लोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन हे ‘मैत्री’ चे वैशिष्ट्य आहे. "रद्दीतून सद्दी" म्हणजे रद्दी जमा करून ती विकून त्यातून मेळघाटसाठी निधी जमवणे. गेल्या बारा वर्षांमध्ये ‘मैत्री’ ने २० लाखाहून अधिक पैसे यातून उभे केले आहेत.
एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
मेळघाट मैत्री - आनंदमेळावा २०१६
मला गेले तीन वर्षे मेळघाटात जायला जमवता आले नव्हते. त्यामुळे मी यावर्षी अगदी ठरवलेच होते की आपण जाउन यायचे आणि अखेर तसे जमवलेच.
मेळघाटातल्या ज्या शाळांमध्ये आपले काम चालते त्या सर्व मुलांकरता गेली ३-४ वर्षे दिवाळीनंतर एक आनंद मेळावा भरवला जातो. यावर्षी मला त्यात सहभागी होण्याचा योग होता.
“मैत्री शाळा 100 दिवसांची – आपल्या गावी” २०१४- २०१५
मेळघाट उपक्रमाचे स्वरूप.
मेळघाट शैक्षणिक प्रकल्प समन्वयक व गावमित्र यांची पुणे भेट व कार्यशाळा १ मे ते ४ मे २०१४ - संक्षिप्त अहवाल
मेळघाटामध्ये ‘गावमित्र’ म्हणून काम करणारे मैत्रीचे १२ गावमित्र व १०० दिवसांची शाळा या शैक्षणिक प्रकल्पाचे मेळघाटातील स्थानिक समन्वयक (अशोक बेठेकर व रमेश मावस्कर) यांची पुणे भेट १ ते ४ मे २०१४ ह्या दरम्यान पार पडली.
या वर्षी मैत्रीतर्फे मेळघाटात गेलो असताना दिसलेल्या पक्षांची प्रकाशचित्रे
१. ठिपकेदार मनोली Scaly-breasted Munia

२. कापशी Black-winged Kite
नुकताच मी मैत्रीतर्फे मेळघाटात जाउन परत आलो. खरेतर खूप जणांना, मैत्री आणि मेळघाट एकत्र उच्चारताच, सर्वप्रथम आठवतात, त्या वैद्यकीय संदर्भातील धडकमोहिमा. पण मी गेलो होतो शिक्षण संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमाकरता. मैत्रीच्या शैक्षणिक मोहिमेचे हे तिसरे वर्ष.
पहिल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०११-१२ शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता, चिलाटी येथे १०० दिवसांची निवासी शाळा आयोजित केली होती. याद्वारे ४३ मुलांना शाळेत परत प्रवेश घेण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यात आले. त्या सर्वच्या सर्व मुलांनी त्यानंतरच्या वर्षी आपापल्या गावातल्या शाळेत प्रवेश घेतला.
मैत्री शाळेच्या निमित्ताने मेळघाटातल्या चिलाटी नावाच्या खेड्यात रहायची संधी मला मिळाली, त्यावेळी घेतलेली काही प्रकाशचित्रे
शाळेविषयी आपण अधिक जाणून घेऊ शकता ह्या दुव्यावर टिचकी मारून
http://www.maayboli.com/node/45066
१

२
मैत्री संस्था, गेली १३-१४ वर्षे मेळघाटात चालू असलेल्या कुपोषण मृत्यू रोखण्यासाठी काढलेल्या धडक मोहिमांबरोबरच गेली दोन वर्षे डिसेंबर ते मार्च या काळात स्वयंसेवकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमही घेत आहे. पहिल्या वर्षी मैत्रीने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य ४० मुलांसाठी १०० दिवसांची निवासी शाळा चालवली. त्या नंतरच्या म्हणजेच मागच्या वर्षी ३ गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर १०० दिवस काम केले व त्यायोगे सुमारे ७० मुलांपर्यंत आपण पोहोचलो.