद आणि शुभेच्छा!

खूपच छान आहे हा उपक्रम!
अशा गोष्टींसाठी वेळ काढणार्‍या सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन!

सॅम, मी नताशा, वत्सला, प्रमोद देव, रोहित एक मावळा, अश्विनी के - आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ज्या कोणाला शक्य असेल त्यांनी नक्की मदत करावी ही विनंती....:)

या वर्षीच्या साहित्य चपराक या दिवाळी अंकात प्रज्ञा शिदोरे (नाव चुकले असल्यास क्षमस्व) यांचा याच विषयावर लेख आला आहे. तुमची आठवण झाली. सर्व मित्र मंडळीत लेख फिरवला आहे.

मुग्धानंद - सर्व मित्र मंडळीत लेख फिरवल्या बद्दल अनेकानेक धन्यवाद..
मार्को पोलो, आनंदयात्री, शापित गंधर्व - प्रोत्साहनपर शब्दांसाठी आभार. आपणही हा लेख आपापल्या मित्रमंडळात फिरवू शकाल का?

आवडलं Happy

Pages